Virat Anushka: विराटच्या शतकी खेळीनंतर अनुष्काची भावूक पोस्ट; म्हणाली..

विराट कोहलीने शतक झळकावल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होऊ लागाल. काहीजण अनुष्काच्या पोस्टवरही प्रतिक्रियाही व्यक्त करत आहेत. सर्वसामान्यांसोबतच सेलिब्रिटींनीसुद्धा विराटचं कौतुक केलं.

Virat Anushka: विराटच्या शतकी खेळीनंतर अनुष्काची भावूक पोस्ट; म्हणाली..
विराटच्या सेंच्युरीनंतर अनुष्का शर्माची पोस्ट चर्चेत Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 09, 2022 | 1:37 PM

विराट कोहलीने (Virat Kohli) आशिया चषकात अफगाणिस्तानविरुद्ध नाबाद खेळी करताना शतक झळकावलं. जवळपास 33 महिन्यांनंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक (Century) केलं. विराटने शतक पूर्ण होताच सर्वांत आधी आनंदाने अंगठीचं चुंबन घेतलं. अनुष्का शर्माने (Anushka Sharma) कठीण प्रसंगात माझी खूप साथ दिली, असं तो म्हणाला. हे शतक त्याने अनुष्का आणि मुलगी वामिकाला समर्पित केलं. त्यानंतर पत्नी अनुष्कानेही भावनिक पोस्ट लिहित विराटवर प्रेमाचा वर्षाव केला.

अनुष्काने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर विराट कोहलीचे काही फोटो पोस्ट केले. आणि त्यासोबत हृदयस्पर्शी पोस्ट लिहिली. ‘नेहमीच तुझ्यासोबत.. मग ते कधीही आणि कोणत्याही गोष्टीसाठी का असेना,’ असं तिने लिहिलं. तिच्या या पोस्टवर विराटने हृदयाचे इमोटिकॉन पोस्ट केले.

हे सुद्धा वाचा

61 चेंडूत विराटने 122 धावा केल्या. त्यानंतर कोहलीने मैदानात त्याच्या स्टाईलने जल्लोष केला. कारण मागच्या तीन वर्षात शतकाच्या समीप जाऊन तो अनेकदा बाद झाला होता.

विराट कोहलीने शतक झळकावल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होऊ लागाल. काहीजण अनुष्काच्या पोस्टवरही प्रतिक्रियाही व्यक्त करत आहेत. सर्वसामान्यांसोबतच सेलिब्रिटींनीसुद्धा विराटचं कौतुक केलं. श्रद्धा कपूर, सोनाली बेंद्रे, वरुण धवन, जयदीप अहलावत यांसारख्या सेलिब्रिटींनी त्याच्या कामगिरीची प्रशंसा केली.

अनुष्कासुद्धा लवकरच प्रेक्षकांना क्रिकेट खेळताना दिसणार आहे. कारण तिचा ‘चकदा एक्स्प्रेस’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये ती झुलन गोस्वामीची भूमिका साकारत आहे. या चित्रपटासाठी ती बरीच मेहनत घेत असून बऱ्याच कालावधीनंतर ती मोठ्या पडद्यावर परतणार आहे. 2018 मध्ये ती ‘झिरो’ या चित्रपटात झळकली होती. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.