‘ब्रह्मास्त्र’ व्यतिरिक्त हे 2 बहुचर्चित चित्रपट येतायत प्रेक्षकांच्या भेटीला, जाणून घ्या याबद्दल अधिक

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट 9 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. अयान मुखर्जी यांच्या या चित्रपटाची चाहते गेल्या कित्येक दिवसांपासून वाट पाहात होते. मात्र, बाॅलिवूडचे चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सातत्याने फ्लाॅप जात असताना आता ब्रह्मास्त्र काय कमाल करते

'ब्रह्मास्त्र' व्यतिरिक्त हे 2 बहुचर्चित चित्रपट येतायत प्रेक्षकांच्या भेटीला, जाणून घ्या याबद्दल अधिक
Follow us
| Updated on: Sep 07, 2022 | 8:59 AM

मुंबई : सप्टेंबर (September) महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये मनोरंजनाचा जबरदस्त तडका लागणार आहे. या महिन्यात अनेक चित्रपट आणि बेव सीरिज रिलीज होण्यास सज्ज आहेत. रणबीर कपूर आणि अलिया भट्टच्या ब्रह्मास्त्र चित्रपटा व्यतिरिक्त अनेक बहुप्रतिक्षित चित्रपट (Movie) याच महिन्यात रिलीज (Release) होणार असून ‘थर लव्ह अँड थंडर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणारयं. या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात नेमके कोणते चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येतायत, याबद्दल जाणून घेऊयात सविस्तरपणे…

ब्रह्मास्त्र चित्रपटावर चाहत्यांच्या नजरा

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट 9 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. अयान मुखर्जी यांच्या या चित्रपटाची चाहते गेल्या कित्येक दिवसांपासून वाट पाहात होते. मात्र, बाॅलिवूडचे चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सातत्याने फ्लाॅप जात असताना आता ब्रह्मास्त्र काय कमाल करेल. याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या चित्रपटात रणबीर कपूर आणि आलिया भट्टशिवाय मौनी रॉय, अमिताभ बच्चन आणि नागार्जुन हे देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

हे सुद्धा वाचा

एक व्हिलन रिटर्न्स 9 सप्टेंबरला नेटफ्लिक्स

नेटफ्लिक्सवर ‘एक व्हिलन रिटर्न्स’ 9 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. मात्र, याच दिवशी रणवीर आणि आलियाचा ब्रह्मास्त्र देखील रिलीज होणार असल्याने ब्रह्मास्त्र आणि एक व्हिलन रिटर्न्समध्ये चुरस होण्याची दाट शक्यता आहे. दोन दिवसांमध्येच कळेल की, एक व्हिलन रिटर्न्सला प्रेक्षक प्रतिसाद देतात की, रणवीर आलियाच्या ब्रह्मास्त्र चित्रपटाला. एक व्हिलन रिटर्न्समध्ये जॉन अब्राहम, दिशा पटानी, अर्जुन कपूर, तारा सुतारिया हे प्रमुख भूमिकेमध्ये दिसणार आहेत.

थोर: लव्ह अँड थंडर 8 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

हॉलिवूडचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट ‘थोर: लव्ह अँड थंडर’ हा डिस्ने प्लस हॉटस्टारवर 8 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. चाहते गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात होते. हा हॉलिवूड चित्रपट उद्या म्हणजेच 8 सप्टेंबरला चाहत्यांच्या भेटीला येतोयं. भारतामध्ये देखील चाहते या चित्रपटाची वाट पाहात आहेत. क्रिस हेम्सवर्थ आणि नताली पोर्टमैन या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकते दिसणार आहेत.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.