Anushka Sharma: अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा गरोदर? रुग्णालयाबाहेरील विराटसोबतचा फोटो पाहून चाहत्यांना पडला प्रश्न

या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि चर्चांना सुरुवात झाली. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयाबाहेर या दोघांना पाहिलं गेलं. हे फोटो जेव्हा पापाराझींनी सोशल मीडियावर शेअर केले, तेव्हा अनुष्का दुसऱ्यांदा गरोदर आहे की काय, असा प्रश्न चाहत्यांना पडला.

Anushka Sharma: अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा गरोदर? रुग्णालयाबाहेरील विराटसोबतचा फोटो पाहून चाहत्यांना पडला प्रश्न
Anushka Sharma and Virat KohliImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 16, 2022 | 9:30 AM

टीम इंडियाचा फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) नुकताच कुटुंबीयांसोबत सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेला होता. विराट, पत्नी अनुष्का (Anushka Sharma) आणि मुलगी वामिकाला (Vamika) घेऊन फिरायला गेला होता. तिथून परतताच मुंबईत आल्यानंतर विराट अनुष्कासोबत रुग्णालयात जाताना दिसला. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि चर्चांना सुरुवात झाली. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयाबाहेर या दोघांना पाहिलं गेलं. हे फोटो जेव्हा पापाराझींनी सोशल मीडियावर शेअर केले, तेव्हा अनुष्का दुसऱ्यांदा गरोदर आहे की काय, असा प्रश्न चाहत्यांना पडला. अनेकांनी तिच्या प्रेग्नंसीविषयी प्रश्न उपस्थित केला. विराट आणि अनुष्का एकत्र रुग्णालयात का गेले, याचं उत्तर आता समोर आलं आहे.

अनुष्का सध्या तिच्या आगामी ‘चकदा एक्स्प्रेस’ या चित्रपटासाठी जोरदार तयार करत आहे. या चित्रपटात ती भारताच्या महिला संघाची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीची भूमिका साकारतेय. याच कारणासाठी ती फिजिओथेरपीस्टकडे गेली होती. चित्रपटातील भूमिकेसाठी तिला भरपूर धावणे, स्ट्रेचिंग, डायव्हिंग करावं लागत आहे. अनुष्का खेळाडू नसल्यामुळे या सर्व गोष्टींचा ताण तिच्या शरीरावर अधिक पडत आहे. याच कारणासाठी ती विराटसोबत फिजिओथेरपीस्टकडे गेली होती.

हे सुद्धा वाचा

2018 मध्ये अनुष्का ‘झिरो’ या चित्रपटात शाहरुख खानसोबत झळकली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटला. त्यानंतर ती मोठ्या पडद्यापासून काही काळ लांब राहिली. आता झुलन गोस्वामीच्या बायोपिकच्या माध्यमातून ती प्रेक्षकांसमोर येणार आहे. झुलन गोस्वामीने आयुष्यात कसा संघर्ष केला? तिने यश कसं मिळवलं? त्यावर हा चित्रपट आधारीत आहे. यावर्षाच्या सुरुवातीला अनुष्काने या चित्रपटाची घोषणा केली होती. झुलनची गोलंदाजीची स्टाइल, व्यक्तीमत्व हुबेहूब तसंच वाटलं पाहिजे, यासाठी अनुष्का सध्या खूप मेहनत घेतेय. तिने त्याचे काही फोटो स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.