Hrithik Roshan: हृतिक रोशनच्या या कृतीने जिंकलं नेटकऱ्यांचं मन; काय केलं ते व्हिडीओत पहा..

हृतिकच्या या व्हायरल व्हिडीओवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. 'तू खूपच विनम्र आहे', असं एकाने म्हटलं. तर 'सगळ्यात चांगला सुपरस्टार' अशी कमेंट दुसऱ्या युजरने लिहिली.

Hrithik Roshan: हृतिक रोशनच्या या कृतीने जिंकलं नेटकऱ्यांचं मन; काय केलं ते व्हिडीओत पहा..
Hrithik Roshan Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 28, 2022 | 1:25 PM

बॉलिवूडचा ‘ग्रीक गॉड’ अर्थात अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) केवळ त्याच्या दिसण्यामुळे नाही तर चाहत्यांसोबतच्या त्याच्या वागणुकीमुळेही अनेकदा चर्चेत असतो. मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमात हृतिकचा विनम्रपणा पुन्हा एकदा पहायला मिळाला. शनिवारी एका फिटनेस इव्हेंटमध्ये (Fitness Event) हृतिकने हजेरी लावली होती. यावेळी त्याने पिवळ्या रंगाच्या टी-शर्टवर पिवळ्या रंगाचा शर्ट, पांढऱ्या रंगाची पँट आणि आणि कॅप असा लूक केला होता. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या चाहत्यांपैकी एकाला गुडी बॅग देण्यासाठी मंचावर बोलावण्यात आलं. यावेळी गुडी बॅग घेतल्यानंतर त्या चाहत्याने आदराने हृतिकच्या पायांना स्पर्श केला. हे पाहून नंतर हृतिकसुद्धा त्या चाहत्याच्या पाया पडला. सध्या त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral Video) होत आहे.

हृतिकच्या या व्हायरल व्हिडीओवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. ‘तू खूपच विनम्र आहे’, असं एकाने म्हटलं. तर ‘सगळ्यात चांगला सुपरस्टार’ अशी कमेंट दुसऱ्या युजरने लिहिली. इतकंच नव्हे तर ‘तुझा विक्रम वेधा हा चित्रपट आम्ही बॉयकॉट करणार नाही,’ असंही काही नेटकऱ्यांनी म्हटलंय. हृतिकच्या आगामी ‘विक्रम वेधा’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात तो सैफ अली खानसोबत स्क्रीन शेअर करत आहे. सैफमुळे या चित्रपटाविरोधात ‘बॉयकॉट विक्रम वेधा’ असा ट्रेंड ट्विटरवर काही दिवसांपूर्वी होता.

हे सुद्धा वाचा

विक्रम वेधा हा तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. पुष्कर आणि गायत्री या जोडीने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या या तमिळ चित्रपटात आर. माधवन आणि विजय सेतुपती यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. आता त्यांच्या जागी हिंदी रिमेकमध्ये हृतिक आणि सैफ झळकणार आहेत.

‘विक्रम वेधा’चं कथानक नाट्यमय वळणांनी भरलेलं आहे. कडक शिस्तीचा पोलिस अधिकारी विक्रम (सैफ अली खान) गँगस्टर वेधाला (हृतिक रोशन) पकडतो. त्यानंतर खऱ्या अर्थाने चोर पोलिसांचा पाठ शिवणीचा खेळ सुरू होतो. वेधा आपली कथा सांगत असताना विविध पैलू उलगडत जातात आणि विक्रमला वास्तवतेचं दर्शन घडतं. यात हृतिक आणि सैफसोबतच राधिका आपटे, सत्यदीप मिश्रा आणि रोहित सराफ यांच्याही भूमिका आहेत. येत्या 30 सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हृतिकने दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांचा ‘फायटर’ हा चित्रपटसुद्धा साईन केला आहे. यामध्ये त्याच्यासोबत दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत झळकणार आहे. हृतिक आणि दीपिकाची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. ‘वॉर’ या चित्रपटासाठी दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद आणि हृतिकने एकत्र काम केलं होतं. वॉर या चित्रपटाने जवळपास 300 कोटींची कमाई केली होती.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.