Akshay Kumar: हेअरड्रेसरच्या निधनाने अक्षय कुमार भावूक; मराठमोळ्या सहकाऱ्यासाठी लिहिली पोस्ट

मिलन हा गेल्या 15 वर्षांपासून अक्षयसोबत काम करत होते. त्याच्या निधनाने अक्षयला मोठा धक्का बसला आहे. मिलन हा आपल्यात नाहीत, यावर अजूनही त्याचा विश्वास बसत नाहीये.

Akshay Kumar: हेअरड्रेसरच्या निधनाने अक्षय कुमार भावूक; मराठमोळ्या सहकाऱ्यासाठी लिहिली पोस्ट
Akshay Kumar's hairdresser Milan Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 12, 2022 | 3:02 PM

अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) हेअरड्रेसर (hairdresser) मिलन जाधव (Milan Jadhav) याचं नुकतंच निधन झालं. मिलन हा गेल्या 15 वर्षांपासून अक्षयसोबत काम करत होता. त्याच्या निधनाने अक्षयला मोठा धक्का बसला आहे. मिलन हा आपल्यात नाहीत, यावर अजूनही त्याचा विश्वास बसत नाहीये. अक्षयने ट्विट करत मिलनच्या निधनाबद्दल सांगितलं. ‘मिलन हा सेटवर माझं सर्वकाही होता’, अशा शब्दांत अक्षयने भावना व्यक्त केल्या आहेत.

‘अनोखी हेअरस्टाइल आणि हास्यामुळे तू गर्दीतही ओळखून यायचा. माझा एकही केस इकडचा तिकडे होणार नाही याची काळजी तू नेहमी घेतलीस. माझ्या सेटची जान, 15 वर्षांहून अधिक काळ माझा हेअरड्रेसर म्हणून काम पाहिलेला मिलन जाधव. तू आम्हाला सोडून गेलास यावर अजूनही विश्वास बसत नाहीये. मला तुझी खूप आठवण येईल मिलन’, असं अक्षयने लिहिलं. यासोबतच त्याने मिलनसोबतचा फोटो पोस्ट केला.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

अक्षयचा कटपुतली हा चित्रपट नुकताच ओटीटीवर प्रदर्शित झाला. ‘रत्नासन’ या तमिळ चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. यामध्ये अक्षयसोबत रकुल प्रीत सिंग, चंद्रचूड सिंग आणि सरगुन मेहता यांच्याही भूमिका आहेत. अक्षय लवकरच राम सेतू या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय ‘कॅप्सूल गिल’ आणि ‘ओह माय गॉड 2’ हे चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहेत.

यावर्षी अक्षयचे तीन चित्रपट आतापर्यंत प्रदर्शित झाले आणि हे तिन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कामगिरी करू शकले नाहीत. ‘बच्चन पांडे’, ‘सम्राट पृथ्वीराज’, ‘अतरंगी रे’ हे त्याचे चित्रपट दणक्यात आपटले.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.