Prophet remark: ‘इथे हिंदू देवदेवतांचा रोज अपमान होतो’; नुपूर शर्मा यांना कंगनाचा पाठिंबा

दिल्ली पोलिसांनी नुपूर शर्मा आणि त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षा पुरवल्यानंतर काही तासांतच कंगनाने ही पोस्ट लिहिली आहे. नुपूर यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याने दिल्ली पोलिसांनी सुरक्षा पुरविली आहे.

Prophet remark: 'इथे हिंदू देवदेवतांचा रोज अपमान होतो'; नुपूर शर्मा यांना कंगनाचा पाठिंबा
Kangana Ranaut and Nupur SharmaImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jun 08, 2022 | 3:14 PM

प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांनी अवमानकारक टिप्पणी केल्याप्रकरणी अरब देशांमध्ये निषेधाचा सूर उमटला. नुपूर शर्मा (Nupur Sharma) आणि नवीन कुमार जिंदाल (Naveen Jindal) या दोन्ही पदाधिकाऱ्यांवर रविवारी भाजपला कारवाई करावी लागली. एका वृत्तवाहिनीवर ज्ञानवापी प्रकरणावरील चर्चेत भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याचा आरोप आहे. दिल्ली भाजपचे माध्यम प्रमुख नवीन कुमार जिंदाल यांनीही प्रेषितांबद्दल अवमानकारक टिप्पणी केल्याचा आरोप असून पक्षाने त्यांची हकालपट्टी केली. तर नुपूर यांना पक्षाने निलंबित केलं. याप्रकरणी नुपूर यांना धमक्यासुद्धा येऊ लागल्या आहेत. आता बॉलिवूडची क्वीन अर्थात अभिनेत्री कंगना रनौतने (Kangana Ranaut) नुपूर यांना पाठिंबा दर्शविला आहे. कंगनाने इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट लिहित याविषयी तिचं मत मांडलंय.

काय म्हणाली कंगना?

‘नुपूर या त्यांच्या वक्तव्यासाठी जबाबदार आहेत. त्यांच्यावर निशाणा साधणाऱ्या धमक्या मला पहायला मिळत आहेत. जेव्हा हिंदू देवदेवतांचा अपमान केला जातो, जे रोजच घडत असतं, तेव्हा आपण कोर्टात धाव घेतो. त्यामुळे स्वत: गुंड झाल्यासारखे वागू नका. हे अफगाणिस्तान नाही. आपल्याकडे एक योग्य कार्य करणारं सरकार आहे, जे लोकशाही नावाच्या प्रक्रियेने निवडलं गेलंय. जे याबद्दल विसरले आहेत त्यांना आठवण करून देण्यासाठी ही पोस्ट आहे,’ अशी पोस्ट कंगनाने लिहिली आहे. दिल्ली पोलिसांनी नुपूर शर्मा आणि त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षा पुरवल्यानंतर काही तासांतच कंगनाने ही पोस्ट लिहिली आहे. नुपूर यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याने दिल्ली पोलिसांनी सुरक्षा पुरविली आहे.

कंगनाची पोस्ट-

हे सुद्धा वाचा

याप्रकरणी इराण, कुवेत आणि कतार या देशांनी तिथल्या भारतीय दूतावासांना स्पष्टीकरणासाठी पाचारण केलं. अरब देशांमध्ये ट्विटवर ‘भारतीय उत्पादनांवर बहिष्कार टाका’ असा हॅशटॅग ट्रेंड झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही लक्ष्य करण्यात आलं. दरम्यान, सर्व धर्मांबद्दल पक्षाला आदर असून, कोणत्याही पंथाचा किंवा धर्माचा अवमान करणं पक्षाला मान्य नाही, असं स्पष्टीकरण भाजपने रविवारी दिलं.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.