तीन तृतीयपंथी दुर्गा पूजा निमित्ताने तानसा नदीवर आंघोळीसाठी आले, पण पाण्याचा अंदाज न आल्याने अनपेक्षित दुर्घटना

राज्यासह देशभरात आज नवरात्रीचा उत्साह आहे. राज्यात आजपासून नवरात्रीच्या सणाला सुरुवात झाली आहे. या उत्साहाच्या वातावरणात विरारमधून एक अनपेक्षित दुर्घटना समोर आली आहे.

तीन तृतीयपंथी दुर्गा पूजा निमित्ताने तानसा नदीवर आंघोळीसाठी आले, पण पाण्याचा अंदाज न आल्याने अनपेक्षित दुर्घटना
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Oct 07, 2021 | 6:25 PM

विरार : राज्यासह देशभरात आज नवरात्रीचा उत्साह आहे. राज्यात आजपासून नवरात्रीच्या सणाला सुरुवात झाली आहे. या उत्साहाच्या वातावरणात विरारमधून एक अनपेक्षित दुर्घटना समोर आली आहे. तानसा नदीत आंघोळीसाठी गेलेले तीन तृतीयपंथी पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले आहेत. या दुर्घटनेमुळे परिसरात शोकाकूळ वातावरण आहे. एकाचवेळी तिघं वाहून गेल्याने या घटनेवर हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमकं काय घडलं?

तीनही तृतीयपंथी हे मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील खानिवडे जवळील तानसा नदीत आंघोळीसाठी गेले होते. खरंतर आज घटस्थापना असल्याने दुर्गा पूजा निमित्त सहा तृतीयपंथी आंघोळीसाठी तानसा नदीवर आले होते. यावेळी भरतीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने त्यातील तिघे जण नदीत बुडाले. तर तिघे बाहेर आले. संबंधित घटना ही सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली.

सुनीता गोणामुडी उर्फ पुरी (वय 27), हारिका अंदुकोरी (वय 39), प्राची आकुला (वय 23) अशी मृतकांची नावे आहेत. सध्या वसई विरार महानगरपालिकेची अग्निमन दालाचे जवान, विरार पोलीस आणि स्थानिक नागरीक त्या तिघांच्या मृतदेहाचा शोध घेत आहेत.

नाशिकमध्ये रामकुंड परिसरात 4 दिवसांत 4 बुडाले

दुसरीकडे, नाशिक जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे गोदावरी नदीला चारदा पूर आला. जिल्ह्यातील सर्व धरणे भरली आहेत. त्यामुळे धरणांवर पोलिस बंदोबस्त तैनात करून या परिसरात नागरिकांना फिरकण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई केली आहे. मात्र, नाशिक शहरातील रामकुंड परिसरात अनेक भाविक दर्शनासाठी येतात. त्यात गेल्या चार दिवसांत पाण्याचा अंदाज न आल्याने आणि पाय घसरून पडल्याने चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

पहिली दुर्घटना

पहिली घटना रामकुंडाजवळच्या गांधी तलावात घडली. यात उत्तम नगरमधल्या गणेश कॉलनीतले महाजन कुटुंब देवदर्शनासाठी आले होते. या कुटुंबातील रावसाहेब महाजन (वय 36) यांचा पाय घसरला आणि ते गोदापात्रात कोसळले. त्यांना शोधण्यासाठी जीवरक्षक जवानांनी खूप प्रयत्न केले. मात्र, पाण्याची पातळी जास्त असल्याने त्यांना अपयश आले. खूप उशिराने त्यांचा मृतदेह हाती लागला. रावसाहेब यांच्या मागे पत्नी, मुलगी, आई, वडील, भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार आहे.

इतर दुर्घटना

दुसऱ्या घटनेत पाण्यात पडलेले रावसाहेब महाजन यांचा शोध घेताना जीवरक्षक जवानांना एक मृतदेह आढळला. पोलिसांनी याप्रकरणी तपास केला असता, तो ओवेस नदीम खान या अवघ्या अठरा वर्षांच्या तरुणाचा असल्याचे समजले. तिसऱ्या घटनेत साहील सलीम अन्सारी या अवघ्या बारा वर्षांच्या मुलाचा गोदापात्रात बुडून मृत्यू झाला. तो नाशिकमधल्या बुधवार पेठेत रहायचा. साहील हा घरात कोणालाही न सांगता गोदापात्रावर अंघोळीला गेल्या असल्याचे समजते. त्यात पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

बलात्कारात अपयशी ठरल्यानंतर बापाने मुलीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये काठी घातली, सहा वर्षाची चिमुकली वेदनांनी विव्हळत राहिली

जिच्यासोबत सात जन्मांच्या सोबतीची शपथ घेतली तिनेच घात केला, प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येचं गूढ अखेर उकललं

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.