Kangana Ranaut: कंगना रनौतकडून एकनाथ शिंदेंचं कौतुक; म्हणाली ‘ऑटोरिक्षा चालवण्यापासून ते..’
बॉलिवूडची क्वीन अर्थात अभिनेत्री कंगना रनौतनेही (Kangana Ranaut) त्यांच्यासाठी खास पोस्ट लिहित त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ऑटो-रिक्षा चालकापासून ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्यापर्यंतच्या त्यांच्या यशोगाथेबद्दल कंगनाने त्यांचं कौतुक केलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तानाट्यानंतर अखेर गुरुवारी संध्याकाळी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ गेली. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणार आणि ते मुख्यमंत्रिपद स्वीकारतील अशी चर्चा असतानाच ऐनवेळी पत्रकार परिषदेत फडणवीसांना मोठा ट्विस्ट आणला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री (Maharashtra chief minister) होणार असल्याचं जाहीर करताच सोशल मीडियावर अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. बॉलिवूडची क्वीन अर्थात अभिनेत्री कंगना रनौतनेही (Kangana Ranaut) त्यांच्यासाठी खास पोस्ट लिहित त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ऑटो-रिक्षा चालकापासून ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्यापर्यंतच्या त्यांच्या यशोगाथेबद्दल कंगनाने त्यांचं कौतुक केलं आहे.
इन्स्टा स्टोरीमध्ये एकनाथ शिंदेंचा फोटो पोस्ट करत कंगनाने लिहिलं, “अत्यंत प्रेरणादायी यशोगाथा. उदरनिर्वाहासाठी ऑटो-रिक्षा चालवण्यापासून ते देशातील सर्वात महत्त्वाचे आणि शक्तिशाली व्यक्ती बनण्यापर्यंत.. अभिनंदन सर.”
कंगनाची पोस्ट-
गेल्या काही वर्षांपासून कंगनाचे उद्धव ठाकरे यांच्या सरकारशी बरेच मतभेद होते. सोशल मीडियावर वेळोवेळी पोस्ट लिहित तिने आपली नाराजी बोलून दाखवली होती. इतकंच नव्हे तर उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर कंगनाने इन्स्टाग्राम एक व्हिडीओ पोस्ट करत टीका केली. “2020 मध्ये मी म्हटलं होतं की लोकशाही हा एक विश्वास आहे आणि सत्तेच्या अहंकारात येऊन जो या विश्वासाला तोडतो, त्यांचा अहंकार तुटणंसुद्धा निश्चित आहे. हे कोणत्या व्यक्ती विशेषची शक्ती नाही. ही शक्ती आहे सच्च्या चरित्राची आणि दुसरी गोष्ट म्हणजे हनुमानाला शिवाचं बारावं अवतार मानलं जातं. शिवसेनेनंच जर हनुमान चालिसावर बंदी आणली तर त्यांना शिवसुद्धा वाचवू शकत नाही,” असं ती या व्हिडीओत म्हणाली.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरू असताना उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सोडल्यानंतर कंगनाचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होऊ लागला होता. “उद्धव ठाकरे, तुम्हाला काय वाटतं? चित्रपट माफियांच्या साथीने माझं घर पाडून तुम्ही माझ्याविरुद्ध बदला घेतला आहे का? आज माझं घर पाडलं, उद्या तुमचा अहंकार नष्ट होईल”, असं ती म्हणाली. तिचा हाच व्हिडीओ पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला होता.