Aamir Khan: “माझं देशावर खूप प्रेम”; लाल सिंग चड्ढावर बहिष्कार टाकण्याची मागणी करणाऱ्यांना आमिरचं आवाहन

हॉलिवूड चित्रपट 'फॉरेस्ट गम्प'चा हिंदी रिमेक असलेल्या लाल सिंग चड्ढा या चित्रपटाविरोधात सोशल मीडियावर नेटकरी कमेंट करत आहेत, त्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी करत आहेत.

Aamir Khan: माझं देशावर खूप प्रेम; लाल सिंग चड्ढावर बहिष्कार टाकण्याची मागणी करणाऱ्यांना आमिरचं आवाहन
Aamir KhanImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Aug 01, 2022 | 5:42 PM

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) आणि अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) यांचा आगामी चित्रपट ‘लाल सिंग चड्ढा’ (Laal Singh Chaddha) सध्या वादात सापडला आहे. हॉलिवूड चित्रपट ‘फॉरेस्ट गम्प’चा हिंदी रिमेक असलेल्या लाल सिंग चड्ढा या चित्रपटाविरोधात सोशल मीडियावर नेटकरी कमेंट करत आहेत, त्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी करत आहेत. आमिर खानने 2015 मध्ये केलेल्या एका वक्तव्यामुळे त्याच्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी होत आहे. या वादावर आता आमिरने प्रतिक्रिया दिली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आमिर त्याच्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याच्या विषयावर व्यक्त झाला. बोलले आहे. एका प्रश्नादरम्यान आमिर म्हणाला, “लोकांना वाटतं की या देशाबद्दल माझ्या मनात प्रेम नाही. पण तसं अजिबात नाही. मला वाईट वाटतं की लोक माझ्या चित्रपटावर बहिष्कार घालत आहेत. कृपया असं करू नका. थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट पहा”

2015 मध्ये असहिष्णुतेवर केलेल्या वक्तव्यामुळे आमिर खानच्या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी करण्यात आली होती. लाल सिंग चड्ढा या चित्रपटाद्वारे आमिर तब्बल चार वर्षांनी बॉलिवूडमध्ये पुनरागमन करत आहे. अशा परिस्थितीत ट्विटरवर त्याचं जुनं वक्तव्य पुन्हा शेअर करत काही लोक त्याच्यावर निशाणा साधत आहेत. ज्यामध्ये तो म्हणाला होता की, “भारत हा देश खूप सहिष्णू आहे, पण काही लोक इखं असहिष्णुता पसरवण्याचं काम करत आहेत.” त्याच्या या जुन्या विधानामुळे सोशल मीडियावर ट्रोलर्स त्याला देशद्रोही म्हणत आहेत.

हे सुद्धा वाचा

नेटकऱ्यांचा विरोध

11 ऑगस्टला प्रदर्शित होतोय चित्रपट

आमिर खान आणि करीना कपूर यांचा आगामी चित्रपट लाल सिंह चड्ढा हा 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. मात्र प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाबाबतच्या या गदारोळाचा चित्रपटावर किती परिणाम होतो, हे प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल. लाल सिंग चड्ढा या चित्रपटात आमिर खान आणि करीना कपूर यांच्याशिवाय मोना सिंग, नाग चैतन्य यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.