AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हो, हो… मी सर्व बघत आहे आणि ‘बिनोद’ बघून पोट धरून हसतोयं, व्हायरल मीम्सनंतर अशोक पाठक म्हणाले की…

अशोक पुढे म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी मी माझा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चेक केला तेव्हा मला हजारो लोकांनी पोस्ट टॅग केल्या होत्या. अचानक काय झाले ते सुरुवातीला समजलेच नाही. मग मी पाहिलं की लोक मला 'सिइंग ना बिनोद' या मीम्समध्ये टॅग करत आहेत. मी अजूनही बरेच मीम्स पहात आहे आणि सतत मीम्स तयार केले जात आहेत.

हो, हो... मी सर्व बघत आहे आणि 'बिनोद' बघून पोट धरून हसतोयं, व्हायरल मीम्सनंतर अशोक पाठक म्हणाले की...
| Edited By: | Updated on: Jul 16, 2022 | 10:25 AM
Share

मुंबई : उद्योगपती ललित मोदी (Lalit Modi) यांनी गुरुवारी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर अभिनेत्री सुष्मिता सेनसोबतचे (Sushmita Sen) रोमँटिक फोटो शेअर करत बेटर हाफ म्हटल्याने सर्वचजण आश्चर्यचकित झाले. ललित मोदी यांची ही पोस्ट सोशल मीडियावर वाऱ्यासारखी व्हायरल झाली. विशेष म्हणजे यावर खतरनाक मीम्ससुद्धा व्हायरल होत आहेत. पंचायत 2 मधील बिनोद सध्या सोशल मीडियावर ट्रेंड (Trend)  होत आहेत. ललित मोदी यांच्या पोस्टनंतर बिनोदच्या आयकॉनिक डायलॉग्सचे अनेक मीम्स शेअर होत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून बिनोदच्या मीम्सची चर्चा इतकी जास्त होत आहे की, ते ट्विटरवर ट्रेंड होत आहे.

व्हायरल मीम्सवर अशोक पाठक म्हणाले…

या व्हायरल होणाऱ्या मीम्सबद्दल आजतकने अशोक पाठक, पंचायतमधील बिनोद यांच्याशी खास बातचीत केलीयं. व्हायरल होणाऱ्या मीम्सबद्दल अशोक यांना विचारण्यात आले, त्यावेळी अशोक पाठक अत्यंत भावूक झाले. ते म्हणाले की, माझ्यासारख्या साईड कॅरेक्टरला आणि त्याच्या डायलॉग्सकडे इतकं लक्ष जाईल यावर मला अजिबातच विश्वास बसत नाही. इतका जास्त वेळ होऊनही बिनोद पुन्हा सोशल मीडियावर ट्रेंड होत असल्याचे पाहण्याचा अनुभव खरोखरच खूप भारी आहे.

सुरूवातीला तर हा धक्काच होता

अशोक पुढे म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी मी माझा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चेक केला तेव्हा मला हजारो लोकांनी पोस्ट टॅग केल्या होत्या. अचानक काय झाले ते सुरुवातीला समजलेच नाही. मग मी पाहिलं की लोक मला ‘सिइंग ना बिनोद’ या मीम्समध्ये टॅग करत आहेत. मी अजूनही बरेच मीम्स पहात आहे आणि सतत मीम्स तयार केले जात आहेत. माझे मित्र आणि इंडस्ट्रीतील काही ओळखीचे लोकही हे मीम्स व्हॉट्सअॅपवर मला पाठवत आहेत. माझे खरे नाव बिनोद आहे असे अनेकांना वाटते.

पंकज त्रिपाठी यांनीही केला फोन

विशेष म्हणजे बरेच लोक मला व्हॉट्सअॅपवर देखील बिनोद नावानेच संबोधित करत आहेत. माझे नाव अशोक पाठक आहे हे क्वचितच कुणाला माहीत असेल. मला भीती वाटते की लोक माझे खरे नाव विसरतील आणि मला बिनोदच म्हणतील. मी सुष्मिता सेनसोबत काम केले आहे, या मीम्समुळे मी थोडा अस्वस्थ देखील आहे. मीम्स वाचून मी हसून हसून वेडा होतो. मला दुर्गेश (बनारकस) यांनी फोन करून मीम्सच्या ट्रेंडची माहिती दिली. इतकेच नाहीतर व्हायरल मीम्स बघून मला पंकज त्रिपाठी यांनीही फोन केला.

कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.