Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nikhat Khan: आमिर खानची बहीण निखत खान टेलिव्हिजनवर पदार्पण करण्यास सज्ज

येत्या 30 मे पासून ही मालिका स्टार प्लस वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचप्रमाणे डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही प्रेक्षकांना ही मालिका पाहता येणार आहे. टेलिव्हिजनवर पदार्पण करण्यापूर्वी निखत यांनी काही चित्रपटांमध्येही काम केलंय.

Nikhat Khan: आमिर खानची बहीण निखत खान टेलिव्हिजनवर पदार्पण करण्यास सज्ज
Aamir Khan's sister Nikhat KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 29, 2022 | 11:53 AM

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खानची (Aamir Khan) बहीण निखत खान (Nikhat Khan) लवकरच टेलिव्हिजनवर पदार्पण (TV debut) करणार आहे. ‘बन्नी चाऊ होम डिलिव्हरी’ या मालिकेत त्या भूमिका साकारणार आहेत. या मालिकेत उल्का गुप्ता आणि प्रविष्ट मिश्रा यांच्या मुख्य भूमिका असून निखत आणि ज्येष्ठ अभिनेते राजेंद्र चौल यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. येत्या 30 मे पासून ही मालिका स्टार प्लस वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचप्रमाणे डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही प्रेक्षकांना ही मालिका पाहता येणार आहे. टेलिव्हिजनवर पदार्पण करण्यापूर्वी निखत यांनी काही चित्रपटांमध्येही काम केलंय. ‘मिशन मंगल’, ‘सांड की आँख’, ‘तान्हाजी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिक साकारल्या आहेत. अभिनयाशिवाय त्या निर्मिती श्रेत्रातही सक्रिय आहेत. वडील ताहिर हुसैन यांच्या ‘तुम मेरे हो’ या चित्रपटाच्या निर्मितीसाठी निखत यांनी मदत केली होती, ज्यामध्ये आमिर खानचीही भूमिका होती.

टेलिव्हिजन पदार्पणाविषयी ‘झूम टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत निखत म्हणाल्या, “स्टार प्लस या वाहिनीवर मी माझं टेलिव्हिजन पदार्पण करण्यासाठी अत्यंत उत्सुक आहे. प्रेक्षकांच्या मनात स्वत:ची जागा निर्माण करण्यासाठी ही मला मिळालेली सुवर्णसंधी आहे. मालिकेचं कथानक जसजसं पुढे जाईल, तसतसं प्रेक्षकांना माझ्या भूमिकेचा अंदाज येईल.”

हे सुद्धा वाचा

पहा मालिकेचा प्रोमो-

View this post on Instagram

A post shared by StarPlus (@starplus)

“अपने स्वादिष्ट खाने से जीत लेती है सबका दिल और अपने दबंग अंदाज से कर देती है दुष्मनों की छुट्टी. ऐसी है हमारी बन्नी”, असं कॅप्शन देत निखत यांनी आपल्या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट केला. एकीकडे निखत टेलिव्हिजनवर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत, तर दुसरीकडे आमिर खान जवळपास चार वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे. त्याचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट येत्या ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित होणार असून त्याचा ट्रेलर आयपीएलच्या फिनालेदरम्यान लाँच करण्यात येणार आहे. ‘लाल सिंग चड्ढा’ हा 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फॉरेस्ट गम्प’ या अमेरिकन चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. यामध्ये आमिरसोबत करीना कपूर खान, मोना सिंग, नाग चैतन्य यांच्याही भूमिका आहेत.

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.