Alia Bhatt: ‘मी काही पार्सल नाही’; प्रेग्नंसीबाबतच्या ‘त्या’ वृत्तावर भडकली आलिया

आलियाची प्रेग्नंसी (Alia Bhatt Pregnancy) आणि तिच्या चित्रपटांचे शेड्युल याबद्दलची माहिती देणारी पोस्ट तिने इन्स्टा स्टोरीवर शेअर केली. त्यावर तिने उपरोधिकरित्या उत्तर दिलं आहे.

Alia Bhatt: 'मी काही पार्सल नाही'; प्रेग्नंसीबाबतच्या 'त्या' वृत्तावर भडकली आलिया
Alia BhattImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 28, 2022 | 7:35 PM

अभिनेत्री आलिया भट्टने (Alia Bhatt) गरोदर असल्याची पोस्ट सोशल मीडियावर सोमवारी सकाळी पोस्ट केली. रुग्णालयातील अल्ट्रासाऊंडचा फोटो पोस्ट करत आलियाने चाहत्यांना ही गुड न्यूज दिली. या फोटोमध्ये रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया अत्यंत आनंदाने बाळाच्या अल्ट्रासाऊंड स्क्रीनकडे पाहताना दिसत आहेत. क्षणार्धात तिची ही पोस्ट व्हायरल झाली आणि त्यावर शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला. इतकंच नव्हे तर आलियाच्या पुढील प्लॅन्सविषयी बरेच वृत्त वेबसाइट्सवर पब्लिश केले जाऊ लागले. मात्र अशाच एका वृत्तावर आलियाने सडेतोड उत्तर दिलं आहे. आलियाची प्रेग्नंसी (Alia Bhatt Pregnancy) आणि तिच्या चित्रपटांचे शेड्युल याबद्दलची माहिती देणारी पोस्ट तिने इन्स्टा स्टोरीवर शेअर केली. त्यावर तिने उपरोधिकरित्या उत्तर दिलं आहे.

काय होती पोस्ट?

‘अभिनेत्री आलिया भट्टने सोमवारी सकाळी प्रेग्नंसीबाबतची बातमी सोशल मीडियावर जाहीर करत सर्वांना सुखद धक्का दिला. आलिया जुलैच्या मध्यापर्यंत मुंबईत परतणार असल्याचं कळतंय. तिला घरी परत घेऊन येण्यासाठी रणबीर कपूर युकेला जाणार असल्याचीही माहिती आहे. ‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार, शूटवरून परतल्यानंतर आलिया काही काळ आराम करेल. असंही म्हटलं जात आहे की कोणतेही प्रोजेक्ट रखडू नये यानुसार आलियाने तिची प्रेग्नंसी प्लॅन केली आहे. जुलैच्या शेवटपर्यंत ती हार्ट ऑफ स्टोन आणि रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटांचं शूटिंग पूर्ण करणार आहे,’ असं वृत्त देणारी ती पोस्ट आहे.

हे सुद्धा वाचा

आलिया भट्टची पोस्ट-

‘दरम्यान, अजूनही काही लोक आमच्याबद्दल विचार करत आहेत. अजूनही आपण पितृसत्ताक जगात आहोत.. तुमच्या माहितीकरिता मी हे सांगू इच्छिते की कोणतीही गोष्ट पुढे ढकलली गेली नाही. कोणीही कोणाला आणायला जायची गरज नाही. मी एक स्त्री आहे, पार्सल नाही. मला आराम करायची काहीही गरज नाही पण तुम्हाला डॉक्टरांचे सर्टिफिकेशन्सही मिळतील हे जाणून आनंद झाला. हे 2022 आहे. कृपया आता तरी आपण अशा बुरसट विचारसरणीतून बाहेर पडू शकतो का? माफ करा, पण माझ शॉट रेडी आहे,’ अशी उपरोधिक पोस्ट आलियाने त्यावर लिहिली आहे.

आलिया सध्या तिच्या हॉलिवूडच्या चित्रपटाच्या शूटिंगनिमित्त परदेशी गेली आहे. सोमवारी तिने प्रेग्नंसीबाबतची पोस्ट शेअर करताच प्रियांका चोप्रा, करण जोहर, टायगर श्रॉफ, इशान खट्टर, वाणी कपूर, फरहान अख्तर, मलायका अरोरा, अनिल कपूर, बिपाशा बासू, आकांक्षा रंजन, शशांक खैतान, इशा गुप्ता, रकुल प्रीत सिंग, परिणीती चोप्रा यांसारख्या सेलिब्रिटींकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.