Shraddha Kapoor: श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत पोलिसांच्या ताब्यात; ड्रग्ज घेतल्याचा आरोप

एम. जी. रोडवरील एका हॉटेलमध्ये ड्रग्जचा वापर होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्यांनी त्या हॉटेलवर छापा टाकला. ड्रग्जचं सेवन केलं की नाही हे तपासण्यासाठी तिथल्या काही जणांची चाचणी करण्यात आली.

Shraddha Kapoor: श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत पोलिसांच्या ताब्यात; ड्रग्ज घेतल्याचा आरोप
Siddhanth Kapoor. Shraddha KapoorImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jun 13, 2022 | 10:23 AM

अभिनेत्री श्रद्धा कपूरचा (Shraddha Kapoor) भाऊ सिद्धांत कपूरला (Siddhanth Kapoor) बेंगळुरू पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणी (drug abuse) ताब्यात घेतलं आहे. रविवारी रात्री बेंगळुरूमध्ये झालेल्या एका पार्टीत त्याने ड्रग्जचं सेवन केल्याचा आरोप आहे. एम. जी. रोडवरील एका हॉटेलमध्ये ड्रग्जचा वापर होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्यांनी त्या हॉटेलवर छापा टाकला. ड्रग्जचं सेवन केलं की नाही हे तपासण्यासाठी तिथल्या काही जणांची चाचणी करण्यात आली. यावेळी इतर सहा जणांसोबत श्रद्धा कपूरच्या भावाचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला. त्यांनी आधीच ड्रग्जचं सेवन करून हॉटेलमध्ये प्रवेश केला की हॉटेलमध्ये आल्यानंतर ड्रग्ज घेतलं, हे अद्याप अस्पष्ट असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करत असताना बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरण समोर आलं होतं. यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांची नावं उघड झाली होती. त्यावेळी श्रद्धा कपूरसह, रकुल प्रीत सिंग, दीपिका पदुकोण, सारा अली खान या अभिनेत्रींचीही एनसीबीमार्फत चौकशी करण्यात आली होती. मात्र या प्रकरणात पुढे काहीच झालं नाही.

हे सुद्धा वाचा

सिद्धांत कपूर पोलिसांच्या ताब्यात-

पहा फोटो-

दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीय सिंग यांच्यासह अनेक कलाकारांची एनसीबीने गेल्या वर्षी चौकशी केली होती. पण पुढे त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. सुशांतची माजी मॅनेजर जया साहा हिने एनसीबीकडून होणाऱ्या चौकशीत मोठा खुलासा केला होता. अभिनेत्री श्रद्धा कपूरसाठी ऑनलाइन सीबीडी ऑईल मागवल्याची कबुली तिने दिली होती. एनसीबीने चौकशीदरम्यान तिचे श्रद्धासोबतचे व्हॉट्सॲप चॅट्स दाखवले होते आणि सीबीडी ऑईलबद्दल प्रश्न विचारला होता. त्यावर ते चॅट खरे असून श्रद्धा कपूरला सीबीडी ऑईल पुरवल्याची कबुली जयाने दिली होती.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.