‘शेरशाह’ पाहून कमल हासनही सिद्धार्थ-कियाराचे झाले फॅन, म्हणाले…
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीचा चित्रपट शेरशाह रिलीज झाला आहे. निर्मात्यांनी अॅमेझॉनवर शेरशाह रिलीज केला आहे. कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट चाहत्यांना खूप आवडला आहे. हा चित्रपट OTT वर रिलीज झाला आहे.
मुंबई : सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीचा चित्रपट शेरशाह रिलीज झाला आहे. निर्मात्यांनी अॅमेझॉनवर शेरशाह रिलीज केला आहे. कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट चाहत्यांना खूप आवडला आहे. हा चित्रपट OTT वर रिलीज झाला आहे. मात्र, चाहत्यांकडून चित्रपटाला पसंती मिळत आहे. (Kamal Haasan tweeted after watching Sher Shah movie)
अभिनेते कमल हासन यांनी चित्रपटाचे खूप कौतुक केले आहे. दक्षिणेपासून बॉलिवूड सिनेमापर्यंत कमल हासन यांची अभिनयाची जादू कायम आहे. कमल हासन यांनी रसिकांसमोर अनेक खास चित्रपट सादर केले आहेत. कमल हासन यांनी शेरशाह चित्रपट पाहून सिद्धार्थ आणि कियाराची स्तुती केली आहे.
कमल हासन यांनी शेरशाहवर ट्विट केले
कमल हासन सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. नुकताच कमल हासन यांनी शेरशाहचे कौतुक करणारे ट्विट केले आहे. ट्विटममध्ये म्हटंले आहे की, लहानपणापासून चित्रपट चाहता आणि देशभक्तचा मुलगा म्हणून भारतीय लष्कराला काही सिनेमागृहांमध्ये ज्या प्रकारे चित्रित केले गेले त्याबद्दल मी नाराज होतो. पण शेरशाह हा चित्रपट आहे.
Right from my childhood as a film fan and a patriot’s son I resented the way Indian army was depicted in some of our Cinemas. Shershaah is that exception that makes my chest swell with pride for my soldiers.(1/2)
— Kamal Haasan (@ikamalhaasan) August 23, 2021
Right from my childhood as a film fan and a patriot’s son I resented the way Indian army was depicted in some of our Cinemas. Shershaah is that exception that makes my chest swell with pride for my soldiers.(1/2)
— Kamal Haasan (@ikamalhaasan) August 23, 2021
जो माझ्या सैनिकांसाठी अभिमानाने माझी छाती भरून टाकतो. यासोबतच दुसऱ्या ट्वीटमध्ये कमल हासन यांनी लिहिले आहे, धर्मा फिल्म विष्णुसारख्या प्रतिभाशाली दिग्दर्शकाला प्रोत्साहन दिल्याबद्दल धन्यवाद. सिद्धार्थ आणि कियारा यांनी अप्रतिम काम केले आहे. अशाप्रकारे, कमल हासन यांनी चित्रपट आणि स्टार्सचे कौतुक केले आहे. कमल हासन यांचे हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरस झाले आहे.
चित्रपट कसा आहे
शेरशाहमध्ये शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांचा संपूर्ण प्रवास सुंदरपणे मांडण्यात आला आहे. विक्रम बत्रा यांच्या वैयक्तिक आयुष्याची संपूर्ण कथा, लव्ह लाईफपासून ते शहीद पर्यंत चित्रपटात सादर करण्यात आले आहे. हा चित्रपट चाहत्यांना इमोशन आणि देशभक्तिची आवड दाखवत आहे. सिद्धार्थ मल्होत्राचे या चित्रपटासाठी खूप कौतुक होत आहे.
संबंधित बातम्या :
Kamaal R Khan : केआरकेचा नवा दावा म्हणाला, ‘अक्षय कुमार लवकरच अफगाणिस्तानवर चित्रपट बनवणार’
(Kamal Haasan tweeted after watching Sher Shah movie)