Hrithik Roshan: हृतिक रोशनच्या कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर; अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन
पद्मरानी या गेल्या काही वर्षांपासून हृतिकची आई पिंकी रोशन यांच्यासोबत राहत होत्या. मे महिन्यात पिंकी यांनी आईसोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. 'आई नेहमीच खास आहे', असं कॅप्शन देत पिंकीने त्यांचा वाढदिवस साजरा करतानाचा फोटो पोस्ट केला होता.
अभिनेता हृतिक रोशनची (Hrithik Roshan) आजी (grandmother) पद्मरानी ओमप्रकाश (Padma Rani Omprakash) यांचं गुरुवारी मुंबईत निधन झालं. पद्मरानी या दिवंगत चित्रपट दिग्दर्शक जे. ओमप्रकाश यांच्या पत्नी आणि हृतिकची आई पिंक रोशन यांच्या आई होत्या. त्या 91 वर्षांच्या होत्या. गेल्या काही वर्षांपासून त्या आजारी होत्या. अखेर वृद्धापकाळाने त्यांनी गुरुवारी अखेरचा श्वास घेतला. पद्मरानी या गेल्या काही वर्षांपासून हृतिकची आई पिंकी रोशन यांच्यासोबत राहत होत्या. मे महिन्यात पिंकी यांनी आईसोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. ‘आई नेहमीच खास आहे’, असं कॅप्शन देत पिंकीने त्यांचा वाढदिवस साजरा करतानाचा फोटो पोस्ट केला होता.
जे ओमप्रकाश हे ‘आप की कसम’, ‘आया सावन झूम के’, ‘आईं मिलन की बेला’ यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखले जातात. ऑगस्ट 2019 मध्ये त्यांचं निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. 1974 मध्ये राजेश खन्ना यांच्या ‘आप की कसम’ या चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. त्यांनी अभिनेते जितेंद्र यांच्यासोबत बरेच चित्रपट केले होते. अपना बना लो, अपनापन, आशा, अर्पण, आदमी खिलौना है यांसारख्या चित्रपटांसाठी जितेंद्र आणि जे. ओमप्रकाश यांनी एकत्र काम केलं होतं.
पिंकी रोशन यांची पोस्ट-
View this post on Instagram
View this post on Instagram
पिंकी रोशन यांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत शोक व्यक्त केला. ‘बाबांना भेटण्यासाठी माझी आई पद्मरानी ओमप्रकाश आम्हाला सोडून गेली. तिच्या आत्म्याला शांती लाभो’, अशी पोस्ट त्यांनी लिहिली. आई-वडिलांचा फोटो पोस्ट करत त्यांनी आणखी एक पोस्ट लिहिली. ‘माझी आई, माझे बाबा.. तुम्हा दोघांवर मी खूप प्रेम करते. दोघं आता एकत्र असतील’, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या. त्यांच्या या पोस्टवर कमेंट करत अनेकांनी सहवेदना व्यक्त केल्या.