Alia Bhatt: लग्नानंतर 2 महिन्यांतच आलिया भट्ट प्रेग्नंट; लवकरच देणार ‘गुड न्यूज’

अभिनेत्री आलिया भट्टने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. 'आमचं बाळ.. लवकरच येत आहे' असं कॅप्शन देत आलियाने रुग्णालयातील फोटो पोस्ट केला आहे.

Alia Bhatt: लग्नानंतर 2 महिन्यांतच आलिया भट्ट प्रेग्नंट; लवकरच देणार 'गुड न्यूज'
Alia BhattImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 27, 2022 | 11:38 AM

अभिनेत्री आलिया भट्टने (Alia Bhatt) इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. ‘आमचं बाळ.. लवकरच येत आहे’ असं कॅप्शन देत आलियाने रुग्णालयातील फोटो पोस्ट केला आहे. आलियाने गरोदर (Alia Bhatt Pregnant) असल्याचं जाहीर केलं असून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आलियाने पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये तिच्यासोबत रणबीर कपूर (Ranbir Kapoor) दिसत आहे. अल्ट्रासाऊंड करतानाचा हा फोटो असून स्क्रीनवर तिने हृदयाचा इमोजी पोस्ट केला आहे. तर आलिया स्क्रीनकडे आनंदाने पाहताना दिसत आहे. रणबीर तिच्या बेडच्या बाजूलाच बसलेला आहे. बॉलिवूडमधील सेलिब्रिटींसह चाहतेसुद्धा या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

रणबीरची बहीण रिधिमा कपूर सहानी, आलियाची आई सोनी राजदान, अभिनेत्री परिणीती चोप्रा, प्रियांका चोप्रा, करण जोहर, टायगर श्रॉफ, वाणी कपूर, रकुल प्रीत सिंग, मौनी रॉय यांसारख्या सेलिब्रिटींनी कमेंट करत आलिया-रणबीरला शुभेच्छा दिल्या आहेत. रणबीर कपूर आणि आलिया भट्टने 14 एप्रिल रोजी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत मुंबईतल्या ‘वास्तू’ बंगल्यावर लग्नगाठ बांधली. रणबीर-आलियाने साधेपणानं केलेल्या लग्नाची कलाविश्वात खूप चर्चा झाली.

हे सुद्धा वाचा

पहा फोटो

काहींनी हे चित्रपटाचं प्रमोशन तर नाही ना, असाही प्रश्न उपस्थित केला आहे. ‘ब्रह्मास्त्रच्या प्रमोशनसाठी ही युक्ती असावी’, असं एका युजरने म्हटलंय. एप्रिलमध्ये लग्न झाल्याने दोन महिन्यांतच आलियाने प्रेग्नंसी जाहीर केल्याने चाहत्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. 2018 मध्ये ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाच्या शूटिंगनिमित्त रणबीर-आलिया एकत्र आले. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांच्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. पाच वर्षे डेट केल्यानंतर दोघांनी लग्नगाठ बांधली. रणबीर आणि आलिया हे 2020 मध्येच लग्न करणार होते. मात्र रणबीरचे वडील ऋषी कपूर यांची तब्येत बिघडल्याने त्यांनी लग्न पुढे ढकललं. त्यातच ऋषी कपूर यांचं कर्करोगाने निधन झालं. त्यांच्या निधनानंतर दोन वर्षांनी आलिया आणि रणबीरने लग्न केलं.

याआधी अभिनेत्री नेहा धुपियानेही लग्नाच्या सहा महिन्यांतच गरोदर असल्याचं जाहीर केलं होतं. लग्नापूर्वीच प्रेग्नंट असल्याचं तिने नंतर मुलाखतींमध्ये स्पष्ट केलं. अभिनेत्री ॲमी जॅक्सननेही बॉयफ्रेंडशी साखरपुडा केल्यानंतर लगेचच गरोदर असल्याची बातमी दिली. तर अभिनेता अर्जुन कपूरची गर्लफ्रेंड लग्नापूर्वीच गरोदर होती. तिने 2019 मध्ये बाळाला जन्म दिला. मात्र त्या दोघांनी अद्याप लग्न केलं नाही. अभिनेत्री कल्की कोचलीननेही लग्नापूर्वी बाळाला जन्म दिला.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.