माहिम विधानसभा निवडणूक निकाल 2024
उमेदवारांची नावे | कुल वोट | पक्ष | स्टेटस |
---|---|---|---|
Mahesh Baliram Sawant | - | SHS(UBT) | Leading |
Amit Raj Thackeray | - | MNS | Trailing |
Sada Sarvankar | - | SHS | Trailing |
Sudhir Bandu Jadhav | - | BSP | Trailing |
Farooq Saleem Sayyed | - | BRSP | Trailing |
Nitin Ramesh Dalvi | - | NRD | Trailing |
माहिम हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. पण मनसे, शिवसेना (ठाकरे गट) आणि शिवसेना (शिंदे गट) या तीन पक्षात येथे चुरस होणार आहे. विद्यमान आमदार सदा सरवणकर यांनी या मतदारसंघातून आव्हान दिलं आहे. महाविकास आघाडीत हा मतदारसंघ ठाकरे गटाच्या वाट्याला जाणार आहे. ठाकरे गटाने महेश सावंत यांना उमेदवारी दिली आहे. तर मनसेने थेट राजपुत्र अमित ठाकरे यांना मैदानात उतरवलं आहे. त्यामुळे माहिममध्ये अत्यंत चुरशीची लढत होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
या मतदारसंघात मराठी आणि मुस्लीम समाजाची मते सर्वाधिक आहेत. या मतदारसंघात 45 हजाराहून अधिक मराठी मतं आहेत. त्यानंतर 33 हजार मुस्लीम मतदार आहेत. त्यानंतर 9 हजार ख्रिश्चन मतदार आहेत. सदा सरवणकर हे प्रभादेवी, दादरमधील एक मोठ नाव आहे. तळागाळात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. सामान्य शिवसैनिक ते नगरसेवक, आमदार असा आतापर्यंतचा त्यांचा प्रवास राहिला आहे. सदा सरवणकर यांची मतदारसंघात स्वत:ची एक ताकद आहे हे नाकारुन चालणार नाही. 1992 ते 2004 अशी तीनवेळा त्यांनी नगरसेवक पदाची निवडणूक जिंकली. 2004 साली पहिल्यांदा त्यांना विधानसभेच तिकीट मिळालं. ते आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 2009 साली शिवसेनेने त्यांना तिकीट नाकारलं. त्यामागे स्थानिक राजकारण होतं. त्यावेळी त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली. त्यांचा पराभव झाला. नितीन सरदेसाई यांच्या रुपाने माहिममधून पहिल्यांदा मनसेचा आमदार निवडून आला.
2012 साली सरवणकरांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. 2014 मध्ये त्यांनी पुन्हा शिवसेनेची उमेदवारी मिळवली. पुन्हा निवडून विधानसभेवर गेले. 2019 मध्ये तिसऱ्यांदा आमदार बनले. 2022 साली शिवसेनेत फूट पडली. त्यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंना साथ दिली. आता त्यांना 2024 विधानसभेसाठी शिवसेनेने पुन्हा उमेदवारी जाहीर केलीय.
उमेदवारांची नावे | परिणाम | एकूण मते | मतदानाची टक्केवारी % |
---|---|---|---|
Sada Sarvankar SHS | Won | 61,337 | 49.45 |
Sandeep Sudhakar Deshpande MNS | Lost | 42,690 | 34.42 |
Pravin Naik INC | Lost | 15,246 | 12.29 |
Mohanish Ravindra Raul IND | Lost | 843 | 0.68 |
Nota NOTA | Lost | 3,912 | 3.15 |
उमेदवारांची नावे | परिणाम | एकूण मते | मतदानाची टक्केवारी % |
---|---|---|---|
Mahesh Baliram Sawant SHS(UBT) | Leading | 0 | 0.00 |
Amit Raj Thackeray MNS | Trailing | 0 | 0.00 |
Sada Sarvankar SHS | Trailing | 0 | 0.00 |
Sudhir Bandu Jadhav BSP | Trailing | 0 | 0.00 |
Farooq Saleem Sayyed BRSP | Trailing | 0 | 0.00 |
Nitin Ramesh Dalvi NRD | Trailing | 0 | 0.00 |