Bigg boss ott season 2 winner LIVE | ‘बिग बाॅस ओटीटी 2’च्या ट्रॉफीवर कोरले एल्विश यादवने नाव, यूट्यूबरवर शुभेच्छांचा वर्षाव

| Updated on: Aug 15, 2023 | 7:33 AM

Bigg boss ott 2 finale live winner updates : बिग बाॅस ओटीटी 2 चा आज ग्रँड फिनाले आहे. कोण होणार विजेता याबद्दल चाहत्यांमध्ये उत्साह बघायला मिळत आहे. अभिषेक मल्हान आणि एल्विश यादव यांच्यामध्ये मोठी चुरस बघायला मिळत आहे. सलमान खान शो होस्ट करताना दिसणार आहे.

Bigg boss ott season 2 winner LIVE | ‘बिग बाॅस ओटीटी 2’च्या ट्रॉफीवर कोरले एल्विश यादवने नाव, यूट्यूबरवर शुभेच्छांचा वर्षाव
Bigg boss ott

मुंबई : ‘बिग बाॅस ओटीटी 2’चा आज ग्रँड फिनाले पार पडणार आहे. पाच टाॅप सदस्यांपैकी एकजण बिग बाॅसचा विजेता होईल. बिग बाॅस ओटीटी 2 (Bigg Boss OTT 2) च्या ग्रँड फिनालेला सलमान खान (Salman Khan) हा होस्ट करताना दिसणार आहे. एल्विश यादव आणि अभिषेक मल्हान यांच्यामध्ये विजेतेपदासाठी टक्कर होताना दिसत आहे. एल्विश यादव, अभिषेक मल्हान, पूजा भट्ट, बेबिका धुर्वे आणि मनीषा राणी हे टाॅप 5 मध्ये आले आहेत. 14 ऑगस्ट 2023 रोजी म्हणजेच आज सोमवारी रात्री 9 वाजता बिग बाॅस ओटीटीचा फिनाले सुरू होणार आहे. बिग बॉस ओटीटी 2 चा ग्रँड फिनाले (Grand Finale) JioCinema वर स्ट्रीम केला जाईल. चाहत्यांमध्ये या ग्रँड फिनालेबद्दल मोठी क्रेझ बघायला मिळत आहे. 

बिग बॉस ओटीटी 2 च्या ग्रँड फिनालेला (Bigg boss ott 2 finale winner live) बाॅलिवूडचे स्टार हजेरी लावणार आहेत. विशेष म्हणजे शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांचा जलवा हा बघायला मिळणार आहे. गायक टोनी कक्कड आणि असीस कौर यांचे लाईव्ह परफॉर्मेंस देखील बिग बाॅसच्या मंचावर होणार आहेत. महेश भट्ट यांची लेक आणि बिग बाॅस ओटीटी 2 ची टाॅप 5 मध्ये सहभागी झालेली पूजा भट्ट धमाकेदार डान्स करताना दिसणार आहे. बिग बाॅस ओटीटी 2 च्या विजेत्याला 12 लाख रूपये मिळणार आहेत. 

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 15 Aug 2023 12:05 AM (IST)

    Bigg boss ott season 2 winner LIVE : बिग बाॅसच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच हे घडले

    बिग बाॅसच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असे घडले आहे की, वाईल्ड कार्ड आलेल्या स्पर्धेकाने बिग बाॅस जिंकले आहे. एल्विश याने बिग बाॅस ओटीटी 2 चा विजेता होत मोठा इतिहास लिहिला आहे. 

  • 14 Aug 2023 11:29 PM (IST)

    Bigg boss ott season 2 winner LIVE : ‘बिग बाॅस ओटीटी 2’च्या ट्रॉफीवर एल्विश यादवचे नाव

    बिग बाॅस ओटीटीचा विजेता एल्विश यादव हा झाला आहे. एल्विश यादव याला अभिषेक मल्हान याच्या तुलनेत जास्त मत मिळाली आहेत. एल्विश यादव याला 25 लाख रूपये देखील मिळाले आहेत.

  • 14 Aug 2023 11:16 PM (IST)

    Bigg boss ott 2 finale live : एल्विश यादव ‘बिग बाॅस ओटीटी 2’चा विजेता

    एल्विश यादव बिग बाॅस ओटीटी 2 चा विजेता झाला आहे. सलमान खान याने एल्विश यादव याच्या नावाची घोषणा केली आहे. विजेत्याला 25 लाखांची बक्षिस मिळाले आहे.

