Arjun Kapoor: “हेच जर मी तुमची बहिण, आई, मुलीबद्दल लिहिलं तर कसं वाटेल?”, अर्जुन कपूरचा ट्रोलर्सना सवाल
अभिनेत्री मलायका अरोरासोबतच्या नात्याला जगजाहीर केल्यानंतर त्यावरूनही त्याला टीकेचा सामना करावा लागला. अनेकदा मलायका (Malaika Arora) आणि त्याच्या बहिणींना ट्रोल केलं गेलं. हे सगळे सेलिब्रिटी असल्याने त्यांना लक्ष्य करणं ट्रोलर्ससाठी खूप सोपं असल्याचं त्याने म्हटलंय.
सोशल मीडियावर सेलिब्रिटींना अनेकदा ट्रोलिंगला (Trolling) सामोरं जावं लागतं. अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) वेळोवेळी अशा ट्रोलर्सना त्याच्याच अंदाजात उत्तर देतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अर्जुनने त्याच्या कुटुंबीयांना ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. अर्जुनचे वडील बोनी कपूर हे निर्माते आणि दिग्दर्शक आहेत. त्याच्या सावत्र बहिणी जान्हवी आणि खुशी कपूर यासुद्धा अभिनेत्री आहेत. अभिनेत्री मलायका अरोरासोबतच्या नात्याला जगजाहीर केल्यानंतर त्यावरूनही त्याला टीकेचा सामना करावा लागला. अनेकदा मलायका (Malaika Arora) आणि त्याच्या बहिणींना ट्रोल केलं गेलं. हे सगळे सेलिब्रिटी असल्याने त्यांना लक्ष्य करणं ट्रोलर्ससाठी खूप सोपं असल्याचं त्याने म्हटलंय.
‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत अर्जुन म्हणाला, “अशा गोष्टींमधून त्यांचं संगोपन कसं झालं हेच सिद्ध होतं. त्यांची विचारप्रक्रिया काय आहे, हे यातून दिसतं. या गोष्टींचा माझ्यावर वाईट परिणाम होत नाही. पण त्यांच्यावर नक्की होतो. खोट्या नावांमागे जरी ते लपले असले तरी त्यांना स्वत:चं अस्तित्व काय आहे हे नीट माहित असतं. ते बनावट आयुष्य जगत आहेत आणि आपल्यातील निराशा, राग, द्वेष बाहेर काढण्यासाठी ते असे कमेंट्स करत आहेत. सेलिब्रिटींना ट्रोल करणं त्यांना खूप सोपं वाटतं. हेच जर मी कोणाच्या अकाऊंटवर जाऊन केलं, तर दुसऱ्या दिवशी त्याची मोठी बातमी केली जाईल. त्यामुळे माझ्याबद्दल किंवा माझ्या कुटुंबीयांबद्दल असं काही लिहिण्यापूर्वी हेच जर मी तुमच्याबद्दल आणि तुमच्या आई-बहिणींबद्दल लिहिलं तर कसं वाटेल याचा एकदा विचार करा.”
पहा फोटो-
View this post on Instagram
“माझ्यामुळे माझ्या कुटुंबीयांनाही त्रास सहन करावा लागला. माझी बहीण अंशुला हिची काहीच चूक नसताना तिलाही ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. अशी लोकं जर माझ्यासमोर आली तर त्यांना मी सडेतोड उत्तर देऊ शकतो. पण ते फेक अकाऊंट्सचा आधार घेऊन माझ्या कुटुंबीयांवर निशाणा साधतात. त्यांना फक्त गंमत करायची असते”, असंही तो म्हणाला.
अर्जुन कपूरच्या चित्रपटांविषयी बोलायचे झाल्यास तो लवकरच ‘कुत्ते’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये तब्बू, नसीरुद्दीन शाह, राधिका मदन, कोंकना सेन शर्मा यांच्याही भूमिका आहेत. त्याचसोबत ‘एक व्हिलन रिटर्न्स’मध्येही तो झळकणार आहे.