Video : शाहरुख खान याने घेतले लालबागच्या राजाचे दर्शन, लेक अबराम दिसला किंग खान याच्यासोबत

बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा गेल्या काही दिवसांपासून सतत त्याच्या चित्रपटांमुळे जोरदार चर्चेत आहे. शाहरुख खान याचा जवान हा चित्रपट मोठा धमाका करताना दिसला. आता लवकरच शाहरुख खान याचा डंकी चित्रपट रिलीज होईल.

Video : शाहरुख खान याने घेतले लालबागच्या राजाचे दर्शन, लेक अबराम दिसला किंग खान याच्यासोबत
Follow us
| Updated on: Sep 22, 2023 | 11:21 AM

मुंबई : बाॅलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या चित्रपटांमुळे जोरदार चर्चेत आहे. शाहरुख खान याचा जवान हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी रिलीज झालाय. शाहरुख खान याच्या जवान (Jawan) चित्रपटाने ओपनिंग डेलाच धमाका केला. या चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड कमाईमध्ये तोडले. शाहरुख खान याच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल मोठी क्रेझ ही बघायला मिळाली.

शाहरुख खान याचे एका मागून एक चित्रपट रिलीज होणार असल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये एक उत्साहाचे वातावरण बघायला मिळतंय. शाहरुख खान याने तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले. 2019 मध्ये शाहरुख खान याचा झिरो हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली.

झिरो चित्रपटात शाहरुख खान याच्यासोबत अनुष्का शर्मा ही मुख्य भूमिकेत दिसली. मात्र, या जोडीला धमाका करण्यात यश मिळाले नाही आणि चित्रपट फ्लाॅप गेला. झिरो चित्रपट फ्लाॅप गेल्यापासून शाहरुख खान मोठ्या पडद्यापासून दूर होता. शेवटी त्याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून दणदणीत पद्धतीने पुनरागमन केले. अगोदर पठाण, जवान आणि काही दिवसांमध्येच डंकी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

शाहरुख खान हा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या चित्रपटांचे प्रमोशन करताना दिसतोय. नुकताच आता शाहरुख खान हा लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहचला. विशेष म्हणजे यावेळी शाहरुख खान याच्यासोबत त्याचा मुलगा अबराम खान देखील दिसला. यावेळी शाहरुख खान हा गणपती बाप्पाचे दर्शन घेताना दिसला.

पांढऱ्या रंगाच्या शर्टमध्ये शाहरुख खान याचा जबरदस्त असा लूक दिसला. शाहरुख खान याला पाहून लोकांनी मोठी गर्दी केली. यावेळी शाहरुख खान याला बाप्पाचा फोटो देखील भेट देण्यात आला. सोशल मीडियावर याचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसले. जवान हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर शाहरुख खान हा वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी देखील गेला.

शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर मोठ्या वादाला तोंड फुटले होते. शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाला मोठ्या प्रमाणात विरोध केला गेला. इतकेच नाही तर अनेक ठिकाणी शाहरुख खान याच्या चित्रपटाच्या विरोधात आंदोलने देखील करण्यात आली. दीपिका पादुकोण हिने भगव्या रंगाची बिकिनी घातल्याने वादाला तोंड फुटले होते.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.