करण देओलच्या कमबॅकसाठी सनी देओल अत्यंत उत्सुक, जाणून घ्या अपने 2 चित्रपटामध्ये काय खास असणार!

धर्मेंद्र, सनी देओल आणि बॉबी देओल यांच्या ‘अपने’चा सीक्वल ‘अपने 2’ येत आहे. अपने या चित्रपटामध्ये 2 पिढ्या आपल्याला बघायला मिळाल्या. मात्र, आता अपने 2 मध्ये तिसरी पिठी म्हणजेच सनी देओलचा मुलगा करण देओल देखील या चित्रपटामध्ये दिसणार आहे.

करण देओलच्या कमबॅकसाठी सनी देओल अत्यंत उत्सुक, जाणून घ्या अपने 2 चित्रपटामध्ये काय खास असणार!
सनी देओलचा मुलगा करण देओलच लवकर कमबॅक करणार.Image Credit source: इंस्टाग्राम
Follow us
| Updated on: Feb 27, 2022 | 1:18 PM

मुंबई : धर्मेंद्र (Dharmendra), सनी देओल (Sunny Deol) आणि बॉबी देओल यांच्या ‘अपने’चा सीक्वल ‘अपने 2’ येत आहे. अपने या चित्रपटामध्ये 2 पिढ्या आपल्याला बघायला मिळाल्या. मात्र, आता अपने 2 मध्ये तिसरी पिठी म्हणजेच सनी देओलचा (Karan Deol) मुलगा करण देओल देखील या चित्रपटामध्ये दिसणार आहे. करणने 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या पल पल दिल के पास या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये धडाकेबाज पदार्पण केले होते. करण अजूनही चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

वडिलांकडून मिळतायेत करणला अभिनयाचे धडे

बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार, सनी देओल करणच्या पुनरागमनासाठी खूप मेहनत घेत आहे. रिपोर्ट्सनुसार जेव्हा सनी देओल त्याच्या गदर 2 चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करेल तेव्हा ‘अपने 2’चे शूटिंग सुरू होईल. सध्या सनी लखनऊमध्ये चित्रपटाच्या 40 दिवसांच्या शेड्यूलचे शूटिंग करत आहे. हे शूटिंग पूर्ण होताच सनी पुन्हा अपने 2 च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. सनी करणला पूर्णपणे तयार करत आहे आणि त्याला त्याचे अभिनय कौशल्य आणखी चांगले करायचे आहे. त्याचवेळी काका म्हणजेच बॉबी देओल करणच्या फिटनेससाठी काम करत आहेत.

करण धमाकेदार पुनरागमन करेल

पल पल दिल के पास या चित्रपटाला मिळालेल्या अत्यल्प प्रतिसादामुळे करण खूप दु:खी झाल्याचे बोलले जात होते. पल पल दिल के पास नंतर करणचा ‘वाले’ हा चित्रपटही गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता आणि या चित्रपटालाही चांगला प्रतिसाद मिळाला नाही. पण आता तो स्वतःवर जास्त काम करत असून यावेळी तो प्रेक्षकांची मने जिंकून दाखवणार आहे. पल पल दिल के पास या पहिल्या चित्रपटापूर्वी किंवा हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही तो फारसा प्रसिद्धीच्या झोतात राहिला नाही.

संबंधित बातम्या : 

‘ओला’ने प्रवास करताना शबाना आझमींच्या भाचीला आला भयानक अनुभव; वाचा नेमकं काय घडलं?

Gangubai Kathiawadi Box Office Collection Day 2 : आलिया भट्टच्या ‘गंगूबाई’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, दुसऱ्या दिवशीही इतकी कमाई!

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.