AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिक्षण व्यवस्थेवर ‘व्हर्च्युअली’ मंथन, ‘वसुधैव कुटुंबकम शिक्षण शिखर परिषदे’चे आयोजन; राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन होणार

कोरोनाच्या संकटाने जगभरातील शिक्षण व्यवस्थेवर प्रचंड परिणाम झाला आहे. महाराष्ट्रासह देशातील शिक्षण व्यवस्थाही त्यातून सुटू शकली नाही.

शिक्षण व्यवस्थेवर 'व्हर्च्युअली' मंथन, ‘वसुधैव कुटुंबकम शिक्षण शिखर परिषदे’चे आयोजन; राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन होणार
Vasudhaiva Kutumbakam Education Summit
| Edited By: | Updated on: Jan 18, 2022 | 6:11 PM
Share

मुंबई: कोरोनाच्या संकटाने जगभरातील शिक्षण व्यवस्थेवर प्रचंड परिणाम झाला आहे. महाराष्ट्रासह देशातील शिक्षण व्यवस्थाही त्यातून सुटू शकली नाही. त्यामुळे आताची शिक्षण व्यवस्था आणि कोरोना संकटामुळे भविष्यातील शिक्षण व्यवस्था कशी असेल यावर चर्चा करण्यासाठी ‘वसुधैव कुटुंबकम शिक्षण शिखर परिषद 2022’चे आयोजन करण्यात आले आहे. ‘समिट इंडिया’ने ‘टेक अवंत- गर्दे’च्या सहकार्याने ही शिखर परिषद पार पडणार आहे. 20 ते 22 जानेवारी दरम्यान तीन दिवसीय आभासी (व्हर्च्युअल) परिषदेने होणार असून परिषदेची सुरुवात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उद्घाटनपर संदेशाने होणार आहे.

व्हर्च्युअली पार पडणाऱ्या या शिक्षण शिखर परिषदेत ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण-2020 आणि हायब्रिड लर्निंग’ या विषयांवरील बारकाव्यांवर विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, धोरणकर्ते चर्चा करणार आहेत. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी, कौशल्य विकास, उद्योजकता, इलेक्ट्रानिक आणि माहिती तंत्रज्ञान खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर, आदिवासी व्यवहार खात्याच्या केंद्रीय राज्यमंत्री रेणुका सिंग, राष्ट्रीय शिक्षण धोरण-2020 मसुदा समितीचे सदस्य एम. के. श्रीधर, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे (एआयसीटीई) अध्यक्ष अनिल सहस्रबुद्धे आदी या परिषदेत भाग घेणार आहेत.

तसेच राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे (एनसीईआरटी) संचालक प्रा. श्रीधर श्रीवास्तव, सीबीएसईचे कौशल्य आणि प्रशिक्षण संचालक डॉ. विश्वजीत सहा, असोसिएशन ऑफ स्कूल्स फॉर इंडियन स्कूल्स सर्टिफिकेटचे (एसआयसी) राष्ट्रीय सचिव के. व्ही. व्हिन्सेंट, शिक्षा संस्कृती उत्थानचे राष्ट्रीय सचिव अतुल कोठारी, मायक्रोसॉफ्ट इंडियाचे एज्युकेशन अॅडव्होकसीचे संचालक डॉ. विनी जोहरी या परिषदेत आपले विचार मांडणार आहेत.

तर शिक्षण आंतरराष्ट्रीय दर्जाचे होईल

राष्ट्रीय शिक्षण धोरण-2020चे ध्येय-दृष्टी पुढे नेण्यासाठी, त्यावर सर्वांगीण चर्चा घडवून आणण्यासाठी आम्ही ‘वसुधैव कुटुंबकम- आभासी (व्हर्च्युअल) शिक्षण शिखर परिषद -2020’चे आयोजन केले आहे. भारतासाठीच्या नव्या शिक्षण पद्धतीचा आराखडा मांडणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाला देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळे आपल्या शिक्षण व्यवस्थेत गुणवत्तापूर्ण सुधारणा होणार असून आपले शिक्षण आंतरराष्ट्रीय दर्जासमान होईल, ज्याचा आपल्या भावी पिढ्यांवर निश्चितच सकारात्मक परिणाम होईल, असा विश्वास ‘समिट इंडिया’चे अध्यक्ष श्याम जाजू यांनी व्यक्त केला.

साप्ताहिक पॅनल चर्चा होणार

तीन दिवसीय परिषदेनंतर 29 जानेवारी ते 9 एप्रिल 2022 दरम्यान साप्ताहिक पॅनल चर्चा होणार आहेत. करोना महासाथीनंतरच्या, डिजिटली रुपांतरित झालेल्या शिक्षण व्यवस्थेसमोरील विविध आव्हानं आणि संधी यावरही सखोल चर्चा होणार आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी 2020), डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आणि होलिस्टिक लर्निंग (डीटीएचएल), तसंच संकरित शिक्षण (हायब्रिड लर्निंग) याद्वारे भारतीय शिक्षण व्यवस्थेची अशी एक मजबूत चौकट तयार होईल, जी ‘डिजिटल-नेटिव्ह’ विद्यार्थ्यांच्या सर्व गरजांची पूर्तता करण्यास सक्षम असेल.

शिक्षण व्यवस्था आव्हानं पेलेल

शिकण्यासाठी तंत्रज्ञानाच्या क्षमतेचा किती वापर होऊ शकतो, याचा अंदाज सर्वचजण घेऊ लागलेत. आजच्या जगात ज्ञान हीच सर्वात मौल्यवान संपत्ती आहे. त्यामुळे माहिती-श्रीमंत, विकसित तंत्रज्ञान-सक्षम आणि सहयोगी शिक्षण वातावरणाचे फायदे विद्यार्थी, शिक्षक, शाळा आणि एकंदरच संपूर्ण समाजापर्यंत कोणत्याही प्रकारचं बंधन नसलेल्या शिक्षणाद्वारे पोहोचायलाच हवेत. ‘वसुधैव कुटुंबकम शिक्षण परिषद’ हा असा एक उपक्रम आहे, ज्याद्वारे हायब्रिड लर्निंग तसंच राष्ट्रीय शिक्षण धोरणाबाबतची जागरुकता वाढेल, आणि साहजिकच त्याद्वारे आपली शिक्षण व्यस्था, आपला समाज भविष्यातील आव्हानं पेलण्यास सज्ज होईल, असं मत ‘टेक अवंत- गर्दे’चे सीईओ अली सैत यांनी व्यक्त केलं. वसुधैव कुटुंबकम शिक्षण शिखर परिषद सर्वांसाठी खुली असून त्याविषयीच्या अधिक माहितीसाठी https://vasudhaivakutumbakam.live/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.

संबंधित बातम्या:

प्रादेशिक भाषेतून इंजिनिअरिंगचं शिक्षण, मराठी भाषेतून किती विद्यार्थी शिकणार? आकडेवारी काय सांगते

NEET UG counselling : नीट यूजी समुपदेशनाला उद्यापासून सुरुवात, संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

School Reopen : शाळा सुरु करण्याबाबत पुढच्या कॅबिनेटमध्ये निर्णय, राजेश टोपे यांची माहिती

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.