National Awards 2023 Winners LIVE | राष्ट्रीय पुरस्कार 2023 मध्ये क्रिती सेनन आणि आलिया भट्ट यांनी मारली बाजी, कंगना राणावतचा पत्ता कट

| Updated on: Aug 25, 2023 | 7:09 AM

69th National Film Awards 2023 LIVE Updates : आज दिल्ली येथून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2023 च्या विजेत्यांची घोषणा ही केली जाणार आहे. या पुरस्कार सोहळ्याकडे सर्वांच्या नजरा या लागल्या आहेत. या पुरस्कारामध्ये नेमके कोण बाजी मारणार याबद्दल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता ही बघायला मिळत आहे.

National Awards 2023 Winners LIVE | राष्ट्रीय पुरस्कार 2023 मध्ये क्रिती सेनन आणि आलिया भट्ट यांनी मारली बाजी, कंगना राणावतचा पत्ता कट

दिल्ली : 69 व्या राष्ट्रीय पुरस्कारांच्या (69th National Film Awards LIVE 2023 ) विजेत्यांची घोषणा आज संध्याकाळी 5 वाजता नवी दिल्ली येथून केली जाणार आहे. या पुरस्कार सोहळ्यात बाॅलिवूड चित्रपटांसोबतच साऊथच्या चित्रपटांचा बोलबाला दिसत आहे. या पुरस्कार सोहळ्यात काही मराठी चित्रपट (Movie) देखील बाजी मारणार असल्याची जोरदार चर्चा ही बघायला मिळत आहे. आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि कंगना राणावत (Kangana Ranaut) यांच्यामध्ये तगडी टक्कर होणार हे नक्कीच आहे. पत्रकार परिषदेत कलाकारांच्या नावांची घोषणा केली जाणार आहे. यामुळे आता याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.

विशेष म्हणजे 69 व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये (National Film Awards 2023)  साऊथच्या चित्रपटांचा जलवा हा बघायला मिळणार आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या शर्यतीत जोजू जॉर्जचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. यंदाचा राष्ट्रीय पुरस्कार कोण जिंकणार याकडे प्रेक्षकांच्या नजरा लागलेल्या आहेत. मात्र, आता यासाठी काही वेळ प्रेक्षकांना वाट बघावी लागणार आहे. बाॅलिवूडच्या नेमक्या कोणत्या कलाकारांना आणि चित्रपटांना हे पुरस्कार मिळतात हे अगदी थोड्यात वेळात स्पष्ट होईल.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 24 Aug 2023 06:21 PM (IST)

    National awards 2023 live updates | ‘या’ चित्रपटांना मिळाले पुरस्कार, वाचा यादी

    कोणाला मिळाले पुरस्कार

    राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी – द काश्मीर फाइल्स

    सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट – RRR

    सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म – रॉकट्री: द नंबी इफेक्ट

    सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन – पुष्पा / आरआरआर

    सर्वोत्कृष्ट मेकअप आर्टिस्ट – गंगुबाई काठियावाडी

    सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझायनर – सरदार उधम सिंग

    सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझायनर – सरदार उधम सिंग

    सर्वोत्कृष्ट संपादन – गंगुबाई काठियावाडी

    सर्वोत्कृष्ट छायांकन – सरदार उधम सिंग

    सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – पल्लवी जोशी (द काश्मीर फाइल्स)

    सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – पंकज त्रिपाठी (मिमी)

    सर्वोत्कृष्ट बालकलाकार – भाविन रबारी

    सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – आलिया भट्ट (गंगुबाई काठियावाडी), क्रिती सॅनन (मिमी)

    सर्वोत्कृष्ट अभिनेता – अल्लू अर्जुन (पुष्पा द राइज)

    सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – निखिल महाजन (गोदावरी – द होली वॉटर)

  • 24 Aug 2023 06:15 PM (IST)

    National awards 2023 live updates | अल्लू अर्जुन ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता

    पुष्पा चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्या पुरस्कार हा अल्लू अर्जुन याला मिळाला आहे.

