नेमकं असं काय घडलं ज्याने बँक ऑफ बडोद्याच्या महिला मॅनेजरला गळफास घ्यावा लागला, पतीला बेड्या, हत्या की आत्महत्या?

शिल्पी सोनम आणि दीपक कुमार यांचं सात वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. त्यावेळी शिल्पी या बिहारच्या सीतामढी आणि राकेश हरियाणाच्या सोनीपत येथील बँकेच्या शाखेत कार्यरत होते.

नेमकं असं काय घडलं ज्याने बँक ऑफ बडोद्याच्या महिला मॅनेजरला गळफास घ्यावा लागला, पतीला बेड्या, हत्या की आत्महत्या?
रांचीच्या बँक ऑफ बडोद्याच्या शाखेच्या महिला बँक मॅनेजर शिल्पी सोनम
Follow us
| Updated on: Sep 12, 2021 | 8:20 PM

चंदिगड : देशाची राजधानी दिल्लीपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या हरियाणाच्या बहादूरगढ येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बहादूरगढच्या सेक्टर 6 पोलीस ठाणे हद्दीत एका सोसायटीतील फ्लॅटमध्ये बँक ऑफ बडोदाच्या सीनियर मॅनेजर पदावर कार्यरत असलेल्या महिलेचा संशयितरित्या मृतदेह आढळला आहे. महिलेने गळफास घेतलेला अवस्थेत हा मृतदेह आढळला आहे. पण महिलेने आत्महत्या केलेली नसून पतीकडून तिची हत्या झाल्याचा आरोप महिलेच्या माहेरच्यांनी केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी पतीला बेड्या ठोकल्या आहेत.

मृतक महिला आणि पती वेगवेगळे राहायचे

मृतक महिलेचं नाव शिल्पी सोनम असं आहे. झारखंडच्या रांची येथील अपर बाजार परिसरातील बँक ऑफ बडोद्याच्या शाखेत शिल्पी ब्रांच मॅनेजर म्हणून कार्यरत होत्या. तर त्यांचा पती राकेश शर्मा हा हरियाणाच्या झज्जर जिल्ह्यात जसौरखेडी गावात एका ग्रामीण बँकेत मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. पोलिसांनी या प्रकरणी राकेशला अटक केली आहे. खरंतर राकेश यानेच आपल्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना दिली होती. पण शिल्पी यांच्या माहेरच्यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर पोलिसांनी पतीला बेड्या ठोकल्या.

महिलेची पतीच्या फ्लॅटमध्ये आत्महत्या, माहेरच्यांचे गंभीर आरोप

मृतक शिल्पी यांचे भाऊ दीपक कुमार यांनी या प्रकरणाची माहिती दिली. राकेश आपल्या बहिणीला छळायचा. तो नशेचे ओव्हरडोज घ्यायचा. त्यामुळे बहीण रांची येथे राहायची. तर राकेश हा बहादूरगढच्या ओमॅक्स सोसायटीत एका फ्लॅटमध्ये राहायचा. शिल्पी 4 सप्टेंबरला आपल्या दोन्ही लहान मुलं आणि पुतण्यासह बहादूरगढ येथे गेली होते. यावेळी राकेशने आपल्या बहिणीला त्रास दिला, असा आरोप मृतक महिलेच्या भावाने केला आहे.

सात वर्षांपूर्वी विवाह

शिल्पी सोनम आणि दीपक कुमार यांचं सात वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. त्यावेळी शिल्पी या बिहारच्या सीतामढी आणि राकेश हरियाणाच्या सोनीपत येथील बँकेच्या शाखेत कार्यरत होते. लग्नानंतर शिल्पी यांनी सोनीपत जिल्ह्यातील गन्नोर येथील बँक ऑफ बडोद्याच्या शाखेत ट्रान्सफर केली होती. दोघं एकत्र राहत होते. पण एकत्र राहत असताना आपला पती ड्रग्सचं सेवन करतो, अशी माहिती शिल्पी यांना मिळाली. शिल्पी यांनी त्याला त्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला तर त्याने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे शिल्पी आपल्या सासरी रांची येथे राहायला गेल्या. त्यानंतर त्या तिथेच राहत होत्या. पती राकेश त्यांना भेटण्यासाठी रांची येत जात असे, असं दीपक यांनी सांगितलं आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा :

पैशांच्या हव्यासापायी मालकाचीच निर्घृण हत्या, घराजवळ पुरलं, नंतर खंडणीची मागणी, ठाणे हादरलं

भरदिवसा दुपारी प्रसिद्ध महिला डॉक्टराच्या घरात शिरले, मानेला धारदार कोयता लावत दरोडा, सांगलीत भयानक थरार

VIDEO : सूनेची सासूला मारहाण, कॅमेऱ्यासमोर कानशिलात, घरातला कलह सोशल मीडियावर व्हायरल

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.