Bigg Boss 16: स्पर्धकांवर भारी पडणार ‘बिग बॉस’; नव्या प्रोमोनंतर उत्सुकता शिगेला

बिग बॉसच्या घरात नियम नाहीत म्हणजे यंदा आणखी भांडणं आणि वाद-विवाद पहायला मिळतील, असा अंदाज नेटकरी वर्तवत आहेत. काहींनी कंगना रनौतच्या 'लॉकअप' या शोला कॉपी केल्याचाही आरोप केला आहे.

Bigg Boss 16: स्पर्धकांवर भारी पडणार 'बिग बॉस'; नव्या प्रोमोनंतर उत्सुकता शिगेला
सलमान खानImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 13, 2022 | 2:57 PM

छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रिॲलिटी शो ‘बिग बॉस’चा 16 वा (Bigg Boss 16) सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सोळाव्या सिझनचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. नव्या सिझननुसार नवे नियम या शोमध्ये असतील, असा अंदाज प्रेक्षकांना होता. मात्र बिग बॉस 16 मध्ये कोणतेच नियम नसतील, असं या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे. कलर्स टीव्हीने (Colors TV) हा नवीन टीझर पोस्ट केला आहे.

बिग बॉसच्या सेटवर काम करणाऱ्या क्रू मेंबर्सने या प्रोमोची सुरुवात होते. ‘रुल ये है की कोई रुल नहीं है,’ असं सलमान म्हणतो. या प्रोमोवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. बिग बॉसच्या घरात नियम नाहीत म्हणजे यंदा आणखी भांडणं आणि वाद-विवाद पहायला मिळतील, असा अंदाज नेटकरी वर्तवत आहेत. काहींनी कंगना रनौतच्या ‘लॉकअप’ या शोला कॉपी केल्याचाही आरोप केला आहे.

हे सुद्धा वाचा

आणखी एका प्रोमोमध्ये सलमान म्हणतो, “इन 15 सालों मे सबने खेला अपना अपना खेल, लेकीन अब बारी है बिग बॉस के खेलने की.” हे प्रोमो पाहून चाहत्यांमध्ये सोळाव्या सिझनविषयी आणखी उत्सुकता वाढली आहे. या सिझनमध्ये कोणते सेलिब्रिटी झळकणार याची चर्चा सुरू झाली आहे. अर्जुन बिजलानी, दिव्यांका त्रिपाठी, शिवांगी जोशी, टिना दत्ता, पुनम पांडे, जन्नत झुबैर यांसारख्या सेलिब्रिटींच्या नावांची चर्चा आहे.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

लॉक अप या शोचा विजेता मुनव्वर फारुखीसुद्धा या सिझनमध्ये हजेरी लावणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्याचप्रमाणे तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील बबिता अर्थात मुनमुन दत्ता आणि फैजल शेख यांनाही शोची ऑफर गेल्याचं कळतंय.

2006 पासून बिग बॉस हा शो सुरू झाला. तेव्हापासून त्यातील भांडणांमुळे आणि प्रेमप्रकरणांमुळे हा शो नेहमीच चर्चेत राहिला आहे. बिग बॉसच्या पंधराव्या सिझनचं विजेतेपद अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने पटकावलं होतं.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.