Sheena Bora Murder Case | नवा ट्विस्ट! ‘शीना बोरा जिवंतय’ इंद्राणी मुखर्जीचं सीबीआयला पत्र

जिची हत्या झाली, तिच जिवंत असल्याचा दावा इंद्राणी मुखर्जीनं केलाय. याबाबत पत्र लिहून इंद्राणीनं सीबीआय संचालकांकेड शिनाबाबत केलेल्या दाव्यानं एकच खळबळ उडालीये.

Sheena Bora Murder Case | नवा ट्विस्ट! 'शीना बोरा जिवंतय' इंद्राणी मुखर्जीचं सीबीआयला पत्र
इंद्राणी मुखर्जी
Follow us
| Updated on: Dec 16, 2021 | 2:50 PM

मुंबई : शिना बोरा हत्याकांडात (Sheena Bora Murder Case) नवा ट्विस्ट आलाय. शिना बोरा हत्याकांडप्रकरणील महत्त्वाचं नाव असलेल्या इंद्राणी मुखर्जीनं (Indrani Mukharjee) पत्र लिहून शिना बोरा जिवंत असल्याचा दावा केलाय. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शीना जिवंत असून ती काश्मीरमध्ये आहे, असा दावा इंद्राणीनं केलाय. इंद्राणी मुखर्जीनं सीबीआय संचालकांना पत्र लिहून हा दावा केलाय.

पत्रात आणखी काय लिहिलंय?

सीबीआय (CBI) संचालकांना लिहिलेल्या पत्रात इंद्राणीने म्हटलंय की,

नुकतीच मी तुरुंगात एका महिलेला भेटले, जिने तिला सांगितलं की ती काश्मीरमध्ये मी शीना बोराला भेटली होती.

इंद्राणी मुखर्जीने सीबीआय संचालकांना शीना बोराचा काश्मीरमध्ये शोध घ्याला अशी मागणी इंद्राणीनं केली आहे. इंद्राणी मुखर्जी शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी असून ती २०१५ पासून मुंबईच्या भायखळा कारागृहात बंद आहे.

इंद्राणी सर्वोच्च न्यायालयात जाणार?

दरम्यान, इंद्राणीनं जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) याचिका दाखल केली होती. मात्र गेल्याच महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली होती. त्यामुळे इंद्राणी आता जामिनासाठी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) जाणार असल्याची शक्यताही वर्तवली जाते आहे.

काय आहे शीना बोरा हत्याकांड?

इंद्राणी मुखर्जीने एकूण तीन लग्न केली आहेत. ज्यात प्रथम तिला पतीपासून मुलगी झाली. तिचं नाव शीना बोरा होतं. इंद्राणी मुखर्जीचा तिसरा नवरा पीटर मुखर्जी हा इंद्राणी मुखर्जीचा मुलगा आणि शीना बोराचे अफेअर असल्याचे सांगितलं जातं. इंद्राणी आणि पीटर मुखर्जी दोघेही यामुळे अस्वस्थ होते.

एप्रिल 2012 मध्ये, नवी मुंबईजवळील जंगलात 24 वर्षीय शीनाची कारमध्ये गळा आवळून हत्या (Murder) करण्यात आली होती आणि शेजारच्या रायगड (Raigad) जिल्ह्यात मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली होती. 2015 मध्ये ही हत्या उघडकीस आल्यानंतर इंद्राणीशिवाय तिचा ड्रायव्हर श्यामवर राय आणि संजीव खन्ना यांनाही मुंबई पोलिसांनी अटक केली होती. इंद्राणीचा पती पीटर यालाही नंतर या प्रकरणात आरोपी बनवून अटक करण्यात आली होती. तपासानुसार, शीनाच्या राहुलसोबतच्या संबंधांना इंद्राणीचा विरोध होता. याशिवाय आर्थिक वाद हा हत्येमागील संभाव्य कारण होतं. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. या प्रकरणी इंद्राणी मुखर्जी 2015 पासून मुंबईतील भायखळा कारागृहात बंद आहे.

संबंधित बातम्या –

25 वर्षीय प्रियकराची अल्पवयीन प्रेयसीसह आत्महत्या, विष पिऊन आयुष्य संपवलं

Mumbai Murder | ट्रीटमेंटसाठी तीन लाख खर्च करण्यावरुन वाद, मुंबईकर सूनेने सासूचा गळा आवळला

पती अपघातात गेला, सासू-सासऱ्यांनीच सुनेचं दुसरं लग्न लावलं आणि आता कोर्टातही खेचलं!

Non Stop LIVE Update
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.