  • 24 Aug 2023 06:11 PM (IST)

    National awards 2023 live updates | क्रिती सेनन आणि आलिया भट्ट यांनी मारली बाजी, कंगना राणावतचा पत्ता कट

    क्रिती सेनन आणि आलिया भट्ट यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींचा पुरस्कार मिळाला आहे. गंगूबाई काठियावाडी आणि मिमी या चित्रपटांसाठी हे पुरस्कार मिळाले आहेत.

  • 24 Aug 2023 06:08 PM (IST)

    National awards 2023 live updates | RRR चित्रपट मारतोय बाजी

    सर्वोत्कृष्ट स्टंट दिग्दर्शन पुरस्कार – RRR (स्टंट कोरिओग्राफर – किंग सॉलोमन)

    सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स – RRR (स्पेशल इफेक्ट्स क्रिएटर – व्ही श्रीनिवास मोहन)

    सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन – RRR (कोरियोग्राफर- प्रेम रक्षित)

  • 24 Aug 2023 06:06 PM (IST)

    National awards 2023 live updates | गंगुबाई काठियावाडी आणि आरआरआर चित्रपटांचा जलवा सुरूच

    सर्वोत्कृष्ट मेकअप आर्टिस्ट – गंगुबाई काठियावाडी

    सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझायनर – सरदार उधम सिंह

    सर्वोत्कृष्ट छायांकन – सरदार उधम सिंग

    सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन – पुष्पा / आरआरआर

    सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझायनर – सरदार उधम सिंग

    सर्वोत्कृष्ट संपादन – गंगुबाई काठियावाडी

  • 24 Aug 2023 06:04 PM (IST)

    National awards 2023 live updates | द काश्मीर फाइल्सचा जलवा कायम

    राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी पुरस्कार – द काश्मीर फाइल्स

    सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा मान- RRR

    सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म- रॉकट्री: द नंबी इफेक्ट

  • 24 Aug 2023 05:59 PM (IST)

    National awards 2023 live updates | पुष्पा चित्रपटाने मारली बाजी

    देवी श्री प्रसाद यांना पुष्पा चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक पुरस्कार मिळाला आहे.  अल्लू अर्जुन मुख्य भूमिकेत असलेल्या पुष्पा चित्रपटासाठी देवी श्री प्रसाद यांना सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक म्हणून हा पुरस्कार देण्यात आलाय. 

  • 24 Aug 2023 05:57 PM (IST)

    National awards 2023 live updates | संजय लीला भन्साळी यांना मिळाला हा पुरस्कार

    गंगूबाई काठियावाडीसाठी संजय लीला भन्साळी यांना सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शित केल्याबद्दल पुरस्कार मिळाला आहे. गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आहेत. 

  • 24 Aug 2023 05:54 PM (IST)

    National awards 2023 live updates | शेरशाह चित्रपटाने मारली बाजी

    शेरशाह चित्रपटाला मिळाला, विशेष ज्युरी पुरस्कार 

  • 24 Aug 2023 05:48 PM (IST)

    National awards 2023 live updates | सरदार उधम सिंहने जिंकला फीचर चित्रपट पुरस्कार

    सरदार उधम सिंहने हिंदी फीचर चित्रपट पुरस्कार जिंकला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शूजित सरकार यांनी केले होते. 

  • 24 Aug 2023 05:43 PM (IST)

    National awards 2023 live updates | नॉन-फीचर चित्रपट श्रेणीतील विजेत्यांची यादी

    69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा सुरू आहे. नॉन-फीचर चित्रपट श्रेणीतील खालीलप्रमाणे विजेत्यांच्या नावाची यादी

    सर्वोत्कृष्ट नॉन-फीचर चित्रपट – एक था गाव (गढवाली आणि हिंदी)

    सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – बकुअल मतियानी, स्माइल प्लीज (हिंदी) चित्रपटासाठी

    कौटुंबिक मूल्यांवरील सर्वोत्कृष्ट चित्रपट – चंद सांसे (हिंदी)

    सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर – बिट्टू रावत

    सर्वोत्कृष्ट अन्वेषणात्मक चित्रपट – लुकिंग फॉर चालान (इंग्रजी)

