Brahmastra: ‘ब्रह्मास्त्र’च्या ॲडव्हान्स बुकिंगचा आकडा आला समोर; रणबीर-आलिया ठरणार ‘गेम चेंजर’?
अर्यान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट येत्या 9 सप्टेंबर प्रदर्शित होणार आहे. यासाठी चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंग (advance bookings) सुरू झाली आहे. ॲडव्हान्स बुकिंगचा आकडा फारच समाधानकारक असल्याचं चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने म्हटलंय.
अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांचा बहुचर्चित ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता आहे. त्याचसोबत गेल्या काही महिन्यांपासून फ्लॉप होणाऱ्या बॉलिवूड चित्रपटांचं (Bollywood) नशीब ब्रह्मास्त्र पालटेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. अर्यान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट येत्या 9 सप्टेंबर प्रदर्शित होणार आहे. यासाठी चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंग (advance bookings) सुरू झाली आहे. ॲडव्हान्स बुकिंगचा आकडा फारच समाधानकारक असल्याचं चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने म्हटलंय. मात्र हाच आकडा प्रदर्शनाच्या तारखेपर्यंत स्थिर राहिला पाहिजे, अशीही आशा त्यांनी व्यक्त केली.
‘बॉलिवूड इंडस्ट्रीसाठी अखेर दिलासादायक बातमी आहे. ॲडव्हान्स बुकिंगद्वारे ब्रह्मास्त्र या चित्रपटाची तब्बल 11,558 तिकिटं विकली गेली आहेत. ही अत्यंत सकारात्मक सुरुवात आहे. ठराविक ठिकाणीच ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात होऊनही ही सुरुवात चांगली आहे’, असं ट्विट तरण आदर्शने केलंय.
‘BRAHMĀSTRA’: ADVANCE BOOKING STATUS… Finally, some relief for the industry… Received #Brahmāstra *day-wise data* [advance booking] of *a leading multiplex chain*… Observations… ⭐ Tickets sold: 11,558 [veryyy positive start, since advance opened at select locations only] pic.twitter.com/UW83RpmofZ
— taran adarsh (@taran_adarsh) September 3, 2022
चित्रपटाच्या पहिल्या वीकेंडची कमाई ही प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांवरही अवलंबून असल्याचं त्यांनी म्हटलंय. ट्विटरवर ब्रह्मास्त्र बॉयकॉटचा ट्रेंड सुरू असल्याने त्याचा थोडाफार फटका चित्रपटाच्या व्यवसायावर बसण्याची शक्यता आहे. ब्रह्मास्त्र या चित्रपटात रणबीर-आलियासोबतच अमिताभ बच्चन, नागार्जुन अक्किनेनी, मौनी रॉय यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. याशिवाय शाहरुख खान चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार आहे.
दिग्दर्शक अयान मुखर्जी आणि त्याची टीम गेल्या आठ वर्षांपासून या चित्रपटावर काम करत आहे. हा चित्रपट एकूण तीन भागांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यातील पहिला भाग ‘ब्रह्मास्त्र: पार्ट वन शिवा’ हा येत्या 9 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.