Pallabi Dey: 21 वर्षीय अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू; राहत्या घरी आढळला मृतदेह

पल्लवीला (Pallabi Dey) गळफास घेतलेल्या अवस्थेत सर्वप्रथम तिच्या पार्टनरने पाहिलं. तिला पाहताच तो जोरात किंचाळला. तेव्हा घरकाम करणाऱ्यालाही पल्लवीच्या मृत्यूबाबत समजलं. घरकाम करणाऱ्यानेच पोलिसांना तिच्या मृत्यूची माहिती दिली.

Pallabi Dey: 21 वर्षीय अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू; राहत्या घरी आढळला मृतदेह
Pallabi DeyImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 16, 2022 | 9:55 AM

बंगाली टेलिव्हिजन अभिनेत्री (Bengali Actress) पल्लवी डे (Pallabi Dey) हिचा राहत्या घरी मृतदेह आढळला. पल्लवी दक्षिण कोलकातामध्ये (Kolkata) भाड्याच्या घरात राहायची. याच घरात रविवारी ती मृतावस्थेत आढळली. ‘पीटीआय’ने दिलेल्या वृत्तानुसार, पल्लवी 21 वर्षांची होती. पल्लवीला रुग्णालयात दाखल केलं तेव्हाच ती मृतावस्थेत होती, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ‘पीटीआय’शी बोलताना दिली. एप्रिल महिन्यात पल्लवीने साऊथ कोलकातामधील गार्फा परिसरात भाड्याने घर घेतलं होतं. या घरात ती तिच्या प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. पल्लवीच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

पल्लवीला गळफास घेतलेल्या अवस्थेत सर्वप्रथम तिच्या पार्टनरने पाहिलं. तिला पाहताच तो जोरात किंचाळला. तेव्हा घरकाम करणाऱ्यालाही पल्लवीच्या मृत्यूबाबत समजलं. घरकाम करणाऱ्यानेच पोलिसांना तिच्या मृत्यूची माहिती दिली. “आम्ही सर्व बाजूंनी तपास करतोय. सध्या आम्ही तिच्या पार्टनरशी बोलून नेमकं काय आणि कसं घडलं याची चौकशी करतोय. शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच अधिक माहिती मिळू शकेल”, असं पोलीस म्हणाले. पल्लवीने अनेक बंगाली मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या होत्या. ‘कुंजा छाया’, ‘रेशम झापी’, ‘मन माने ना’ यांसारख्या मालिकांमध्ये तिने काम केलं.

काही दिवसांपूर्वीच तमिळ आणि मल्याळम चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री सहाना हिचा राहत्या घरी मृतदेह आढळला होता. वाढदिवसच तिचा अखेरचा दिवस ठरला होता. खिडकीच्या रेलिंगला लटकलेल्या अवस्थेत सहानाचा मृतदेह आढळला. याप्रकरणीही पोलिसांचा तपास सुरू असून त्यांनी सहानाचा पती सज्जादला ताब्यात घेतलंय.

हे सुद्धा वाचा

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....