Brahmastra: रणबीर-आलियाच्या ‘ब्रह्मास्त्र’ने रचला इतिहास; बजेटचा आकडा पाहून बसेल धक्का!

सर्वात महागडा हिंदी चित्रपट अशी ओळख 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाने निर्माण केली आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटात अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Brahmastra: रणबीर-आलियाच्या 'ब्रह्मास्त्र'ने रचला इतिहास; बजेटचा आकडा पाहून बसेल धक्का!
BrahmastraImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 02, 2022 | 6:09 PM

साऊथच्या चित्रपटांसमोर सध्या बॉलिवूड चित्रपटांची अवस्था बिकट दिसून येत आहे. लाल सिंग चड्ढासारखा बिग बजेट चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपडला. आता रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) या चित्रपटातून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत. या चित्रपटावर निर्मात्यांनी भरपूर खर्च केला आहे. या खर्चाची झलक प्रेक्षकांना ट्रेलरमध्ये पहायला मिळाली. ‘ब्रह्मास्त्र’ हा भारतीय चित्रपटसृष्टीतील आतापर्यंतचा सर्वात महागडा बजेट चित्रपट आहे. यामध्ये रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या मुख्य भूमिका आहेत. येत्या 9 सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सर्वात महागडा हिंदी चित्रपट अशी ओळख ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाने निर्माण केली आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटात अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. गेल्या तब्बल 8 वर्षांपासून या चित्रपटावर काम सुरू असून आता तो प्रदर्शित होण्यासाठी फक्त 8 दिवस उरले आहेत. या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटाचं बजेट तब्बल 410 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे.

हे सुद्धा वाचा

बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, ब्रह्मास्त्रचं बजेट हे प्रिंट आणि प्रमोशनल खर्च वगळता 410 कोटी रुपये आहे. “हा आतापर्यंतचा सर्वात महागडा बॉलिवूड चित्रपट आहे आणि त्याची किंमत चित्रपटाच्या प्रत्येक फ्रेममध्ये दिसून येईल. याआधी प्रेक्षकांनी कधीही न अनुभवलेली दृश्ये अयान आणि त्याच्या टीमला प्रेक्षकांसमोर सादर करायची होती,” असं सूत्रांनी बॉलिवूड हंगामाला सांगितलं.

डिस्ने आणि धर्मा प्रॉडक्शन्सच्या संपूर्ण टीमला विश्वास आहे की ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट प्रेक्षकांची मनं जिंकेल. इतकंच नव्हे तर बॉक्स ऑफिसवरही तो कमाल करेल. मात्र एकीकडे बॉलिवूडचे चित्रपट फ्लॉप होत असताना, सोशल मीडियावर बॉयकॉटचा ट्रेंड होत असताना इतक्या मोठ्या बजेटचा चित्रपट यशस्वी ठरेल का, अशी चिंताही गुंतवणूकदारांना सतावतेय.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.