Bipasha Basu: बिपाशा बासूच्या मॅटर्निटी फोटोशूटची जोरदार चर्चा; पहिल्यांदाच पोस्ट केला बेबी बंपचा फोटो

दोघांनीही या खास फोटोशूटचे फोटो पोस्ट करत आनंदाची बातमी दिली आहे. बिपाशा आणि करणने (Karan Singh Grover) एप्रिल 2016 मध्ये लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्या सहा वर्षांनंतर या दोघांनी आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. 

Bipasha Basu: बिपाशा बासूच्या मॅटर्निटी फोटोशूटची जोरदार चर्चा; पहिल्यांदाच पोस्ट केला बेबी बंपचा फोटो
Bipasha Basu: बिपाशा बासूच्या मॅटर्निटी फोटोशूटची जोरदार चर्चाImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 16, 2022 | 12:40 PM

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासूने (Bipasha Basu) अखेर गरोदर (Pregnancy) असल्याचं जाहीर केलं आहे. बिपाशाने मॅटर्निटी फोटोशूटचे खास फोटो पोस्ट करत चाहत्यांना ‘गुड न्यूज’ दिली आहे. या फोटोंमध्ये तिचा बेबी बंप स्पष्टपणे पहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच बिपाशाच्या गरोदरपणाची सोशल मीडियावर चर्चा होती. मात्र तिने किंवा करणने याबाबत कोणतीच पोस्ट सोशल मीडियावर अपलोड केली नव्हती. आता दोघांनीही या खास फोटोशूटचे फोटो पोस्ट करत आनंदाची बातमी दिली आहे. बिपाशा आणि करणने (Karan Singh Grover) एप्रिल 2016 मध्ये लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्या सहा वर्षांनंतर या दोघांनी आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे.

बिपाशाची पोस्ट-

‘आमच्या आयुष्याच्या विविध छटांमध्ये एक नवीन वेळ, एक नवीन टप्पा, एक नवीन प्रकाश रेखाटला गेला आहे. त्यामुळे आम्हाला पूर्वीपेक्षा थोडं अधिक पूर्णत्वाची भावना अनुभवायला मिळतेय. आम्ही या आयुष्याची सुरुवात वैयक्तिकरित्या केली आणि नंतर आम्ही एकमेकांना भेटलो. तेव्हापासून आम्ही दोघं या प्रवासात एकत्र आहोत. फक्त दोघांपुरतं हे प्रेम मर्यादित ठेवणं आम्हाला थोडं अयोग्य वाटलं. त्यामुळे आता आता लवकरच आम्ही दोघाचे तीन होऊ. आमचं बाळ लवकरच आमच्या या प्रवासाचा साथीदार होईल आणि आमचा द्विगुणीत करेल. तुम्हा सर्वांच्या बिनशर्त प्रेमाबद्दल, तुमच्या प्रार्थना आणि शुभेच्छांबद्दल धन्यवाद आणि ते नेहमीच आमचा एक भाग असतील,’ अशा शब्दांत बिपाशाने भावना व्यक्त केल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

2015 नंतर बिपाशा मोठ्या पडद्यावर दिसली नाही. 2020 मध्ये तिला ‘डेंजरस’ या वेब सीरिजमध्ये पाहिलं गेलं. तर करण शेवटचा ‘कुबूल है’ या मालिकेत दिसला होता. बिपाशाने 2001 मध्ये ‘अजनबी’ चित्रपटातून बॉलिबूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात तिला खलनायिकेची भूमिका मिळाली. पण तिची खलनायिकेची भूमिका लोकांना इतकी आवडली की लोकांनी तिचं कौतुक केलं. बिपाशाने राज, जिस्म, मेरे यार की शादी, चोर मचाये शोर, जमीन, बरसात यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. तर करण हा छोट्या पडद्यावरून प्रकाशझोतात आला. ‘दिल मिल गये’ या मालिकेतून त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली.

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.