बॉयफ्रेंड घरात असताना पती घरी आला, नंतर हाहा:कार, दुसऱ्या दिवशी नाल्यात मृतदेह

देशाची राजधानी असलेल्या दिल्ली शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या बॉयफ्रेंड आणि त्याच्या मित्रांच्या मदतीने पतीची हत्या केली आहे.

बॉयफ्रेंड घरात असताना पती घरी आला, नंतर हाहा:कार, दुसऱ्या दिवशी नाल्यात मृतदेह
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Aug 29, 2021 | 3:23 PM

नवी दिल्ली : देशाची राजधानी असलेल्या दिल्ली शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या बॉयफ्रेंड आणि त्याच्या मित्रांच्या मदतीने पतीची हत्या केली आहे. पोलिसांनी हत्येनंतर जवळपास 20 दिवसांनी हत्येचा उलगडा केला आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी मोठ्या शिताफीने मृतकाची पत्नी, सासूसह 7 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकं प्रकरण काय?

संबंधित घटना ही दिल्लीच्या न्यू फ्रेंड्स कॉलनी पोलीस ठाणे हद्दीत घडली. पोलिसांना 10 ऑगस्टला न्यू फ्रेंड्स कॉलीनत सुखदेव विहारजवळ नाल्यात पडलेल्या एका सुटकेसमध्ये एक मृतदेह असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहणी केली असता संबंधित घटना खरी असल्याचं उघड झालं. मृतकाचा चेहरा कुजलेला होता. त्यामुळे त्याची ओळख पटणं कठीण होतं. मृतदेहाच्या उजव्या हाताला नवीन असं लिहिलेला टॅटू होता. तसेच त्याच्या उजव्या हातात एक स्टीलचा कडाही मिळाला.

पोलिसांनी तपास कसा केला?

पोलिसांनी तपास केला असता एका महिलेने नवीन नावाच्या पतीची गायब असल्याची तक्रार केली होती. त्यामुळे मृतदेह हा त्याच नवीनचा असल्याचा पोलिसांचा अंदाज होता. पण पोलिसांना अद्याप खात्री नव्हती. पोलीस शाहनिशा करण्यासाठी तक्रारदार महिलेने दिलेल्या पत्त्यावर गेले. पण संबंधित महिला तिथे नव्हती. तिथे आजूबाजूच्या नागरिकांकडे विचारपूस केली असता ती महिना अचानक रुम सोडून गेल्याची माहिती मिळाली. त्यामुळेल काहीतरी गडबड आहे, असा संशय पोलिसांना आला. महिला ज्या घरात राहत होती त्याच्या घराच्या मालकाला विचारपूस केली असता ती महिला आपल्याला न सांगताच निघून गेली, अशी माहिती त्याने दिली. अखेर पोलिसांनी तिथून महिलेचा फोन नंबर मिळवला.

आरोपी महिलेचा कबुली जाबाब

अखेर पोलीस आरोपी महिलेपर्यंत पोहोचले. या महिलेचं नाव मुस्कान असं होतं. पोलिसांनी तिची चौकशी केली असता सुरुवातीला तिने उडवाउडवीचे उत्तरे दिली. तसेच पोलिसांनी नवीनच्या हातावर असलेल्या टॅटू विषयी माहिती विचारली. तेव्हा महिलेने असा कुठलाही टॅटू आपल्या पतीच्या हातावर नव्हती, असं सांगितलं. पण पोलिसांनी महिलेच्या पॅकेटमध्ये फोटो बघितला तेव्हा महिलेचं बिंग फुटलं. त्यानंतर मुस्कान पोपटासारखं सगळं पटापट बोलू लागली.

आधी हत्या, नंतर नाल्यात फेकलं

मुस्कान आणि नवीन हे गेल्या सात वर्षांपासून संबंधात होते. त्यातूनच त्यांना दोन वर्षांची मुलगी होती. पण गेल्या सात महिन्यांपासून दोघं वेगळं राहत होते. मुस्कान मुलीला घेऊन आपल्या आईकडे राहत होती. तर नवीन हा दक्षिण पुरी भागात राहत होता. 7 ऑगस्टला रात्री 11 वाजता नवीन दारुच्या नशेत मुस्कानच्या घरी आला. यावेळी घरात जमाल नावाचा तरुणही होता. जमाल हा मुस्कानचा बॉयफ्रेंड होता. यावरुन संतापलेल्या नवीनने मुस्कानला मारहाण केली.

यावेळी जमालने दोन मित्रांना बोलावलं. तिघांनी मिळून नवीनला प्रचंड मारहाण केली. यात नवीनचा मृत्यू झाला. आरोपींनी नंतर नवीनचा मृतदेह पाण्याने धुतला. त्यानंतर एका सुटकेसमध्ये मृतदेह भरला आणि सकाळच्या सुमारास न्यू फ्रेंड्स कॉलनी जवळील नाल्यात फेकून दिला, अशी माहिती समोर आली. पोलिसांनी आता सर्व आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

हेही वाचा :

सात जणांची नावं, सुसाईड नोट सेफ्टी पिनने गाठोड्याला अडकवली, कोल्हापुरात महिलेची नदीत आत्महत्या

दोन्ही मुली झाल्याने पतीचा संताप, पुण्यात महिलेला नग्न करुन भोंदूबाबाचा अंगारा फासला

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.