Kangana Ranaut: कंगनाला अतिउत्साह नडला; खोड्या व्हिडीओला खरं मानून कतार एअरवेजच्या प्रमुखांवर भडकली अन्..
कंगनाला काही वेळाने हे समजलं की आपण एडिट केलेल्या व्हिडीओला खरं समजून त्यावर व्यक्त झालो आहोत. यानंतर तिने तिचे पोस्ट डिलिट केले. मात्र तोपर्यंत तिच्या पोस्टचे स्क्रीनशॉट्स व्हायरल झाले होते.
अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) आणि वाद हे जणू समीकरणच बनलं आहे. गेल्या वर्षी एका वादामुळे तिला ट्विटरवर बंदी घालण्यात आली आणि यावेळी तिने इन्स्टाग्रामवर अतिउत्साहात मोठी चूक केली. एका ट्विटर युजरने #BycottQatarAirways वादाबद्दल बोलताना कतार एअरवेजचे प्रमुख (Qatar Airways CEO) अकबर अल बकर यांचा स्पूफ व्हिडीओ बनवला आणि तो शेअर केला. मात्र कंगना याच खोट्या व्हिडीओला (spoof video) बळी पडली आणि इन्स्टाग्रामवर ती कतार एअरवेजच्या प्रमुखांवर भडकली. आपण एडिट केलेल्या व्हिडीओला खरं समजून प्रतिक्रिया दिल्याचं कळताच कंगनाने तिचे हे पोस्ट डिलिट केले आहेत.
नेमकं काय आहे प्रकरण?
वाशुदेव या ट्विटर युजरने भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी केलेल्या टिप्पणीवर एक व्हिडिओ शेअर केला. या क्लिपमध्ये एक व्यक्ती या वादाविषयी आणि चित्रकार एम. एफ. हुसैन यांना हिंदू देवदेवतांची नग्न चित्रे काढल्यानंतर कतारमध्ये कसा आश्रय देण्यात आला याबद्दल बोलताना दिसतोय. वाशुदेव यांचं ट्विटर अकाऊंट आता ब्लॉक करण्यात आलं आहे. दुसऱ्या बाजूला कतार एअरवेजचे प्रमुख अकबर अल बकर हे #BycottQatarAirways या वादावर चर्चा करण्यासाठी अल-जझीरा या वृत्तवाहिनीला मुलाखत देत आहेत. एका ट्विटर युजरने अकबर अल बकर यांची तीच मुलाखत डब करून स्पूफ व्हिडिओ बनवला आहे. यामध्ये अकबर अल बकर हे वाशुदेवला बहिष्कार मागे घेण्याचं आवाहन करत आहे. अकबर यांचा आवाज डब करून हा स्पूफ व्हिडीओ बनवण्यात आला आहे.
I’M DEAD! ??????? This is MUST WATCH! Watch this interview of the CEO of Qatar airways, on the call for #BycottQatarAirwaysQatar by Vashudev Watch till the end! pic.twitter.com/52YUJLDCYj
— Husna Pervez حسنیٰ پرویز (@HusnaPervez) June 7, 2022
याच स्पूफ व्हिडीओला कंगना बळी पडली. हा व्हिडीओ खरा समजून तिने टीका करण्यास सुरुवात केली. ‘एखाद्या गरीब माणसाची चेष्टा करण्यासाठी या गुंडगिरीचा जयजयकार करणार्या सर्व तथाकथित भारतीयांनी हे लक्षात ठेवा की तुम्ही सर्वजण या जास्त लोकसंख्या असलेल्या देशावर एक मोठं ओझं आहात’, असं तिने एका पोस्टमध्ये लिहिलं.
कंगनाचे पोस्ट-
कंगना रणौतने विडंबन व्हिडिओ खरा असल्याचे मानले आहे आणि इंस्टाग्रामवर “या गुंडगिरीचा जयजयकार करणार्या” लोकांना फटकारले आहे. “एखाद्या गरीब माणसाची चेष्टा करण्यासाठी या गुंडगिरीचा जयजयकार करणार्या सर्व तथाकथित भारतीयांना हे लक्षात ठेवा की तुम्ही सर्व लोक या जास्त लोकसंख्येच्या देशावर एक मोठे बोझ (ओझे) आहात,” तिने तिच्या एका इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले आहे. तर दुसऱ्या पोस्टमध्ये तिने कतार एअरवेजच्या प्रमुखांना ‘इडियट ऑफ अ मॅन’ म्हटलंय. ‘या मूर्ख माणसाला एका गरीब व्यक्तीला धमकावताना, त्याची खिल्ली उडवताना लाज वाटत नाही. वाशुदेव गरीब असू शकतो आणि तुमच्यासारख्या श्रीमंत माणसासाठी तो क्षुल्लक असेल पण त्याला त्याचं दु:ख, वेदना आणि निराशा व्यक्त करण्याचा अधिकार आहे. लक्षात ठेवा या जगाच्या पलीकडे एक जग आहे जिथे आपण सर्व समान आहोत,’ अशी पोस्ट तिने लिहिली. कंगनाला काही वेळाने हे समजलं की आपण एडिट केलेल्या व्हिडीओला खरं समजून त्यावर व्यक्त झालो आहोत. यानंतर तिने तिचे पोस्ट डिलिट केले. मात्र तोपर्यंत तिच्या पोस्टचे स्क्रीनशॉट्स व्हायरल झाले होते.
प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल अवमानकारक टिप्पणी केल्याप्रकरणी भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना पक्षाने निलंबित केलं. याप्रकरणी अरब देशांमध्ये निषेधाचा सूर उमटला. इराण, कुवेत आणि कतार या देशांनी तिथल्या भारतीय दूतावासांना स्पष्टीकरणासाठी पाचारण केलं. अरब देशांमध्ये ट्विटवर ‘भारतीय उत्पादनांवर बहिष्कार टाका’ असा हॅशटॅग ट्रेंड झाला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही लक्ष्य करण्यात आलं होतं.