Brahmastra Video : ‘चिकनी चमेली’वर आलिया-रणबीरचा डान्स; नाराज नेटकरी म्हणाले “कतरिनाची माफी मागा”
'ब्रह्मास्त्र'मध्ये शाहरुख खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकला आहे. त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांना शाहरुखची एण्ट्री खूपच आवडली आहे.
रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचा बहुप्रतिक्षित ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) हा चित्रपट आज (9 सप्टेंबर) थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. त्याचवेळी प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटातील अनेक क्लिप्सही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका क्लिपमध्ये रणबीर आणि आलिया ‘चिकनी चमेली’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडीओतील दोघांची केमिस्ट्री काही लोकांना आवडली आहे. तर काहीजण त्यांना ट्रोल करत आहेत.
‘ब्रह्मास्त्र’च्या या व्हायरल सीनमध्ये आलिया भट्ट आणि रणबीर कपूर कतरिना कैफच्या ‘चिकनी चमेली’ गाण्यावर डान्स करत आहेत. त्यांच्यासोबत काही लहान मुलंही दिसत आहेत. काही नेटकऱ्यांना या गाण्यावरचा आलियाचा डान्स आवडला नाही. आलियाने गाण्याची मजाच घालवली असं काहींनी म्हटलं. इतकंच नव्हे तर त्यांनी कतरिनाची माफी मागितली पाहिजे, असंही एका युजरने लिहिलं.
पहा व्हिडीओ-
Nepokids ? Alia ruined this song. She should apologize to Kat.They are so obsessed with Kat and Dp. Used these superstars to promote this flop film from day 1 and now look at this.Still it won’t save it from becoming a disaster.500 crs is the budget lol. Needs 600 crs 2 be a hit https://t.co/T0ZJHXIOQs
— ?Deepika magic? (@honeycomb_crazy) September 9, 2022
‘ब्रह्मास्त्र’मध्ये शाहरुख खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकला आहे. त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांना शाहरुखची एण्ट्री खूपच आवडली आहे. चित्रपटातील इतरही काही क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
‘ब्रह्मास्त्र’ हा 410 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, मौनी रॉय, नागार्जुन आणि शाहरुख खान यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाविरोधात सोशल मीडियावर बहिष्काराचा ट्रेंड आधीच सुरू झाला होता. अशा परिस्थितीतही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकेल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.