  • 14 Aug 2023 11:11 PM (IST)

    Bigg boss ott season 2 winner LIVE : एल्विश यादव आणि मनिषा राणी यांचा धमाकेदार डान्स

    बिग बाॅस ओटीटी 2च्या मंचावर आता एल्विश यादव आणि मनिषा राणी हे डान्स करताना दिसत आहेत. धमाकेदार वातावरण बिग बाॅस ओटीटी 2 च्या मंचावर दिसत आहे.

  • 14 Aug 2023 11:07 PM (IST)

    bigg boss ott season 2 winner LIVE : एल्विश यादव आणि अभिषेक मल्हान यांचे मंचावर आगमन

    बिग बाॅस ओटीटी 2च्या मंचावर आता एल्विश यादव आणि अभिषेक मल्हान यांचे आगमन झाले आहे. बिग बाॅसच्या घरातून एल्विश यादव आणि अभिषेक मल्हान यांना मंचावर सलमान खान याने बोलावले आहे.

  • 14 Aug 2023 11:01 PM (IST)

    फलक नाज आणि अविनाश सचदेव यांचा धमाकेदार डान्स

    फलक नाज आणि अविनाश सचदेव यांचा एक धमाकेदार डान्स नुकताच पार पडला आहे. या डान्समध्ये धमाका करताना अविनाश सचदेव हा दिसला आहे.

  • 14 Aug 2023 10:52 PM (IST)

    Bigg Boss OTT 2 Finale Live : बिग बाॅस ओटीटीला मिळाले टाॅप 2 फायनलिस्ट

    बिग बाॅस ओटीटीला आता टाॅप 2 फायनलिस्ट मिळाले आहेत. मनीषा राणी हिचा प्रवास आता संपला आहे. एल्विश यादव आणि अभिषेक मल्हान यांच्यापैकी एकजण बिग बाॅस ओटीटी 2 चा विजेता ठरणार आहे.

  • 14 Aug 2023 10:47 PM (IST)

    Bigg boss ott 2 finale live : मनीषा राणी हिचा ‘बिग बाॅस ओटीटी 2’मधील प्रवास संपला

    एल्विश यादव आणि अभिषेक मल्हान हे बिग बाॅस ओटीटी 2 चे फायनलिस्ट झाले आहेत. मनीषा राणी ही बिग बाॅस ओटीटीच्या घरातून आता बाहेर पडलीये.

  • 14 Aug 2023 10:37 PM (IST)

    Bigg boss ott 2 finale live : सलमान खान याने केला जबरदस्त असा डान्स

    नुकतात सलमान खान हा त्याच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटातील बिल्ली बिल्ली या गाण्यावर डान्स करताना दिसला आहे. सलमान खान याने धमाकेदार असा डान्स केला आहे.

  • 14 Aug 2023 10:31 PM (IST)

    आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे ‘बिग बाॅस ओटीटी 2’च्या मंचावर

    ड्रीम गर्ल 2 चित्रपटाची टीम बिग बाॅस ओटीटी 2 मध्ये प्रमोशन करण्यासाठी आलीये. आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे हे बिग बाॅस ओटीटी 2 फिनालेच्या मंचावर पोहचले आहेत. 

  • 14 Aug 2023 10:12 PM (IST)

    Bigg boss ott 2 finale live : पूजा भट्ट हिच्यानंतर बेबिका धुर्वे ‘बिग बाॅस ओटीटी 2’मधून बाहेर

    पूजा भट्ट हिच्यानंतर आता बेबिका धुर्वे हे बिग बाॅस ओटीटी 2 मधून बाहेर पडली आहे. सलमान खान याने फायनलिस्ट यांच्या वडिलांना स्टेजवर बोलावले होते.

  • 14 Aug 2023 10:07 PM (IST)

    Bigg boss ott 2 finale live : कृष्णा अभिषेक याने केली ग्रँड फिनालेमध्ये धमाल

    कृष्णा अभिषेक आणि पूजा भट्ट यांची धमाल बिग बाॅस ओटीटी 2 फिनालेमध्ये दिसत आहे. इतकेच नाही तर चक्क लग्नासाठी कृष्णा अभिषेक याने पूजा भट्ट हिला प्रपोज केल्याचे दिसत आहे. यावेळी महेश भट्ट देखील उपस्थित आहेत. 

  • 14 Aug 2023 10:02 PM (IST)

    Bigg Boss OTT 2 Live Updates : अभिषेक मल्हान ‘बिग बाॅस ओटीटी 2’च्या घरात परतला

    तब्येत खराब असल्याने रूग्णालयात उपचार सुरू असलेला अभिषेक मल्हान हा नुकताच आता बिग बाॅस ओटीटी 2 च्या घरामध्ये परतला आहे. अभिषेकला पाहून त्याच्या चाहत्यांमध्ये मोठा आनंद झाल्याचे बघायला मिळत आहे. 

