Anant Ambani-Radhika Merchant Wedding Live: 9.30 ला अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट घेणार सात फेरे…

| Updated on: Jul 16, 2024 | 8:37 PM

Anant Ambani-Radhika Merchant Wedding Live Event Coverage News Updates in Marathi: अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांच्या लग्नाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होती. शुक्रवारी दोघांचं लग्न मोठ्या थाटात पार पडत आहे. दोघांना आशीर्वाद देण्यासाठी अनेक दिग्गज व्यक्ती आणि सेलिब्रिटी देखील लग्न सोहळ्यात उपस्थित राहाणार आहेत...

Anant Ambani-Radhika Merchant Wedding Live: 9.30 ला अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट घेणार सात फेरे...

भारतातील नामवंत उद्योगपती आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी यांचं 12 जुलै 2024 मध्ये मोठ्या शाही थाटात लग्न होत आहे. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट त्यांच्या नात्याला पती – पत्नीचं नाव देत आहे. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांच्या मुलाचं लग्न असलेल्यामुळे देश – विदेशातील पाहुणे अनंत – राधिका यांच्या लग्नाचे साक्षीदार होणार आहेत. शिवाय बॉलिवूड सेलिब्रिटींची मांदियाळी दिसणार आहे…

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 13 Jul 2024 12:05 AM (IST)

    अनंत अंबानी आणि राधिकाच्या लग्नात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची हजेरी

    अनंत अंबानी राधिकाच्या लग्नात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, अखिलेश यादव, प्रफुल्ल पटेल पोहोचले आहेत.

  • 12 Jul 2024 11:30 PM (IST)

    अंबानी कुटुंबातील विवाह सोहळ्याला गांधी कुटुंब अनुपस्थित

    अंबानी कुटुंबातील विवाह सोहळ्याला गांधी कुटुंबीय अनुपस्थित आहे. सोनिया गांधी यांनी लिखित संदेश पाठवला आहे. मुकेश अंबानी यांनी दिल्लीत येऊन सोनिया गांधी यांना निमंत्रण दिलं होतं.

  • 12 Jul 2024 08:08 PM (IST)

    बॉलिवूड कलाकारांची धमाल

    अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात बालिवूड कलाकार धमाल करताना दिसत आहेत, अनिल कपूर यांचा डान्सचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

  • 12 Jul 2024 07:34 PM (IST)

    प्रियांका चोप्रा आणि निक जोनस जबरदस्त लूकमध्ये

    अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला प्रियांका चोप्रा आणि निक जोनस हे पोहोचले आहेत.

  • 12 Jul 2024 07:27 PM (IST)

    हार्दिक पांड्या गुलाबी शेरवानीत पोहोचला

    अनंत-राधिकाच्या लग्नाला हार्दिक पांड्याही पोहोचला आहे. गुलाबी शेरवानीमध्ये हार्दिक पोहोचला आहे. 

  • 12 Jul 2024 06:59 PM (IST)

    मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचे फोटो पुढे

    अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न सुर आहे. त्यामध्येच आता मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचे फोटो पुढे आले आहेत.

  • 12 Jul 2024 06:55 PM (IST)

    माधुरी दीक्षितपासून ते प्रियांका चोप्रापर्यंत हे कलाकार अंबानींच्या लग्नात दाखल

    करण जोहर, माधुरी दीक्षित, दिशा पटानी, आर्यन खान, सुहाना खान, पतीसोबत प्रियांका चोप्रा अनंत आणि राधिकाच्या लग्नाला पोहोचले.

  • 12 Jul 2024 06:37 PM (IST)

    रजनीकांत लग्नात दाखल

    रजनीकांत हे देखील अनंत राधिकाच्या लग्नाला त्यांच्या कुटुंबासोबत पोहोचले आहेत. 

  • 12 Jul 2024 06:15 PM (IST)

    अनिल कपूर, वरुण धवन अनंतच्या लग्नासाठी दाखल

    अनिल कपूर, वरुण धवन, कृती सेनन, बोनी कपूर आले.

  • 12 Jul 2024 05:20 PM (IST)

    विवाहस्थळी पोहोचले अंबानी कुटुंबीय

    अनंत अंबानी – राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्यासाठी अंबानी कुटुंबीय विवाहस्थळी पोहोचले आहेत.

  • 12 Jul 2024 05:15 PM (IST)

    अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नात जॉन सिनाचा ‘देसी लूक’

    अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नात जॉन सिनाचा ‘देसी लूक’; पापाराझींसमोर फोटोसाठी दिली खास पोझ

  • 12 Jul 2024 03:55 PM (IST)

    Anant Radhika Wedding: थोड्याच वेळात वरात पोहोचणार जिओ वर्ल्ड सेंटरला

    अंबानी आणि पाहुणे जिओ वर्ल्ड सेंटरला रवाना झाले. थोड्याच वेळात वरात जिओ वर्ल्ड सेंटरला पोहोचणार आहे..

