Bhool Bhulaiyaa 2: बॉक्स ऑफिसवर मोंजोलिकाचाच प्रभाव; ‘भुल भुलैय्या 2’ची तीन दिवसांत 50 कोटींहून अधिक कमाई

कार्तिकच्या 'भुल भुलैय्या 2'सोबत बॉलिवूडची क्वीन अर्थात अभिनेत्री कंगना रनौतचा 'धाकड' हा चित्रपटसुद्धा प्रदर्शित झाला. 'धाकड'पेक्षा चांगला प्रतिसाद कार्तिकच्या चित्रपटाला मिळतोय. खुद्द कंगनाने सोशल मीडियावर पोस्ट लिहित कार्तिक आणि त्याच्या चित्रपटाच्या टीमचं कौतुक केलं होतं.

Bhool Bhulaiyaa 2: बॉक्स ऑफिसवर मोंजोलिकाचाच प्रभाव; 'भुल भुलैय्या 2'ची तीन दिवसांत 50 कोटींहून अधिक कमाई
Bhool Bhulaiyaa 2Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 23, 2022 | 9:37 AM

कार्तिक आर्यन (Kartik Aaryan), कियारा अडवाणी आणि तब्बू यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘भुल भुलैय्या 2’ (Bhool Bhulaiyaa 2) या चित्रपटाने पहिल्या वीकेंडमध्येच कमाईचा 50 कोटींचा टप्पा पार केला आहे. 2022 या वर्षात प्रदर्शनाच्या दिवशीच सर्वाधिक कमाई (Box Office Collection) करणारा हा बॉलिवूड चित्रपट ठरला आहे. कार्तिकच्या चित्रपटाला पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षक-समिक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. याच माऊथ पब्लिसिटीचा उपयोग चित्रपटाच्या कमाईसाठी होत आहे. 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘भुल भुलैय्या’ या चित्रपटाचा सीक्वेल आहे. सीक्वेल जरी असला तरी याची कथा संपूर्ण वेगळी आहे. पहिल्या चित्रपटात अक्षय कुमार आणि विद्या बालन यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. तो चित्रपटसुद्धा बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. प्रेक्षकांवर अक्षय कुमारइतकाच प्रभाव कार्तिक आर्यन पाडू शकेल का, असा प्रश्न सुरुवातीला उपस्थित केला जात होता. मात्र कार्तिकने सर्व अंदाज फोल ठरवत चांगली कामगिरी करून दाखवली. शुक्रवारी म्हणजेच प्रदर्शनाच्या दिवशीच ‘भुल भुलैय्या 2’ने 14 कोटींचा गल्ला जमवला.

कार्तिकच्या ‘भुल भुलैय्या 2’सोबत बॉलिवूडची क्वीन अर्थात अभिनेत्री कंगना रनौतचा ‘धाकड’ हा चित्रपटसुद्धा प्रदर्शित झाला. ‘धाकड’पेक्षा चांगला प्रतिसाद कार्तिकच्या चित्रपटाला मिळतोय. खुद्द कंगनाने सोशल मीडियावर पोस्ट लिहित कार्तिक आणि त्याच्या चित्रपटाच्या टीमचं कौतुक केलं होतं. बॉक्स ऑफिस इंडिया डॉटकॉमने दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी ‘भुल भुलैय्या 2’ने जवळपास 22 ते 23 कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे पहिल्या वीकेंडची कमाई ही 54 ते 55 कोटी रुपयांच्या घरात झाली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे पश्चिम बंगालमध्येही कार्तिकच्या चित्रपटाने चांगला गल्ला जमवला आहे.

हे सुद्धा वाचा

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शचं ट्विट-

रविवारी मुंबईतील एका सिनेमागृहाला कार्तिकने भेट दिली, त्यावेळी त्याचा शो हाऊसफुल असल्याचं त्याला समजलं. याचा आनंद त्याने इन्स्टाग्रामवर व्यक्त केला. स्वत:साठीही तिकिट मिळू न शकल्याचं त्याने लिहिलं. अनीस बाझमी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.