Bigg Boss OTT 2 विजेत्याला मिळणार तब्बल इतके लाख रुपये; बक्षिसासोबतच आयुष्यभर मोफत मिळणार ‘ही’ गोष्ट
आता बिग बॉसच्या घरात अभिषेक मल्हान ऊर्फ फुकरा इन्सान, एल्विश यादव, मनिषा राणी, पूजा भट्ट आणि बेबिका धुर्वे हे पाच स्पर्धक राहिले आहेत. यापैकी अभिषेक हा ग्रँड फिनालेमध्ये पोहोचणारा सर्वांत पहिला स्पर्धक आणि बिग बॉसच्या घरातील शेवटचा कॅप्टन ठरला आहे.
मुंबई | 11 ऑगस्ट 2023 : बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सिझनमध्ये आता फक्त टॉप 5 स्पर्धक राहिले असून येत्या 14 ऑगस्ट रोजी त्याचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. यंदाचा सिझन पहिल्या एपिसोडपासूनच सोशल मीडियावर चर्चेत आहे. यातील स्पर्धकांचा ड्रामा, नवनवीन टास्क आणि एलिमिनेशन यांमुळे प्रत्येक एपिसोड अधिकाधिक मनोरंजक होत आहे. गेल्या दीड महिन्यापासून हा शो सुरू आहे. अभिनेता सलमान खान त्याचं सूत्रसंचालन करत असून आता लवकरच या शोला विजेता मिळणार आहे.
‘बिग बॉस ओटीटी 2’चे फायनिस्ट
गेल्या आठवड्यातील ‘वीकेंड का वार’ एपिसोडमध्ये दोन जण बेघर झाले. जद हदिद आणि अविनाश सचदेव हे दोघं बिग बॉसच्या घराबाहेर पडले. त्यानंतर आठवड्याच्या मधेच जिया शंकरलाही शो सोडावा लागला. त्यानंतर आता बिग बॉसच्या घरात अभिषेक मल्हान ऊर्फ फुकरा इन्सान, एल्विश यादव, मनिषा राणी, पूजा भट्ट आणि बेबिका धुर्वे हे पाच स्पर्धक राहिले आहेत. यापैकी अभिषेक हा ग्रँड फिनालेमध्ये पोहोचणारा सर्वांत पहिला स्पर्धक आणि बिग बॉसच्या घरातील शेवटचा कॅप्टन ठरला आहे.
विजेत्याला मिळणारी रक्कम
दरवर्षी बिग बॉसच्या विजेत्याला चांगली रक्कम बक्षीस म्हणून दिली जाते. यावर्षी ‘बिग बॉस ओटीटी 2’च्या विजेत्याला बारा लाख रुपयांची रोख रक्कम मिळणार आहे. यासोबतच ट्रॉफी दिली जाणार आहे. निर्मात्यांकडून बक्षिसाची रक्कम अद्याप जाहीर करण्यात आली नाही. मात्र एका एपिसोडमध्ये मनिषा राणी ही अभिषेकसोबत गप्पा मारत असताना रकमेचा उल्लेख करते. रकमेसोबतच विजेत्याला त्याच्या संपूर्ण आयुष्यासाठी किराण्याचं सामान मोफत मिळणार आहे.
कुठे आणि कधी पाहू शकता ग्रँड फिनाले?
‘बिग बॉस ओटीटी 2’चा ग्रँड फिनाले जिओ सिनेमा या ॲपवर मोफत पहायला मिळणार आहे. येत्या 14 ऑगस्ट रोजी (सोमवारी) हा ग्रँड फिनाले पार पडणार असून सलमान खान विजेत्याचं नाव घोषित करणार आहे. रात्री 9 वाजल्यापासून हा ग्रँड फिनाले सुरू होणार आहे.