Brahmastra: ‘या’ 10 कारणांमुळे ‘ब्रह्मास्त्र’च्या बॉयकॉटची होतेय मागणी
यामध्ये रणबीर-आलियासोबतच अमिताभ बच्चन, नागार्जुन अक्किनेनी आणि मौनी रॉय यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटावर आणि आलियावर बहिष्कार का टाकला जात आहे, त्याची कारणं जाणून घेऊयात..
सोशल मीडियावर सध्या बॉयकॉटचा (Boycott) ट्रेंडच सुरू आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचा ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ आली आहे. तर दुसरीकडे ट्विटरवर #BoycottAliaBhatt आणि #BoycottBrahmastra असा ट्रेंड सुरू झाला. हा चित्रपट येत्या 9 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये रणबीर-आलियासोबतच अमिताभ बच्चन, नागार्जुन अक्किनेनी आणि मौनी रॉय यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटावर आणि आलियावर बहिष्कार का टाकला जात आहे, त्याची कारणं जाणून घेऊयात..
- आलिया भट्ट स्टारकिड असल्याने तिला नेटकऱ्यांकडून विरोध केला जात आहे. घराणेशाहीला प्रोत्साहन देऊ नये असं त्यांचं मत आहे. याशिवाय ट्रोलर्सनी महेश भट्ट आणि सोनी राजदान यांच्या जुन्या वक्तव्यांवरून आलियावर निशाणा साधला आहे.
- ब्रह्मास्त्र या चित्रपटातील आलियाच्या किसिंग सीनवरूनही बॉयकॉटची मागणी केली जात आहे. हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप काही नेटकऱ्यांनी केला आहे.
- काही दिवसांपूर्वी आलियाने बॉयकॉट ट्रेंडवर प्रतिक्रिया दिली होती. “मी स्टारकिड आहे आणि ही बाब मी बदलू शकत नाही. ज्यांना माझा चित्रपट पाहायला नसेल, त्यांनी पाहू नये”, असं ती म्हणाली होती. तिच्या या वक्तव्याचाही राग नेटकरी ब्रह्मास्त्रवर काढत आहेत.
- काही नेटकऱ्यांनी ‘सडक 2’वरून आलियाला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
- आलियाच्या ब्रिटीश नागरिकत्वाचाही मुद्दा नेटकऱ्यांनी बॉयकॉट ट्रेंडमध्ये उपस्थित केला.
- रणबीर कपूर ब्रह्मास्त्रमध्ये शिवाची भूमिका साकारत आहे. त्यावरून नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा निर्माते आणि आलिया भट्टवर हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. किसिंग सीनवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
- मी पाकिस्तानात राहणं पसंत करते, असं वक्तव्य सोनी राजदान यांनी केलं होतं. यावरूनही नेटकऱ्यांनी आलियावर निशाणा साधला.
- रणबीर कपूरच्या गोमांसाबद्दलच्या जुन्या वक्तव्यावरूनही ट्रोल केलं जात आहे.
- बॉयकॉटचा ट्रेंड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर सुरू झाला. आता ब्रह्मास्त्रमध्ये अमिताभ बच्चन यांचीही भूमिका आहे. बिग बींनी सुशांतला कधीच पाठिंबा दिला नाही, असा आरोप करत नेटकऱ्यांनी चित्रपटावर बहिष्काराची मागणी केली.
- आलिया भट्ट, पूजा भट्ट आणि महेश भट्ट यांच्या जुन्या फोटोंवरूनही नेटकऱ्यांनी निशाणा साधला आहे.