Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मेल आला आणि अभिनेत्री तडक पोलीस ठाण्यात गेली… काय घडलं? का घाबरली?

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि अभिनेत्री एंजेल रायला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याने त्यांनी बांगूर नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. धमक्यांच्या ईमेल आणि मेसेजमुळे त्यांची मानसिक स्थिती बिघडली आहे. पोलिसांनी आयपीसी आणि आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मेल आला आणि अभिनेत्री तडक पोलीस ठाण्यात गेली... काय घडलं? का घाबरली?
Social media influencer and actress Angel RaiImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 23, 2025 | 9:19 PM

सोशल मीडिया एन्फ्लून्सर आणि अभिनेत्री एंजेल राय ही सध्या मोठ्या अडचणीत सापडली आहे. एंजेलच्या जीवाला धोका आहे. तसा दावा तिने केला आहे. मला सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्यामुळे मी त्रस्त आहे. घाबरलेले आहे. या धमक्यांना घाबरल्याने मी कायदेशीर मदत घेतली आहे. संबंधित व्यक्तीच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे, असं एंजेलने म्हटलंय. एंजेल मुंबईतील बांगूर नगरमध्ये राहते.

एंजेल रायने बांगूर नगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात एफआयआर नोंदवला आहे. पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून कार्यवाही करत अज्ञात व्यक्तीच्याव विरोधात एफआयआर नोंदवला आहे. मला गेल्या काही दिवसांपासून धमकीचे ईमेल येत आहेत. त्याशिवाय मला आपत्तीजनक आणि अश्लील मेसेज पाठवले जात आहे. त्यामुळे मानसिक स्थिती खराब झाली आहे, असं एंजेलने तक्रारीत म्हटलं आहे.

धमकावने सुरूच आहे 

एंजेलच्या दाव्यानुसार, आरोपीने तिला जिवंत जाळण्याची आणि गंभीर नुकसान पोहोचवण्याची धमकी दिली आहे. आरोपीने वारंवार या धमक्या दिल्या आहेत. धमकी देणाऱ्याचं वागणं आधी वेगळं होतं. पण नुकतीच घोटाला या वेब सीरीजचा ट्रेलर आल्याने धमक्यांची संख्या अधिक प्रमाणात वाढली आहे, असं तिने म्हटलं आहे.

पोलीसांनी घेतली गंभीर दखल

मला वारंवार धमक्या मिळाल्याने मी घाबरले होते. मी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन भारतीय दंड संहिता (आयपीसी)च्या कलम 75, 78, 79, 351(3), 352, 356(2) आणि आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. तसेच आरोपीची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहे.

View this post on Instagram

A post shared by Angel Rai (@angelrai07)

सायबर गुन्हे वाढले

या प्रकरणाने पुन्हा एकदा वाढत्या सायबर आणि ऑनलाइन धमक्यांबाबतची चिंता वाढली आहे. अनेक सेलिब्रिटीज आणि सोशल मीडिया एन्फ्ल्यूएंसर्सना या पूर्वीही धमक्या मिळाल्या आहेत. एंजेलला धमकी देणाऱ्या आरोपीला आम्ही लवकरात लवकर अटक करणार आहोत. त्यासाठी आम्ही डीजिटल फॉरेन्सिक टीमची मदत घेणार आहोत, असं पोलिसांनी सांगितलं.

ऑनलाई धमक्या आल्यास काय करायचं ?  

या घटनेनंतर स्वत: एंजेलने तिच्या चाहत्यांना आवाहन केलं आहे. तुम्ही सतर्क राहा आणि कोणत्याही ऑनलाई धमक्या किंवा छळाचा प्रकार आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क करा. कायदेशीर मदत घेणं हाच या सर्वांवरचा उपाय आहे. घाबरून गप्प राहण्यापेक्षा त्याविरोधात आवाज उठवला पाहिजे, असं तिने म्हटलं आहे.

गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा.
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा.
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला.