Kangana Ranaut: ‘धाकड’च्या अपयशानंतर कंगनाची सारवासारव; चित्रपटाला OTT प्लॅटफॉर्म्सचीही डील मिळेना

'धाकड'मध्ये कंगनाचा ॲक्शन अवतार प्रेक्षकांना पहायला मिळाला. मात्र कथानकाच्या बाबतीत हा चित्रपट दणक्यात आपटला. प्रदर्शनाच्या आठव्या दिवशी फक्त 20 तिकिटं विकली गेली होती आणि त्यातून केवळ 4420 रुपयांची कमाई झाली होती.

Kangana Ranaut: 'धाकड'च्या अपयशानंतर कंगनाची सारवासारव; चित्रपटाला OTT प्लॅटफॉर्म्सचीही डील मिळेना
Kangana Ranaut in DhaakadImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 06, 2022 | 9:43 AM

बॉलिवूडची क्वीन अर्थात अभिनेत्री कंगना रनौतचा (Kangana Ranaut) ‘धाकड’ (Dhaakad) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष कमाई करू शकला नाही. कार्तिक आर्यनच्या ‘भुल भुलैय्या 2’ या चित्रपटाने कंगनाच्या ‘धाकड’ला जोरदार टक्कर दिली. कंगनाच्या या अपयशाची (box office failure) चर्चा होत असतानाच आता खुद्द तिनेच इन्स्टाग्राम एक पोस्ट लिहिली आहे. रजनीश घई दिग्दर्शित ‘धाकड’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर एक कोटीहून कमी गल्ला जमवला. चित्रपट प्रदर्शनाच्या जवळपास दोन आठवड्यांनंतर कंगनाने त्याच्या अपयशावर भाष्य केलंय. 2022 या वर्षाबाबत आपण अजूनही सकारात्मक असल्याचं तिने म्हटलंय. ‘धाकड’मध्ये कंगनाचा ॲक्शन अवतार प्रेक्षकांना पहायला मिळाला. मात्र कथानकाच्या बाबतीत हा चित्रपट दणक्यात आपटला. प्रदर्शनाच्या आठव्या दिवशी फक्त 20 तिकिटं विकली गेली होती आणि त्यातून केवळ 4420 रुपयांची कमाई झाली होती.

‘धाकड’च्या अपयशाबाबत कंगनाचं स्पष्टीकरण-

‘2019 मध्ये मी 160 कोटींचा ‘मणिकर्णिका’ हा सुपरहिट चित्रपट दिला. 2020 हे वर्ष कोविडचं होतं. त्यानंतर 2021 मध्ये मी माझ्या करिअरमधील सर्वांत मोठा आणि महत्त्वाचा ‘थलायवी’ हा चित्रपट दिला. जो ओटीटीवर प्रदर्शित झाला होता आणि त्यालाही यश मिळालं. सध्या माझ्या बाबतीत बरीच नकारात्मकता पसरवली जातेय, पण 2022 हे माझ्यासाठी ब्लॉकबस्टर वर्ष ठरलं. यावर्षी मी लॉक अपचं सूत्रसंचालन केलं आणि अजूनही हे वर्ष संपलेलं नाही. मला अजूनही खूप आशा आहे.’

कंगनाची पोस्ट-

हे सुद्धा वाचा

कंगनाच्या ‘धाकड’ या चित्रपटाने फक्त तीन कोटी रुपयांची कमाई केली. प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने चित्रपट वितरकांनीही थिएटरमधून हा चित्रपट काढून टाकला. जवळपास 80 ते 90 कोटींच्या बजेटमध्ये हा चित्रपट बनवण्यात आला. विशेष म्हणजे ओटीटीवरही प्रदर्शित करण्यासाठी अडचणी येत असल्याचं समजतंय. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई न केल्याने ओटीटी प्लॅटफॉर्म्सही डील करण्यासाठी कचरत असल्याची चर्चा आहे.

कंगनाच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास, ती सध्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. त्यानंतर तिचा ‘तेजस’ हा चित्रपटसुद्धा प्रदर्शित होणार आहे. तिचा ‘मणिकर्णिका रिटर्न्स’ हा चित्रपटसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.