  • 14 Aug 2023 09:54 PM (IST)

    Bigg boss ott 2 live : पूजा भट्ट बिग बाॅस ओटीटीच्या विजेतेपदाच्या रेसमधून बाहेर 

    बिग बाॅसच्या घरातून बाहेर पडणारी पहिली फायनलिस्ट पूजा भट्ट ही ठरली आहे. सलमान खान याने पूजा भट्ट हिला बिग बॉस ओटीटी 2 च्या घरातून बाहेर येण्यास सांगितले.

  • 14 Aug 2023 09:47 PM (IST)

    Bigg boss ott 2 finale live : पूजा भट्ट आणि बेबीका धुर्वे यांचा धमाकेदार डान्स

    पूजा भट्ट आणि बेबीका धुर्वे यांनी धमाकेदार असा डान्स फिनालेमध्ये केला आहे. पूजा भट्ट आणि बेबीका धुर्वे यांच्यामध्ये एक खास मैत्री ही बिग बाॅस ओटीटी 2 च्या घरात बघायला मिळालीये. 

  • 14 Aug 2023 09:44 PM (IST)

    Bigg boss ott season 2 winner LIVE : पूजा भट्ट आणि बेबीका धुर्वे यांच्या मैत्रीबद्दल सलमान खानचे मोठे भाष्य

    बिग बाॅस ओटीटी 2 च्या फिनालेला सुरूवात झालीये. यावेळी घरातील सदस्यांसोबत संवाद साधताना सलमान खान हा दिसला आहे. यावेळी सलमान खान पूजा भट्ट आणि बेबीका धुर्वे यांच्या मैत्रीबद्दल बोलताना दिसत आहे. 

  • 14 Aug 2023 09:37 PM (IST)

    Bigg boss ott 2 finale live : सलमान खान याचा फायनलिस्टसोबत संवाद

    सलमान खान हा फायनलिस्टसोबत संवाद साधताना दिसत आहे. एल्विश यादव, अभिषेक मल्हान, पूजा भट्ट, मनीषा राणी, बेबिका धुर्वे यांच्यासोबत सलमान खान हा चर्चा करत आहे. 

  • 14 Aug 2023 09:29 PM (IST)

    Bigg boss ott season 2 winner LIVE : ‘बिग बाॅस ओटीटी 2’चे फायनलिस्ट झाले भावूक

    नुकताच आता बिग बाॅसचे फायनलिस्ट हे भावूक झाल्याचे बघायला मिळाले. बिग बाॅस ओटीटी 2 च्या पहिल्या दिवसाची आठवण काढताना यावेळी घरातील सदस्य दिसले. 

  • 14 Aug 2023 09:20 PM (IST)

    Bigg boss ott 2 finale live : बादशाहची बिग बाॅस ओटीटीच्या फिनालेमध्ये एन्ट्री

    रॅपर बादशाह याची बिग बाॅस ओटीटीमध्ये एन्ट्री झालीये. घरातील सदस्यांनी बादशाहच्या गाण्यावर डान्स केला आहे. घरातील सदस्यांचे काैतुक करताना बाहशाह दिसतोय. 

  • 14 Aug 2023 09:16 PM (IST)

    Bigg boss ott 2 finale live : अभिषेक मल्हान याच्या आरोग्याबद्दल सलमान खान याने दिली मोठी अपडेट

    अभिषेक मल्हान हा बिग बाॅस ओटीटी 2 चा विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मात्र, त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. फिनालेमध्ये सलमान खान हा अभिषेक याच्या आरोग्याबद्दल अपडेट देताना दिसला आहे. सलमान खान याने सांगितले की, अभिनेथ मल्हान याची तब्येत बरी नाहीये. मात्र, तो काही वेळामध्ये फिनालेमध्ये पोहचू शकतो असेही सांगण्यात आलंय. 

  • 14 Aug 2023 09:10 PM (IST)

    Bigg boss ott 2 finale live : सलमान खान आणि महेश भट्ट यांची गळाभेट

    नुकताच महेश भट्ट यांनी जबरदस्त असा डान्स केला आहे. यावेळी पूजा भट्ट आणि महेश भट्ट हे डान्स करताना दिसले. विशेष म्हणजे सलमान खान याने महेश भट्ट यांच्यासोबत गळाभेट घेतली आहे.

  • 14 Aug 2023 09:09 PM (IST)

    Bigg boss ott 2 live : महेश भट्ट यांनी केला जबरदस्त डान्स

    बिग बाॅस ओटीटी 2 च्या फिनालेला सुरूवात झाली असून थेट महेश भट्ट यांनी डान्स केल्याचे दिसत आहे. महेश भट्ट यांनी पूजा भट्ट हिच्यासोबत जबरदस्त असा डान्स केला आहे.

