Alia Bhatt: ‘स्टुडंट ऑफ द इअर’साठी आलियाला मिळालं होतं इतकं मानधन; चेक घेऊन ती थेट..

करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर' (Student Of The Year) या चित्रपटातून आलियाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि या चित्रपटामुळेच तिला ओळख मिळाली. पण या पहिल्यावहिल्या चित्रपटासाठी तिला किती मानधन मिळालं हे तुम्हाला माहिती आहे का?

Alia Bhatt: 'स्टुडंट ऑफ द इअर'साठी आलियाला मिळालं होतं इतकं मानधन; चेक घेऊन ती थेट..
Alia BhattImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 21, 2022 | 12:03 PM

अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या तिच्या ‘डार्लिंग्स’ (Darlings) या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. या चित्रपटातील तिच्या दमदार अभिनयाचं खूप कौतुक होत आहे. याआधी ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटातील अभिनयासाठीही तिची वाहवा झाली होती. आलिया लवकरच हॉलिवूडमध्येही झळकणार आहे. तिच्या हॉलिवूड चित्रपटाचं शूटिंग नुकतंच पार पडलंय. करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ (Student Of The Year) या चित्रपटातून आलियाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि या चित्रपटामुळेच तिला ओळख मिळाली. पण या पहिल्यावहिल्या चित्रपटासाठी तिला किती मानधन मिळालं हे तुम्हाला माहिती आहे का? आलिया भट्ट ही प्रसिद्ध चित्रपट निर्माते महेश भट्ट आणि अभिनेत्री सोनी राजदान यांची मुलगी आहे. अवघ्या 19 व्या वर्षी आलियाने करिअरमधला पहिला चित्रपट साईन केला होता. पदार्पणाच्या चित्रपटात तिच्यासोबत वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​दिसले होते. आता या पहिल्या चित्रपटासाठी आलियाला किती मानधन मिळालं, याचा खुलासा तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे.

आलियाची पहिली कमाई

‘मिड डे’ला दिलेल्या मुलाखतीत आलियाने सांगितलं की, “‘स्टुडंट ऑफ द इयर’साठी तिला 15 लाख रुपये मिळाले होते. मात्र ते पैसे तिने वापरले नाहीत. तो चेक घेऊन आलियाने आई सोनी राजदान यांच्याकडे सुपूर्द केला. ती म्हणते, ‘मी तो चेक थेट आईकडे दिला होता आणि तिला खूप प्रेमाने सांगितलं, मम्मा, आता हे पैसे तुम्हीच सांभाळा आणि त्या दिवसापासून आजपर्यंत माझी आई माझे सर्व व्यवहार सांभाळते.”

हे सुद्धा वाचा

या चित्रपटासाठी आलिया भट्टने 20 किलो वजन कमी केलं होतं

2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातून करण जोहरवर घराणेशाहीला प्रोत्साहन दिल्याचा आरोपही करण्यात आला होता. त्याचवेळी आलियाने या सिनेमासाठी 500 लोकांसोबत ऑडिशन दिलं होतं, त्यानंतर तिची निवड झाली. शनायाच्या भूमिकेसाठी तिला 20 किलो वजन कमी करावं लागलं होतं.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.