    सर्वोत्कृष्ट शैक्षणिक चित्रपट – सिरपिगालिन सिपांगल (तमिळ)

    सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट – मिठू दी (इंग्रजी), थ्री टू वन (मराठी आणि हिंदी)

    सर्वोत्कृष्ट पर्यावरण चित्रपट – मुन्नम वालावू (मल्याळम)

    सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट- एकदा काय झालं

  • 24 Aug 2023 05:32 PM (IST)

    National Awards 2023 LIVE | या तीन अभिनेत्याची नावे जोरदार चर्चेत

    एक्स (ट्विटर) वर 69 व्या राष्ट्रीय पुरस्कारांसाठी काही नावाची जोरदार चर्चेत रंगताना दिसत आहे. यामध्ये दावा केला जात आहे की, यापैकी एकालाच पुरस्कार हा मिळू शकतो. यामध्ये राम चरण, अल्लू अर्जुन आणि जूनियर एनटीआर यांना चाहते सपोर्ट करताना दिसत आहेत. 

  • 24 Aug 2023 05:27 PM (IST)

    National Awards 2023 Winners LIVE | अनुराग ठाकूर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांच्या नावाची करणार घोषणा

    अनुराग ठाकूर हे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांच्या नावाची घोषणा करणार आहेत. नुकताच ज्युरीने संपूर्ण यादी ही अनुराग ठाकूर यांच्याकडे दिलीये. 

  • 24 Aug 2023 05:10 PM (IST)

    National Awards 2023 LIVE | राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारमध्ये दिसू शकतो RRR चा जलवा

    राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये राजमोली यांच्या RRR चित्रपटाचा जलवा हा बघायला मिळू शकतो. सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार हा RRR चित्रपटालाच मिळणार असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

  • 24 Aug 2023 05:05 PM (IST)

    National Film Awards 2023 LIVE | गेल्या वर्षी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार या अभिनेत्याला मिळाला

    गेल्या वर्षी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार हा बाॅलिवूड अभिनेता अजय देवगण याला मिळाला होता. यंदा बाॅलिवूडचे कलाकार काय धमाका करतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे. 

  • 24 Aug 2023 05:02 PM (IST)

    69th National Film Awards 2023 LIVE | नेमकी कधी झाली राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची सुरूवात

    राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची सुरूवात ही 1954 पासून झालीये. हा भारतातील चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. विशेष म्हणजे भारताचे राष्ट्रपती हा पुरस्कार विजेत्यांना प्रदान करतात.

  • 24 Aug 2023 04:58 PM (IST)

    National Awards 2023 LIVE | सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या शर्यतीत कोण मारणार अखेर बाजी

    69 व्या राष्ट्रीय पुरस्कारामध्ये मोठी स्पर्धा ही बघायला मिळत आहेत. मात्र, यामध्ये कंगना राणावत आणि आलिया भट्ट यांचे नाव टाॅपला आहे. गंगूबाई काठियावाडीसाठी आलियाला हा पुरस्कार मिळू शकतो असे सांगितले जात आहे. 

  • 24 Aug 2023 04:54 PM (IST)

    National Film Awards 2023 LIVE | राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्यामध्ये बघायसा मिळणार शर्यत 

    राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांची मोठी टक्कर या  राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये बघायला मिळणार आहे. आरआरआर फेम राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्याही नावाचा समावेश हा राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या शर्यतीत आहे. 

  • 24 Aug 2023 04:33 PM (IST)

    National Awards 2023 LIVE | आलिया भट्ट आणि कंगना राणावतमध्ये होणार काटे की टक्कर

    अवघ्या काही वेळामध्येच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारला सुरूवात होणार आहे. या पुरस्कारांमध्ये कोण बाजी मारणार हे अगदी थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. आलिया भट्ट आणि कंगना राणावतमध्ये मुकाबला होण्याची दाट शक्यता आहे.

Published On - Aug 24,2023 4:30 PM

Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.