Brahmastra: ‘ब्रह्मास्त्र’ची बंपर ॲडव्हान्स बुकिंग; ‘भुल भुलैय्या 2’ला टाकलं मागे

गेल्या काही महिन्यांत बॉलिवूडचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरत आहेत. अशा परिस्थितीत ब्रह्मास्त्रचा हा आकडा पाहता पहिल्या वीकेंडला चित्रपटाची बंपर कमाई होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Brahmastra: 'ब्रह्मास्त्र'ची बंपर ॲडव्हान्स बुकिंग; 'भुल भुलैय्या 2'ला टाकलं मागे
BrahmastraImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 07, 2022 | 6:07 PM

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) हा चित्रपट येत्या 9 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. एकीकडे सोशल मीडियावर या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी सातत्याने होत आहे. तर दुसरीकडे रणबीर-आलिया यांना उज्जैनच्या महाकाल मंदिरात प्रवेश करण्यास परवानगी नाकारण्यात आली. चित्रपटाबाबत एवढा विरोध असूनही ब्रह्मास्त्रने ॲडव्हान्स बुकिंगच्या (advance booking) बाबतीत कार्तिक आर्यनच्या ‘भुल भुलैय्या 2’ला (Bhul Bhulaiya 2) मागे टाकलं आहे.

पहिल्या दिवशी मंगळवारी रात्रीपर्यंत चित्रपटाची 1 लाख 50 हजार तिकिटं विकली गेली आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी आणखी दोन दिवस बाकी आहेत, त्यामुळे हा आकडा आणखी वाढू शकतो. अयान मुखर्जीने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. PVR, INOX आणि Cinepolis या देशातील तीन सर्वांत मोठ्या मल्टिप्लेक्स चेनच्या तिकिट विक्रीचा हा आकडा आहे. त्यामुळे प्रदर्शनापूर्वीच ब्रह्मास्त्रने 4.50 कोटी रुपयांची कमाई केली. इतर थिएटर्समध्ये विकल्या गेलेल्या तिकिटांचा आकडा पाहता पहिल्या दिवसाची एकूण कमाई ही जवळपास 6 कोटी इतकी झाली आहे.

ॲडव्हान्स बुकिंगचा हा आकडा समाधानकारक असल्याचं चित्रपट व्यापार विश्लेषकांचं मत आहे. गेल्या काही महिन्यांत बॉलिवूडचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरत आहेत. अशा परिस्थितीत ब्रह्मास्त्रचा हा आकडा पाहता पहिल्या वीकेंडला चित्रपटाची बंपर कमाई होण्याची चिन्हे दिसत आहेत.

हे सुद्धा वाचा

ॲडव्हान्स बुकिंगमधूनच चित्रपटाची एकूण कमाई 8 ते 9 कोटींच्या घरात होईल असा अंदाज आहे. त्यामुळे 9 सप्टेंबर रोजी ‘ब्रह्मास्त्र’ 25 ते 27 कोटी रुपयांचा गल्ला जमवेल, अशी शक्यता आहे. जर प्रेक्षकांना हा चित्रपट आवडला तर माऊथ पब्लिसिटीमुळे हा चित्रपट वीकेंडपर्यंत 30 कोटींची कमाई करू शकतो.

पहिल्या दिवसाच्या ॲडव्हान्स बुकिंगचा आकडा

1. KGF: चाप्टर 2 (हिंदी) – 5.05 लाख तिकिटं 2. ब्रह्मास्त्र – 1.50 लाख तिकिटं (मंगळवारपर्यंत) 3. 83 – 1.29 लाख तिकिटं 4. भुल भुलैया 2 – 1.12 लाख तिकिटं 5. RRR (हिंदी) – 1.09 लाख तिकिटें 6. लाल सिंग चड्ढा – 64 हजार तिकिटं 7. गंगुबाई काठियावाडी – 61 हजार तिकिटं 8. जुग जुग जिओ – 56 हजार तिकिटं 9. शमशेरा – 50 हजार तिकिटं 10. सम्राट पृथ्वीराज – 45 हजार तिकिटं

'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला
'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला.
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण.
'...तोपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल', 'मातोश्री'वर ठाकरे काय म्हणाले?
'...तोपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल', 'मातोश्री'वर ठाकरे काय म्हणाले?.
बाळ्यामामा म्हात्रे शरद पवारांची साथ सोडणार? फडणवीसांची का घेतली भेट?
बाळ्यामामा म्हात्रे शरद पवारांची साथ सोडणार? फडणवीसांची का घेतली भेट?.
एकनाथ शिंदे ज्युपिटर रूग्णालयातून बाहेर येताच एकच वाक्य म्हणाले...
एकनाथ शिंदे ज्युपिटर रूग्णालयातून बाहेर येताच एकच वाक्य म्हणाले....
छगन भुजबळांना मोठं मंत्रिपद मिळणार? 'त्या' कोटवरून का होतेय चर्चा?
छगन भुजबळांना मोठं मंत्रिपद मिळणार? 'त्या' कोटवरून का होतेय चर्चा?.
एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?
एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?.
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच..
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?.