Ganesh Acharya: लैंगिक छळप्रकरणी गणेश आचार्यला जामीन; अश्लील व्हिडीओ पाहण्यास भाग पाडल्याचा पीडितेचा आरोप

2009-10 मध्ये जेव्हा जेव्हा ती त्याच्या कार्यालयात भेटायला गेली तेव्हा तिला अश्लील व्हिडिओ पाहण्यास भाग पाडलं आणि त्याने इतर महिलांसोबतही असंच केलं असा आरोपही पीडित महिलेनं केला आहे.

Ganesh Acharya: लैंगिक छळप्रकरणी गणेश आचार्यला जामीन; अश्लील व्हिडीओ पाहण्यास भाग पाडल्याचा पीडितेचा आरोप
Ganesh AcharyaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 24, 2022 | 9:48 AM

लैंगिक छळ प्रकरणी (sexual harassment case) मुंबईच्या न्यायदंडाधिकारी न्यायालयाने गुरुवारी कोरिओग्राफर गणेश आचार्यला (Ganesh Acharya) जामीन मंजूर केला. सहाय्यक कोरिओग्राफरला (Choreographer) मारहाण केल्याच्या आरोपाखाली फेब्रुवारी 2020 मध्ये आंबोली पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 2009-10 मध्ये जेव्हा जेव्हा ती त्याच्या कार्यालयात भेटायला गेली तेव्हा तिला अश्लील व्हिडिओ पाहण्यास भाग पाडलं आणि त्याने इतर महिलांसोबतही असंच केलं असा आरोपही पीडित महिलेनं केला आहे. या वर्षी एप्रिलमध्ये मुंबई पोलिसांनी गणेश आचार्यवर लैंगिक छळ आणि इतर आरोपांखाली गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी गणेश आचार्यला अटक झाली नव्हती. गुरुवारी न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर झाल्यानंतर त्याला जामीन मंजूर करण्यात आला.

26 जानेवारी 2020 रोजी अंधेरी इथल्या इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन कोरिओग्राफर असोसिएशनच्या एका कार्यक्रमादरम्यान त्याने इतर दोघांसह तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप तक्रारकर्त्याने केला आहे. यात तिने यापूर्वी झालेल्या लैंगिक छळाच्या तक्रारी देखील सांगितल्या आहेत. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आयपीसीच्या कलम 354-ए (लैंगिक छळ), 354-सी (महिलेचे खासगी फोटो, व्हिडीओ पाहणे किंवा शूट करणे), 354-डी (पाठलाग करणे किंवा एखाद्यावर सतत लक्ष ठेवणे), 506 (धमकावणे) आणि 509 (शब्द, हावभाव किंवा एखाद्या महिलेच्या विनयशीलतेचा अपमान करण्याच्या हेतूने केलेले कृत्य) अंतर्गत गुन्हा दाखल केला. मात्र गणेश आचार्यने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

हे सुद्धा वाचा

इन्स्टा पोस्ट-

51 वर्षीय गणेश आचार्यने 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला कोरिओग्राफर कमलजी यांचा सहाय्यक म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. 1992 मध्ये त्याने ‘अनाम’ या पहिल्या चित्रपटामध्ये काम केलं. परंतु 2001 मध्ये ‘लज्जा’मधील ‘बडी मुश्कील’ या गाण्याच्या कोरिओग्राफीमुळे त्याला प्रसिद्धी मिळाली. 2007 मध्ये त्याने मनोज वाजपेयी आणि जुही चावला यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘स्वामी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. अनेक चित्रपटांमध्ये त्याने अभिनयदेखील केलं आहे. विशेष म्हणजे 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रौथीराम’ चित्रपटात त्याने खलनायकाची भूमिका साकारली.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.