  • 14 Aug 2023 09:06 PM (IST)

    Bigg boss ott season 2 LIVE : बिग बाॅस ओटीटी 2 च्या ग्रँड फिनालेला सुरूवात

    बिग बाॅस ओटीटी 2 च्या ग्रँड फिनालेला सुरूवात झालीये. बिग बाॅसच्या घरातील सर्वच सदस्य धमाकेदार डान्स करताना दिसले आहेत.

  • 14 Aug 2023 09:01 PM (IST)

    Bigg boss ott 2 finale live | बिग बाॅस ओटीटी 2 च्या ग्रँड फिनालेला काही मिनिटांमध्ये होणार सुरूवात

    आता अगदी काही मिनिटांमध्ये बिग बाॅस ओटीटी 2 च्या ग्रँड फिनालेला सुरूवात होणार आहे. सलमान खान याची जबरदस्त एन्ट्री होताना दिसेल. अखेर चाहते गेल्या काही दिवसांपासून वाट पाहत असलेला क्षण अखेर आलाय.

  • 14 Aug 2023 08:58 PM (IST)

    Bb ott season 2 winner updates : बिग बाॅस ओटीटी 2 च्या फिनालेमध्ये सहभागी होणार महेश भट्ट

    बिग बाॅस ओटीटी 2 च्या फिनालेमध्ये महेश भट्ट यांची देखील हजेरी बघायला मिळणार आहे. पूजा भट्ट हिच्या सपोर्टसाठी महेश भट्ट फिनालेला उपस्थित राहणार आहेत. काही दिवसांपूर्वीच महेश भट्ट हे बिग बाॅस ओटीटी 2 मध्ये लेकीला भेटण्यासाठी आले होते.

  • 14 Aug 2023 08:55 PM (IST)

    Bigg boss ott 2 finale live : शाहरुख खान आणि दीपिका ‘बिग बाॅस ओटीटी 2’च्या फिनालेमध्ये करणार धमाल

    बिग बाॅस ओटीटी 2 मध्ये शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण हे त्यांच्या आगामी जवान चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी येणार आहेत. विशेष म्हणजे यावेळी शाहरुख खान हा घरातील सदस्यांसोबत धमाल करताना दिसणार आहे.

  • 14 Aug 2023 08:53 PM (IST)

    Bigg boss ott season 2 LIVE : ‘बिग बॉस OTT 2’चे टॉप 5 फायनलिस्ट आहेत हे 

    बिग बॉस OTT 2 ला 5 फायनलिस्ट अखेर मिळाले आहेत. यामुळे पूजा भट्ट, एल्विश यादव, मनीषा राणी, बेबिका आणि अभिषेक मल्हान यांच्या नावाचा समावेश आहे. 

  • 14 Aug 2023 08:31 PM (IST)

    Bigg boss ott 2 finale live : ‘बिग बाॅस ओटीटी 2’च्या विजेते पदासाठी प्रबळ दावेदार असणारा अभिषेक मल्हान आहे कोट्यावधी संपत्तीचा मालक 

    बिग बाॅस ओटीटी 2 च्या विजेते पदासाठी प्रबळ दावेदार असणारा अभिषेक मल्हान हा कोट्यावधी संपत्तीचा मालक असून त्याच्याकडे अनेक महागड्या गाड्यांचे देखील कलेक्शन आहे. 

  • 14 Aug 2023 08:00 PM (IST)

    Bb ott season 2 winner updates : हे असू शकतात ‘बिग बाॅस ओटीटी 2’चे टॉप 3

    कृष्णा अभिषेक आणि एल्विश यादव यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. यामुळे या दोघांपैकीच विजेता होईल, असे सांगितले जात आहे. तसेच टॉप 3 मध्ये पूजा भट्ट हिचा समावेश होऊ शकते, असे सांगितले जात आहे. 

  • 14 Aug 2023 06:57 PM (IST)

    Bigg boss ott season 2 LIVE : ग्रँड फिनालेमध्ये दिसणार फलक नाझ आणि अविनाश सचदेव यांची केमिस्ट्री

    बिग बॉसच्या घरात अविनाश सचदेव आणि फलक नाझ यांच्यामध्ये अत्यंत चांगली बाँडिंग बघायला मिळाली. विशेष म्हणजे ग्रँड फिनालेमध्ये यांचा जबरदस्त असा डान्स बघायला मिळणार आहे. यामुळे चाहत्यांमध्ये उत्साह दिसत आहे. 

Published On - Aug 14,2023 6:52 PM

Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.