Yash: कंगना रनौत KGF 2 स्टार यशच्या प्रेमात; चित्रपट पाहिल्यावर म्हणाली..

गेल्या काही दिवसांत दाक्षिणात्य चित्रपटांनी हिंदी बॉक्स ऑफिसवर चांगलाच प्रभाव टाकल्याचं पहायला मिळालं. मग तो एस. एस. राजामौली यांचा 'RRR' चित्रपट असो किंवा मग कन्नड सुपरस्टार यशचा 'केजीएफ: चाप्टर 2' (KGF 2) असो..

Yash: कंगना रनौत KGF 2 स्टार यशच्या प्रेमात; चित्रपट पाहिल्यावर म्हणाली..
Kangana and YashImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 18, 2022 | 10:07 AM

गेल्या काही दिवसांत दाक्षिणात्य चित्रपटांनी हिंदी बॉक्स ऑफिसवर चांगलाच प्रभाव टाकल्याचं पहायला मिळालं. मग तो एस. एस. राजामौली यांचा ‘RRR’ चित्रपट असो किंवा मग कन्नड सुपरस्टार यशचा ‘केजीएफ: चाप्टर 2’ (KGF 2) असो.. या दाक्षिणात्य चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दणक्यात कमाई केली आहे. सध्या चित्रपटसृष्टीत याच चित्रपटांचा बोलबाला असून प्रेक्षक आणि समीक्षकसुद्धा त्यांचं कौतुक करत आहेत. बॉलिवूडची ‘क्वीन’ कंगनासुद्धा (Kangana Ranaut) दाक्षिणात्य कलाकारांची कामगिरी पाहून चक्रावली आहे. ‘केजीएफ 2’ पाहिल्यानंतर ती अभिनेता यशच्या (Yash) दमदार अभिनयाच्या प्रेमातच पडली आहे. इन्स्टा स्टोरीमध्ये त्याच्यासाठी तिने पोस्ट लिहिली असून त्याच्या अभिनयाची तुलना कंगनाने बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याशी केली आहे.

‘गेल्या अनेक दशकांपासून हरवलेला ‘अँग्री यंग मॅन’ यशने पुन्हा आणला आहे. सत्तरच्या दशकात अमिताभ बच्चन यांनी अँग्री यंग मॅनची प्रतिमा उभी केली होती. त्यानंतर निर्माण झालेली पोकळी यशने आता भरून काढली. अप्रतिम कामगिरी’, अशा शब्दांत कंगनाने यशचं कौतुक केलं. इतकंच नव्हे तर कंगनाने इतरही दाक्षिणात्य कलाकारांसाठी इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट लिहिली आहे.

कंगनाची पोस्ट-

यश, रामचरण, ज्युनियर एनटीआर, अल्लू अर्जुन यांसारख्या दाक्षिणात्य कलाकारांचा फोटो पोस्ट करत कंगनाने पुढे लिहिलं, ‘साऊथ सुपरस्टार हे साधे आणि त्यांच्या संस्कृतीवर जिवापाड प्रेम करणार असतात. त्यांची प्रतिभा आणि कठोर परिश्रम याशिवाय त्यांची प्रामाणिकता ही प्रेक्षकांना विशेष आकर्षित करते.’

यशची मुख्य भूमिका असलेल्या ‘केजीएफ 2’ने अवघ्या तीन दिवसांत 100 कोटींहून अधिकचा गल्ला जमवला आहे. ही कमाई केवळ हिंदी व्हर्जनची आहे. लाँग वीकेंडचा या चित्रपटाला चांगलाच फायदा असून बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची दणक्यात कमाई सुरू आहे. या चित्रपटात यशसोबतच रवीना टंडन, प्रकाश राज, संजय दत्त यांच्याही भूमिका आहेत.

हेही वाचा:

Indias Got Talent 9: दिव्यांश-मनुराजने पटकावलं ‘इंडियाज गॉट टॅलेंट’चं विजेतेपद; बक्षिस म्हणून मिळाली इतकी रक्कम

Anupam Kher: वयाच्या 67व्या वर्षी अनुपम खेर यांचं थक्क करणारं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन; नेटकरी म्हणाले..

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.