‘मुझे घर जाना है’, Liger मधील अनन्या पांडेच्या अभिनयावरून भन्नाट मीम्स व्हायरल; पोट धरून हसाल!
बॉलिवूडमध्ये इतर अनेक दमदार कलाकार असताना करण जोहरने अनन्या पांडेलाच का निवडलं, असा प्रश्नही नेटकरी उपस्थित करत आहेत. ट्विटरवर अनन्या पांडेच्या नावाने हॅशटॅग ट्रेंड होत असून तिच्यावरून हास्यास्पद मीम्स व्हायरल होत आहेत.
दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonada) आणि बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) यांचा ‘लायगर’ (Liger) हा बहुचर्चित चित्रपट 25 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. सोशल मीडियावर जेवढी या चित्रपटाची चर्चा होती आणि ज्या पद्धतीने चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करण्यात आलं, त्यानंतर या चित्रपटाने थिएटरमध्ये प्रेक्षकांची पार निराशा केली. लायगर पाहिल्यानंतर नाराज झालेले प्रेक्षक आता सोशल मीडियावर त्यातील कलाकारांच्या अभिनयावरून विविध प्रतिक्रिया देत आहेत. अनन्या पांडे तिच्या वाईट अभिनयामुळे ट्रोल झाली असून नेटकरी त्यावरून मीम्स व्हायरल करत आहेत. या चित्रपटातून विजयने बॉलिवूडमध्ये तर अनन्याने टॉलिवूडमध्ये पदार्पण केलंय. अनन्या पांडेपेक्षा एखादा लहान मुलगाही चांगलं अभिनय करू शकतो, अशा शब्दांत नेटकरी टीका करत आहेत.
बॉलिवूडमध्ये इतर अनेक दमदार कलाकार असताना करण जोहरने अनन्या पांडेलाच का निवडलं, असा प्रश्नही नेटकरी उपस्थित करत आहेत. ट्विटरवर अनन्या पांडेच्या नावाने हॅशटॅग ट्रेंड होत असून तिच्यावरून हास्यास्पद मीम्स व्हायरल होत आहेत. अनन्याच्या अभिनयासोबतच प्रेक्षकांना लायगर हा चित्रपटसुद्धा फारसा आवडला नाही. केवळ मोठे स्टार्स आणि जबरदस्त प्रमोशन करून चित्रपट हिट होत नाही, असा टोमणा प्रेक्षक करण जोहरला लगावत आहेत.
पहा मीम्स-
Struggle of #AnanyaPandey in Bollywood pic.twitter.com/OeN5JxY1PN
— Vanita Vivek Narayane (@VanitaNarayane) August 26, 2022
Atleast Taapsee Pannu Suck at Auditions, what does Ananya Pandey do to get roles in the films?
Horrible is an understatement to describe her Acting. #AnanyaPandey #Liger pic.twitter.com/GHPfjdmOrc
— Chinnu Rao.. #ProudHindu ?? (@bubblebuster26) August 26, 2022
God level acting ?#Liger #ligermoviereview #AnanyaPandey #LigerMovie pic.twitter.com/4Jm7krhAr2
— Avinash yadav (@Memelordavi) August 26, 2022
Ananya Panday acting like kids cry for chocolate ??#AnanyaPandey #liger pic.twitter.com/tmL1HHVZog
— Naresh Dhoni DHF (@chinna_naresh) August 27, 2022
लायगरच्या तमिळ आणि तेलुगू व्हर्जनने जगभरात फक्त 25 कोटींची कमाई केली आहे. चित्रपट व्यापार विश्लेषकांच्या मते ही कमाई अपेक्षेपेक्षा फार कमी आहे. पुरी जगन्नाथ दिग्दर्शित ‘लायगर’मध्ये प्रसिद्ध बॉक्सर माईक टायसन, रम्या कृष्णन आणि रोनीत रॉय यांच्याही भूमिका आहेत. लायगरचा हिंदी व्हर्जन गुरुवारी रात्री 9 नंतर प्रदर्शित झाला. त्यामुळे हिंदीच्या कमाईचा आकडा अद्याप समजू शकलेला नाही.