Ranveer Singh: रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवर आलिया भट्टची प्रतिक्रिया, म्हणाली “मी ते सहनच करू..”

अभिनेता अर्जुन कपूरने या फोटोशूटवर प्रतिक्रिया दिली होती, तर आता 'गली बॉय'मध्ये रणवीरसोबत काम करणारी अभिनेत्री आलिया भट्टने (Alia Bhatt) न्यूड फोटोशूटवर प्रतिक्रिया दिली आहे.

Ranveer Singh: रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवर आलिया भट्टची प्रतिक्रिया, म्हणाली मी ते सहनच करू..
Ranveer Singh: रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवर आलिया भट्टची प्रतिक्रियाImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 25, 2022 | 5:24 PM

अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) गेल्या काही दिवसांपासून एका मासिकासाठी केलेल्या न्यूड फोटोशूटमुळे (Nude Photoshoot) चर्चेत आहे. या फोटोंमध्ये रणवीर कॅमेऱ्यासमोर न्यूड पोझ देताना दिसत आहे. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल झाल्यापासून नेटकरी त्याला सतत ट्रोल करत आहेत. पण सोशल मीडियावर सर्व टीका होऊनही त्याचे मित्र आणि इंडस्ट्रीतील सहकलाकार रणवीरला पाठिंबा देताना दिसत आहेत. अभिनेता अर्जुन कपूरने या फोटोशूटवर प्रतिक्रिया दिली होती, तर आता ‘गली बॉय’मध्ये रणवीरसोबत काम करणारी अभिनेत्री आलिया भट्टने (Alia Bhatt) न्यूड फोटोशूटवर प्रतिक्रिया दिली आहे.

आलियाने रणवीरचा केला बचाव

आलिया भट्टने तिच्या आगामी ‘डार्लिंग्स’ या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवर प्रतिक्रिया दिली. एका पत्रकाराने आलियाला या फोटोंवरून होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल प्रश्न विचारला तेव्हा आलियाने त्याने बचाव करताना सांगितलं की, “मला माझ्या आवडत्या रणवीर सिंगबद्दल काहीही नकारात्मक ऐकायला आणि बोलायला आवडत नाही. कलाकार म्हणून मला तो नेहमी आवडतो आणि तो फक्त माझाच नाही तर अनेकांना आवडता अभिनेता आहे. रणवीरने बॉलिवूडमध्ये अप्रतिम चित्रपटात काम केले आहेत, त्यामुळे आपण त्याला फक्त प्रेम दिलं पाहिजे.”

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ-

अर्जुन कपूरची प्रतिक्रिया

आलियापूर्वी अभिनेता अर्जुन कपूरने रणवीरच्या बाजूने प्रतिक्रिया दिली होती. न्यूड फोटोशूटवर प्रतिक्रिया देताना अर्जुन म्हणाला होता, “रणवीर कधीच दिखावा करत नाही. जर तुम्ही रणवीर सिंगला 11-12 वर्षांपासून ओळखत असाल तर तुम्हाला हे देखील माहित असेल की तो जे काही करतो तो त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग आहे. त्याने जे काही केलं ते त्याची निवड, त्याचा सोशल मीडिया आणि त्याला जे काही सोयीचं वाटतं त्यानुसार केलं. मला वाटतं की आपण त्याचा आदर केला पाहिजे.”

‘डार्लिंग’ या दिवशी होणार रिलीज

आलिया भट्टने तिच्या प्रॉडक्शन हाऊसच्या पहिल्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला. डार्लिंग्ज हा चित्रपट येत्या 5 ऑगस्ट रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचं झालं तर एका मुलीभोवती फिरणारी ही कथा आहे जी तिच्या पतीच्या शोधात असते. या चित्रपटात आलियासह शेफाली शाह, विजय वर्मा, रोशन मॅथ्यू आणि राजेश शर्मा हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.