Jubin Nautiyal: “मला राष्ट्रविरोधी म्हणण्याआधी एकदा तरी..”; आरोपांवर जुबिन नौटियालने सोडलं मौन

अमेरिकेत होणाऱ्या जुबिनच्या कॉन्सर्टचा आयोजक जय सिंग (Jai Singh) असल्याचं म्हटलं जात आहे. जय सिंग हा गेल्या 30 वर्षांपासून भारतातून फरार असल्याचं कळतंय.

Jubin Nautiyal: मला राष्ट्रविरोधी म्हणण्याआधी एकदा तरी..; आरोपांवर जुबिन नौटियालने सोडलं मौन
Jubin NautiyalImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 12, 2022 | 12:45 PM

कथित खलिस्तानी (Khalistani) सदस्याशी संबंध ठेवल्याच्या आरोपावरून प्रसिद्ध गायक जुबिन नौटियालवर (Jubin Nautiyal) सध्या जोरदार टीका होत आहे. सोशल मीडियावर त्याला राष्ट्रविरोधी म्हणत नेटकरी त्याच्या अटकेची मागणी करत आहेत. अमेरिकेत होणाऱ्या जुबिनच्या कॉन्सर्टचा आयोजक जय सिंग (Jai Singh) असल्याचं म्हटलं जात आहे. जय सिंग हा गेल्या 30 वर्षांपासून भारतातून फरार असल्याचं कळतंय. अंमली पदार्थांची तस्करी आणि व्हिडीओ पायरसीचे आरोप त्याच्यावर आहेत. कॅलिफोर्नियातील फर्मांट इथं पळून गेल्यानंतर तो खलिस्तानी चळवळीला साथ देत होता, असंही म्हटलं जात आहे. अशात जुबिनने या प्रकरणावर मौन सोडलं आहे.

विविध कारणांमुळे हौस्टनमधील कॉन्सर्ट आधीच रद्द करण्यात आल्याचं जुबिनने स्पष्ट केलं. ट्विटर आणि इतर सोशल मीडियावर जे आरोप केले जात आहेत, त्याबद्दल कोणतीच माहिती नसल्याचंही त्याने म्हटलंय.

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत जुबिन म्हणाला, “मी त्यापैकी कोणालाच ओळखत नाही. आम्ही ऑगस्टमध्येच शो रद्द केला होता. प्रमोटर हरिजिंदर सिंग आणि माझ्या मॅनेजमेंट यांच्यात तो करार झाला होता. हे सर्व प्रकरण या मुद्द्यावर कसं येऊन पोहोचलं, हे मलाच माहित नाही. माझी आई नैराश्यात आहे. मला आणखी काहीच बोलायचं नाहीये. पेड ट्विटर थ्रेटवरून या अफवा पसरवल्या जात आहेत. मला विचारण्याची तसदीच कोणी घेतली नाही. राष्ट्रविरोधी? मी?”

हे सुद्धा वाचा

जुबिनने याआधीही ट्विट करत याविषयी स्पष्टीकरण दिलं होतं. ‘हॅलो फ्रेंड्स आणि ट्विटर फॅमिली. पुढच्या महिन्यात मी प्रवास आणि शूटिंगमध्ये व्यस्त असेन. कोणत्याही प्रकारच्या अफवांमुळे निराश होऊ नका. मला देशावर प्रेम आहे. मी तुमच्यावर सर्वात जास्त प्रेम करतो’, असं ट्विट त्याने केलं होतं.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.