AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Naga Chaitanya: समंथाला घटस्फोट दिल्यानंतर नाग चैतन्य पुन्हा प्रेमात पडला, ‘या’ अभिनेत्रीला करतोय डेट?

समंथाला घटस्फोट दिल्यानंतर आता नाग चैतन्य पुन्हा एकदा प्रेमात पडल्याची जोरदार चर्चा आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'मेजर' (Major) या चित्रपटात या अभिनेत्रीने भूमिका साकारली आहे. 'मेड इन हेवन' या वेब सीरिजमध्येही ती अभिनेत्री झळकली.

Naga Chaitanya: समंथाला घटस्फोट दिल्यानंतर नाग चैतन्य पुन्हा प्रेमात पडला, 'या' अभिनेत्रीला करतोय डेट?
समंथाला घटस्फोट दिल्यानंतर नाग चैतन्य पुन्हा प्रेमात पडला?Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jun 21, 2022 | 11:20 AM
Share

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) आणि अभिनेता नाग चैतन्य (Naga Chaitanya) ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वांत लोकप्रिय जोडी होती. मात्र ऑक्टोबर 2021 मध्ये या दोघांनी जेव्हा घटस्फोट जाहीर केला, तेव्हा त्यांच्या असंख्य चाहत्यांना मोठा धक्काच बसला. आता समंथा आणि नाग चैतन्य घटस्फोटाच्या कटू आठवणी मागे ठेवून आपापल्या आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. समंथाला घटस्फोट दिल्यानंतर आता नाग चैतन्य पुन्हा एकदा प्रेमात पडल्याची जोरदार चर्चा आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मेजर’ (Major) या चित्रपटात या अभिनेत्रीने भूमिका साकारली आहे. ‘मेड इन हेवन’ या वेब सीरिजमध्येही ती अभिनेत्री झळकली. ‘पिंकविला’ने दिलेल्या वृत्तानुसार, नाग चैतन्यच्या घराबाहेर या दोघांना एकत्र पाहिलं गेलं.

हैदराबादमधील जुबिली हिल्स याठिकाणी नाग चैतन्यने नवीन घर घेतलंय. या घराचं बांधकाम अद्याप सुरू आहे. याच घराजवळ नाग चैतन्य आणि अभिनेत्री सोभिता धुलिपाला यांना एकत्र पाहिलं गेलं. यावेळी दोघंही एकमेकांसोबत अत्यंत कम्फर्टेबल दिसत होते आणि नाग चैतन्य तिला आपलं नवीन घर दाखवत होता, असं वृत्त ‘पिंकविला’ने दिलंय. इतकंच नव्हे तर घराची पाहणी केल्यानंतर दोघं एकाच कारमधून परत गेले. सोभिताचा ‘मेजर’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान ती ज्या ज्या हॉटेलमध्ये थांबली, तिथे अनेकदा नाग चैतन्यला पाहिलं गेल्याचंही म्हटलं जातंय. नुकताच सोभिताने आपला वाढदिवसुसुद्धा हैदराबादमध्ये नाग चैतन्यसोबत साजरा केल्याचं कळतंय. याबद्दल अद्याप सोभिता किंवा नाग चैतन्यने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

पहा फोटो-

नाग चैतन्य आणि समंथाने लग्नाच्या चार वर्षांनंतर घटस्फोट जाहीर केला. दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित याबद्दलची चाहत्यांना माहिती दिली होती. त्यावेळी समंथावर विवाहबाह्य संबंध असल्याचेही आरोप झाले होते. लग्नापूर्वी बरीच वर्षे हे दोघं एकमेकांना डेट करत होते. मात्र घटस्फोटामागचं कारण त्यांनी स्पष्ट केलं नाही.

कोण आहे सोभिता धुलिपाला?

सोभिता ही अभिनेत्री आणि मॉडेल असून तिने हिंदी, मल्याळम आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलंय. तिने काही सौंदर्यस्पर्धांमध्ये विजेतेपद पटकावलंय. ‘फेमिना मिस इंडिया अर्थ 2013’चा किताब तिने पटकावला आहे. अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘रमन राघव 2.0’ या चित्रपटातून तिने पदार्पण केलं आणि त्यानंतर तिने दाक्षिणात्य चित्रपटांकडे आपला मोर्चा वळवला. 2019 मध्ये प्रदर्शित झालेली ‘मेड इन हेवन’ ही तिची सीरिज विशेष गाजली.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.