  • 12 Jul 2024 03:26 PM (IST)

    3 वाजता वरात, 8 वाजता वरमाळा.. अनंत-राधिकाच्या लग्नाचं संपूर्ण शेड्युल

    अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शाही लग्नसोहला मुंबईतील बीकेसीमधील जियो कन्वेंशन सेंटरमध्ये पार पडणार आहे. या लग्नाचं संपूर्ण वेळापत्रक कसं असेल त्याची माहिती समोर आली आहे. वाचा संपूर्ण बातमी..

  • 12 Jul 2024 03:08 PM (IST)

    Anant Radhika Wedding: लग्नात उपस्थित नाही राहाणार अभिनेता अक्षय कुमार

    अनंत – राधिका यांच्या लग्नात अभिनेता अक्षय कुमार उपस्थित राहाणार नसल्याची माहिती मिळत आहे. कारण अभिनेत्याला कोरोनाची लागण झाली आहे.

  • 12 Jul 2024 02:54 PM (IST)

    Anant Radhika Wedding: नव्या नवरीच्या रुपात फुललं राधिका मर्चंट यांचं सौंदर्य, अंबानींची लहान सून म्हणजे सौंदर्याची खाण

    अनंत अंबानी यांची होणारी पत्नी राधिका मर्चंट यांचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान रंगत आहेत. सोशल मीडियावर राधिका यांचे फोटो तुफान व्हायरल होत आहे… पाहा फोटो

  • 12 Jul 2024 01:28 PM (IST)

    भारती एंटरप्रायझेसचे संस्थापक आणि अध्यक्ष सुनील भारती मित्तल मुंबईत दाखल

    अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी भारती एंटरप्रायझेसचे संस्थापक आणि अध्यक्ष सुनील भारती मित्तल मुंबईत दाखल झाले आहेत.

  • 12 Jul 2024 01:05 PM (IST)

    Anant Radhika Wedding: अनंत – राधिका यांच्या लग्नाचा खर्च 70 – 80 कोटी नाही तर, इतक्या हजार कोटींचा खर्च

    Anant Radhika Wedding: अनंत – राधिका यांच्या लग्नाचा खर्च 70 – 80 कोटी नाही तर, इतक्या हजार कोटींचा खर्च, मुकेश अंबानी यांनी लहान मुलाच्या लग्नात केलाय पाण्यासारखा खर्च…, लग्नानंतर पुढील तीन दिवस रंगणार कार्यक्रम, सर्वत्र अनंत – राधिका यांच्या लग्नाची चर्चा… वाचा सविस्तर

  • 12 Jul 2024 12:33 PM (IST)

    मुलगा तेजस्वी यादवसह लालू प्रसाद यादव हे लग्नासाठी रवाना

    पाटणा: अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नासाठी लालू प्रसाद यादव हे कुटुंबीयांसह रवाना झाले आहेत.

  • 12 Jul 2024 12:00 PM (IST)

    अनंत-राधिकाच्या लग्नापूर्वी नीता अंबानींचा व्हिडीओ समोर

    मुलगा अनंत अंबानीच्या लग्नापूर्वी रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाह सोहळ्यात वाराणसी या पवित्र शहराला अंबानी कुटुंब विशेष वंदन करणार आहेत.

  • 12 Jul 2024 10:56 AM (IST)

    Anant Ambani-Radhika Merchant Wedding: लग्नात अनेक चविष्ट पदार्थ, तोंडाला सुटेल पाणी

    राधिका मर्चंट – अनंत अंबानी यांच्या लग्नाचा शाही थाट… पाहुण्यासाठी अनेक चविष्ट पदार्थ, पदार्थांची नावे ऐकून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी…, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त राधिका – अनंत यांच्या लग्नाची चर्चा… वाचा सविस्तर…

  • 12 Jul 2024 10:54 AM (IST)

    सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे कार्यकारी अध्यक्ष मुंबईत पोहोचले

    अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नासाठी सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे कार्यकारी अध्यक्ष जय वाय. ली* काल रात्री मुंबईत पोहोचले.

  • 12 Jul 2024 10:43 AM (IST)

    सचिन तेंडुलकर पोहोचला अनंत अंबानीच्या लग्नाला

    अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या लग्नासाठी मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर पोहोचला जियो वर्ल्ड सेंटरमध्ये..

  • 12 Jul 2024 08:17 AM (IST)

    Anant Ambani-Radhika Merchant Wedding: प्रियांका चोप्रा भारतात दाखल

    अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात सहभागी होण्यासाठी अभिनेत्री प्रियांका चोप्रा भारतात दाखल झाली आहे. अभिनेत्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • 12 Jul 2024 07:13 AM (IST)

    Anant Ambani-Radhika Merchant Wedding: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नासाठी मोठी तयारी

    अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नासाठी मोठी तयारी करण्यात आली आहे. सध्या सोशल मीडियावर सुरु असलेल्या तयारीचे व्हिडीओ आणि फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

Published On - Jul 12,2024 7:10 AM

Follow us
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुपलं, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुपलं, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....