Mumbai University: आयडॉलच्या प्रवेशास 30 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ! प्रवेश ऑनलाईन
हे प्रवेश ऑनलाईन असून, विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या https://mu.ac.in / distance-open-learning / या परीक्षा घेणार आहे. संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन डॉ. प्रकाश महानवर यांनी केले आहे.
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) दूर व मुक्त संस्थेच्या जुलै सत्राच्या प्रवेशास 30 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. जुलै सत्राचे प्रवेश 25 जूनपासून सुरु झाले असून आजपर्यंत या सत्रात 16 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांसाठी प्रवेश घेतला आहे. पदवी प्रवेशाच्या नियमित फेरीत ज्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही अशा विद्यार्थ्यांनाही आयडॉलमधून (IDOL Admissions) आपले शिक्षण (Education) पूर्ण करण्याची संधी असणार आहे. पदवीस्तरावरील प्रथम वर्ष बीए, बीकॉम, बीकॉम अकाउंट्स अॅन्ड फायनान्स, बीएस्सी आयटी, बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स हे अभ्यासक्रम व पदव्युत्तर स्तरावरील प्रथम वर्ष एमए (इतिहास, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, भूगोल, मराठी, हिंदी, इंग्रजी), एमए शिक्षणशास्त्र, एमकॉम, एमएस्सी गणित, एमएस्सी आयटी, एमएस्सी कॉम्पुटर सायन्स व पदव्युत्तर पदविका पीजी डीएफएम या अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू होत असून प्रवेश अर्ज भरण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट पर्यंत आहे. हे प्रवेश ऑनलाईन असून, विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या https://mu.ac.in / distance-open-learning / या परीक्षा घेणार आहे. संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन डॉ. प्रकाश महानवर यांनी केले आहे.
MMS-MBA,MCA या अभ्यासक्रमासाठी आयडॉल लवकरच प्रवेश परीक्षा घेणार
एआयसीटीईने आयडॉलला एमएमएस- एमबीए साठी 720 जागा तर एमसीएसाठी 2 हजार जागांना मान्यता दिली आहे. याला यूजीसीची मान्यता मिळाल्यानंतर त्याची प्रवेश माध्यमातून सुरू करण्यास परवानगी दिली आहे. यानुसार एमएमएस – एमबीए व एमसीए या अभ्यासक्रमासाठी आयडॉल लवकरच प्रवेश परीक्षा घेणार आहे.
बी. ए. मानसशास्त्र विषय सुरु
बीए मध्ये मानसशास्त्र विषयाला विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अनेक महाविद्यालयात तृतीय वर्षी बीए मध्ये मानसशास्त्राचे सहा पेपर उपलब्ध नसल्याने विदयार्थी मानसशास्त्रापासून वंचित राहतात. अशा विद्यार्थ्यांना इथे संधी मिळणार आहे.
विभागीय उपकेंद्रावर मार्गदर्शन
आयडॉलचे चर्चगेट, ठाणे, कल्याण, रत्नागिरी व सावंतवाडी येथे विभागीय केंद्रे असून याठिकाणी प्रवेशासंबंधी मार्गदर्शन व अध्ययन साहित्याचे वितरण होणार आहे. पालघर येथेही लवकरच विभागीय केंद्र सुरू होणार आहे.