संजय राऊत यांनी बेळगावात जावून मुद्दा खेचला, अयोध्येतील राम मंदिराबाबत सर्वात मोठा दावा

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बेळगावात जाऊन भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी अतिशय खोचक शब्दांमध्ये घणाघात केला. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या भाषणात अयोध्येतील राम मंदिर आणि बाबरी मशिदीचा मुद्दा उपस्थित करत भाजपवर सडकून टीका केली.

संजय राऊत यांनी बेळगावात जावून मुद्दा खेचला, अयोध्येतील राम मंदिराबाबत सर्वात मोठा दावा
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 03, 2023 | 10:58 PM

बेळगाव : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आज कर्नाटक राज्याच्या दौऱ्यावर आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी संजय राऊत बेळगावात गेले आहेत. संजय राऊत यांची आज बेळगावात सभाही झाली. यावेळी त्यांनी अयोध्येतील राम मंदिर आणि बाबरी मशीद बद्दल मोठा दावा केला. तसेच यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. “शिवसेना नसती तर अयोध्येत राम मंदिर उभं राहिलं नसतं. बाबरी पाडणारे शिवसैनिक होते. शेपूट टाकून पळणारे भाजपावाले होते. बाबरी यांनी पाडलीचं नाही आणि आम्हाला शिकवतात”, असा दावा संजय राऊत यांनी केला.

“भगवा रंग शिवसेना आणि एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर शोभतो. भारत माता ढोंग्यांची नाही तर आपली आहे. मी कर्नाटकात येत असताना काँग्रेस, भाजप आणि मिंदे गटाचे नेते विमानात होते. मी विचारलं बेळगावला कुणाच्या प्रचाराला? काँग्रेसवाले म्हणाले काँग्रेसच्या, भाजपवाले म्हणाले भाजपच्या. मी म्हटलं लाज वाटत नाही का? मराठी माणसाविरोधात प्रचार करण्यासाठी येथे आलात”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

‘थू तुमच्या जिंदगानीवर’

“उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या मराठी विरोधात सभा घेणार आहेत. थू तुमच्या जिंदगानीवर. बेळगाववरील भगवा उतरवला तेव्हा अभय पाटील कुठे होता? कोरोना काळात कोडुसकर येथे उतरले होते. आमच्या पराभवासाठी मुख्यमंत्री येथे येत आहेत. मराठी माणसाच्या पराभवासाठी शिंदे येतात हे निर्लज्जपणाचा कळस आहे”, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

हे सुद्धा वाचा

“मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. आम्ही तुरुंग खूप पाहिलेली आहेत. मी चार महिने जेलमध्ये होतो. शिवसेनेला रोखण्यासाठी मला जेलमध्ये टाकलं. मी येथे आलो तेव्हा उद्धव ठाकरेंचा मला फोन आला. त्यांनी विचारलं वातावरण कसं आहे? मी म्हटलं आधी सीमा भाग जिंकू आणि महाराष्ट्रात शिवसेना जिंकेल”, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

संजय राऊत यांचा भाजपवर घणाघात

“तुमचा आणि आमचा भगवा वेगळा नाही. आपलं दैवत एकच, छत्रपती शिवाजी महाराज. सीमा भागासाठी बाळासाहेबांनी भोगलं, भाजपचे लोक चोर-लंफगे आहेत. वेळ पडली तर गरज पडली तर शिवसेना सीमा भागासाठी छातीवर वार झेलायला तयार आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

“बेळगावात महाराष्ट्रातील अनेक नेते येतात. मराठी माणसाला हरवण्यासाठी खोके येथे येणार आहेत. पण सीमाभागाचं नातं तुम्हाला माहिती नाही. महाराष्ट्र एकिकरण समितीचे उमेदवार हे आमचे उमदेवार आहेत. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आम्ही लढत आहोत. यावेळी एकीची व्रजमूठ मला या ठिकाणी पाहिला मिळत आहे”, असा दावा राऊतांनी केला.

“हिंदुत्वाचा प्रचार येथे करत आहेत. यांचं हिंदुत्व खोक्यात आहे. शिवसेना फोडली तेव्हा हे कुठे होते? अयोध्येला हिंदुंचं आम्ही रक्षण केलं. शिवसेना फोडताना हिंदुत्व आठवलं नाही का?”, असा सवाल राऊतांनी केला.

“काश्मीर यांना सांभाळता आलं नाही. मी काश्मीरच्या माजी राज्यपालांना भेटायला गेला होतो. पुलवामात 40 जवानांचा हत्या होणार आहे, असा अहवाल गुप्तचर खात्यांनी दिला होता. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना हा अहवाल देण्यात आला होता. 40 जवानांना यांनी मरू दिलं”, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.