रक्षाबंधननिमित्ताने मुलीसोबत जावई गावी आला, पण कुणीतरी त्याची हत्या केली, गावात एकच खळबळ

पुणे जिल्ह्यात एक भयानक घटना घडली आहे. एक महिला आपल्या पतीसोबत तिच्या माहेरी अकोले येथे आली होती. पण तिच्या पतीची गावाबाहेरील शेतात हत्या झाली.

रक्षाबंधननिमित्ताने मुलीसोबत जावई गावी आला, पण कुणीतरी त्याची हत्या केली, गावात एकच खळबळ
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Aug 28, 2021 | 4:12 PM

पुणे : प्रेमात म्युचुअल अंडरस्टँडींग असते, असं म्हणतात. खरंतर प्रेम ही भावना नेमकी काय? या प्रश्नाबाबत विचार केला तर खूप उत्तरं गवसतील. पण अनेकांना प्रेम ही भावना आणि संकल्पना मुळात कळत नाही. त्यातूनच परिस्थितीनुसार प्रेमाचं रुपांतर विकृतीत होतं. विशेष म्हणजे अशा विकृत विचारांकडे माणूस लवकर आकर्षित होतो आणि अनेकदा होत्याचं नव्हतं होतं. स्वत: माणूस उद्ध्वस्त होतोच, पण इतरांनाही खोलवर इजा पोहोचवतो. या सगळ्या गोष्टी सांगण्यामागचं कारण म्हणजे पुण्याच्या भिगवण गावात घडलेली घटना.

नेमकं प्रकरण काय?

पुणे जिल्ह्यात एक भयानक घटना घडली आहे. एक महिला आपल्या पतीसोबत तिच्या माहेरी अकोले येथे आली होती. पण तिच्या पतीची गावाबाहेरील शेतात हत्या होते. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली. गावचा जावई मुलीसह गावात आला आणि त्याची हत्या झाली, या विचारांनी अनेक गावकरी हळहळ व्यक्त करत आहेत. खरंतर मुलीचा पती हा साधासुधा. तरीही त्याची हत्या? असा सवाल अनेक गावकऱ्यांना पडत होता. घटनेनंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली. संबंधित घटना ही प्रेम प्रकरणातून घडल्याचं समोर आलं आहे.

पोलिसांनी तपास कसा केला?

महेश चव्हाण हे रक्षाबंधननिमित्ताने आपल्या पत्नीला घेऊन तिच्या माहेरी अकोले येथे गेले. पण तिथे महेश यांची हत्या होते. सुरुवातीला महेश यांची हत्या कोण करेल? असा सवाल पोलिसांसह गावकऱ्यांना सतावत होता. पण पोलिसांनी तपास केला असता मृतक महेशच्या पत्नीचं लग्नाआधी शेजारी राहणाऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते, अशी माहिती मिळाली. पोलिसांनी याच माहितीचा धागा पकडत तपास केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी अनिकेत शिंदेला ताब्यात घेतलं. यावेळी पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने आपला गुन्हा कबूल केला. विशेष म्हणजे त्याला या कृत्यात त्याचा चुलत भाऊ गणेश शिंदे यानेदेखील साथ दिली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन कोर्टात हजर केलं. यावेळी कोर्टाने त्यांना सहा दिवसांती पोलीस कोठडी सुनावली.

लग्नानंतरही आरोपी महेशच्या पत्नीसोबत संबंधात?

पोलिसांना दिलेल्या कबुली जबाबात आरोपी अनिकेतने सांगितलेली माहिती धक्कादायकच आहे. अनिकेतचं महेशच्या पत्नीसोबत लग्नानंतरही प्रेमसंबंध होते. पण गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात थोडासा दुरावा आला होता. कारण महेशमुळे त्यांना भेटता येत नव्हतं. त्यामुळे चिडलेल्या अनिकेतला प्रचंड राग आला होता. यादरम्यान रक्षाबंधनाच्या निमित्ताने महेश सासरी गेला. याबाबतची माहिती अनिकेतला मिळाल्यानंतर त्याने आपल्या चुलत भावासोबत महेशच्या हत्येचा कट आखला. त्यांनी महेशला भालदवाडी-अकोले शिवारात घेरत त्याचा जीव घेतला, अशी कबुली आरोपीने दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.

हेही वाचा :

पुण्यात 25 वर्षीय महिलेवर घरात घुसून अत्याचार, पोलिसांनी दरवाजा तोडून चौघांना रंगेहाथ पकडलं

छेडछाड करत भर रस्त्यात तरुणीचे कपडे फाडले, औरंगाबादमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.